गुगल हे प्रामुख्याने एक सर्च इंजिन आहे. त्यामुळे, जेव्हा आपले ग्राहक आपल्या व्यवसायाविषयी गुगलवर अधिक माहिती शोधत असतात, तेव्हा आपल्या गुगल बिझिनेस पेज वरची माहिती, फोटोज,व्हिडियोज त्यांना उजवीकडच्या बाजूला मिळू शकते. थोडक्यात गुगलसारख्या सगळ्यात मोठ्ठ्या सर्च इंजिनवर; आपल्या ग्राहकांना….आपल्याबद्दलची योग्य ती माहिती क्षणार्धात मिळण्याच्या दृष्टीने आपल्या व्यवसायाचे गुगल बिझिनेस पेज असणे आवश्यक आहे.
आपले चाहते कुठेही असोत, Google+ च्या सहाय्याने आपण त्यांना एकत्र आणून त्यांच्याशी Hangout च्या माध्यमातून बोलू शकतो. हे संभाषण रेकॉर्ड करून कालांतराने पुन:प्रक्षेपित करू शकतो.
आपल्या व्यवसायाचे गुगल बिझिनेस पेज म्हणजे आपल्या ब्रॅडची/व्यवसायाची गुगलवरील ओळख आहे. योग्य व्यक्तींपर्यंत योग्य गोष्टी पोचवण्याचा तो ऑनलाइन राजमार्ग आहे. आपल्या ओळखीच्याही नसलेल्या लाखो लोकांपेक्षा जास्त लोकांना आपल्या व्यवसायाविषयी माहिती पुरवण्याचा हा हक्काचा उपाय आहे. Google+ नवनवीन लोकांशी ओळख वाढवण्यास प्रवृत्त करते. नवीन ग्राहकांना आकर्षित करून घेणे, आपला ब्रॅंड वाढवणे आणि आपल्या ब्रॅंडच्या चाहत्यांना गुंतवून ठेवणे याकरता गुगल बिझिनेस पेज आपल्याला उपयोगी पडते.
गुगल बिझिनेस पेज तयार करण्याकरता आधी आपले Google+ प्रोफाईल असणे आवश्यक आहे. त्याच्या आधाराने पुढे आपल्याला हवी तितकी पेजेस तयार करता येतात. कोणते पेज कोणाच्या मालकीचे आहे हे मात्र यात कुणालाही कळू शकत नाही, त्यामुळे मागाहून या पेज करता मॅनेजर सुद्धा add करता येतो.
पेज कसे तयार कराल?
आकृती १
आपल्या Google+ खात्यात लॉगिन केल्यानंतर….
1. डावीकडील यादीतून pages वर क्लिक करा.
2. उघडलेल्या पानावर उजव्या कोप-यात create page लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करा.
आकृती २
1. व्यवसायाची योग्य ती category निवडा. जर आपल्या व्यवसायाकरता आपले ठिकाण ग्राहकांना कळावे, सापडणे सुलभ जावे असे वाटत असेल, तर local business or place हा पहिलाच पर्याय निवडून आपला देश आणि आपला मोबाइल नंबर दिलेल्या रकान्यात भरल्यावर, गुगल आपले lacation शोधण्याचा प्रयत्न करतो, ही category निवडल्यामुळे आपला व्यवसाय/ठिकाण Google Map वर दिसू शकते. Category निवडताना काळजीपूर्वक निवडावी कारण एकदा निवडल्यावर पुन्हा बदलाबदली करणे शक्य नसते.
2. आपला व्यवसाय Google Map वर दिसायला पाहिजे हा आग्रह नसेल तर इतर Category मधली एखादी निवडून page create करावे.
आकृती ३
1. जास्तीत जास्त १० शब्दांत आपल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती द्या.
2. वर्तुळावर क्लिक करून, set profile photo असा पर्याय आहे, तिथे असल्यास आपल्या व्यवसायाचा 500x500 पिक्सेल साइजचा लोगो ठेवावा.
आकृती ४ मध्ये जिथे २ आकडा दिसतोय त्याच्या बरोबर समोर..उजवीकडे change cover असे दिसते आहे. त्यावर क्लिक करून आपल्या page ला साजेसे असे cover page अपलोड करता येईल. हे cover page 2120 x 1192 पिक्सेल इतक्या size चे असायला हवे.
आकृती ५ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्या page ची सजावट आपणू करूया.
1. About वर क्लिक करून आपल्या page बद्दल ची माहिती लिहावी.
2. आपल्या व्यवसायाची website, You Tube Channle, Twitter Account इ. ज्या काही संबंधित गोष्टी असतील त्यांचे दुवे (links) इथे द्यावेत.
3. आपल्या व्यवसायाशी संबंधित काही photos, videos असल्यास ते देखील इथे द्यावेत. यामुळे संभाव्य ग्राहकाला आपल्या उत्पादनाची योग्य ती माहिती मिळू शकेल.
हे इतके झाल्यावर आता पेजवर post टाकायला काहीच हरकत नाही.
1. Home वर क्लिक केल्यावर पुढे ..
2. Share What’s new वर जाऊन पोस्ट टाईप करावी. त्यात एखादा photo, Video किंवा नुसती link जोडावी.
3. To मध्ये योग्य त्या व्यक्तिला / व्यक्तिंना किंवा सगळ्यांनाच(public) मिळेल याची खात्री करून
Share करावे.
डोमेन नेम विकत घेऊन आपल्या व्यवसायाकरता एखादी वेबसाइट तयार करणे सगळ्यांनाच शक्य असते असे नाही. अश्या वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याकरता गुगल+ बिझिनेस पेज सारखा मोफत उपाय छोट्या व्यावसायिकांना वरदानच ठरतो आहे.
गुगल प्लस मध्ये बिझनेस पेज बनवण्यासाठी सर्व माहिती या pdf document मध्ये मिळवता येईल.
श्रेया देवेंद्र रत्नपारखी
0 comments:
Post a Comment