300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Saturday, 5 October 2013

Tagged under: , , , , , ,

ट्विटर आणी भन्नाट प्रयोग


ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग

सेलिब्रिटींमध्ये रंगले ट्वीट युद्ध.. अमुक अमुक नेत्याला वादग्रस्त ट्वीट भोवली.. इतक्यात निवृत्तीचा विचार नाही, सचिनने केला ट्विटरवरून खुलासा.. नरेंद्र मोदी भारतीय ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय नेते.. अशा बातम्या नेहेमीच तुम्ही वाचल्या असतील.

भारतात ट्विटर फारसे लोकप्रिय नसले तरीही जगात मात्र ट्विटर हे संकेतस्थळ लोकप्रिय आहे, फेब्रुवारी २०१३ मध्ये ट्विटरची जागतिक लोकसंख्या तब्बल २०० दशलक्ष इतकी होती तसेच भारतातील आणी जगातील बहुतेक सेलिब्रिटी चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरचा वापर करतात.

सरळसाधी पण तरीही आकर्षक मांडणी, कमी पण दर्जेदार सुविधा ही ट्विटरची बलस्थाने आहेत. ‘ट्वीट’ म्हणजे ट्विटरचे मुख्य वैशिष्ट्य आहे, फेसबुकवर ज्याप्रमाणे स्टेट्स अपडेट करतो तसेच ट्विटरवर केले कि त्या स्टेट्सला ट्वीट असे म्हणतात पण मुख्य अट अशी कि तुम्ही १४० इंग्रजी अक्षरांपेक्षा जास्त अक्षरे असलेली ट्वीट अधिकृतपणे करू शकत नाही, पण जिथे नियम आले तिथे पळवाटा देखील आल्या. 

आपण आज ट्विटरबद्दल काही भन्नाट गोष्टी जाणून घेऊ.


फेसबुकवरून ट्वीटर वापरा – 



तुम्ही जर फेसबुक वापरकर्ते असाल आणी तरीही तुम्हाला तुमच्या ट्विटर वरील मित्रांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही तुमच्या फेसबुक खात्यावरूनही ट्वीटरवापरू शकता, त्यामुळे तुम्हाला दर वेळी ट्वीटर वर लॉगिन करण्याची आवश्यकता भासणार नाही. आपण पाहूया कसे ??

- सर्वप्रथम ट्विटरवर खाते उघडा, जर खाते असेल तर आयडी-पासवर्ड देऊन लॉगिन करा.
- आता सेटिंग मध्ये जाऊन एडीट प्रोफाइल वर क्लिक करा किंवा इथे क्लिक करा
- आता सर्वात शेवटचा पर्याय पहा, कनेक्ट टू फेसबुक (Connect to facebook) वर क्लिक करा आणी फेसबुक खात्याचा आयडी – पासवर्ड द्या आणी ट्विटरला खाते वापरण्याची परवानगी द्या.

ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग



ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग



ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग

- आता तुमच्या फेसबुक खात्यावर तुम्ही अपडेट केलेले प्रत्येक स्टेट्स (सुरुवातीची १४० अक्षरे) ट्विटरवर ट्वीट म्हणुन प्रसिद्ध होईल.


शेड्युल ट्विट (Scheduled Tweets) - 


शेड्युल ट्विटच्या नावामधुनच तुम्हाला कल्पना आली असेल कि तुम्ही हि सुविधा वापरून तुमच्या ट्विटस शेड्युल करू शकता म्हणजेच तुमची ट्विट कधी प्रसिद्ध व्हावी हे ठरवू शकता. याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या किंवा आवडत्या कलाकारांच्या/खेळाडूंच्या वाढदिवशी ट्विटरवर लॉगिन न करता त्यांच्यापर्यंत तुमचे अभिष्टचिंतन पोहोचवू शकता.शेड्युल ट्विट बर्याच पद्धतीने सेट करता येतात पण आपण सगळ्यात सोपा मार्ग पाहूयात  शेड्युल ट्विट वापरण्यासाठी :

  1. सर्वप्रथम ट्विटरवर लॉगीन करा.
  2. त्यानंतर या दुव्यावर भेट द्या.
ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग

3. आता तुमची टाइमझोन सिलेक्ट करा. . (भारत - +०५००)

ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग

4. आता या दुव्यावर भेट द्या, आणि तुमची ट्विट लिहून तारीख आणि वेळ सेट करा. . .

ट्विटर आणी काही भन्नाट प्रयोग


टाइम ट्वीट किंवा Self destructing tweet – 


तुम्ही जर एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण ट्विटरवर देत असाल तर एकदा कार्यक्रम उरकल्यावर तुम्हाला निमंत्रण देणारी ट्वीट स्वतः काढून टाकावी लागते अन्यथा इतरांचा गोंधळ होण्याची शक्यता असते अशा वेळी Self destructing tweet वापरून तुम्ही तुमचे काम वाचवू शकता.  TwitterSpirit तुम्हाला या कामी मदतीस येईल.


  1. सर्वप्रथम TwitterSpirit या संकेतस्थळावर जा, आणी ट्विटर वापरून लॉगिन व्हा.
  2. आता तुम्ही TwitterSpirit ला तुमचे ट्विटर खाते वापरण्याची परवानगी द्या हे झाल्यांनतर तुम्हाला परत TwitterSpirit च्या संकेतस्थळावर पाठवण्यात येईल.
  3. यानंतर तुम्ही पुन्हा ट्विटरवर येऊन ट्वीट लिहू शकता पण ट्वीट लिहिताना त्यामध्ये टाइम हॅशटॅग लिहायला विसरू नका. जर ६ तासांसाठी ट्वीट राहू द्यायची असेल #6h जर १ मिनिटासाठी राहू द्यायची असेल तर #1m जर ३ दिवसांसाठी राहू द्यायची असेल तर #3d असे लिहा.

कसा होता तुमचा ट्विटरवरील अनुभव, आम्हाला जरूर कळवा.. आणी हो, आम्हाला ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. . @Netbhet


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment