मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीने नोकिया या आणखी एका बलाढय कंपनीला विकत घेतले. मोबाईल क्षेत्रात सर्वाधिक चमकलेला एक तारा निखळला.
२००६ मध्ये ज्या नोकिया कंपनीला जगातील सर्वोत्तम २० कंपन्यांपैकी एक असा बहुमान मिळाला होता त्याच नोकियाचे केवळ ७ वर्षात अधःपतन झाले. तुम्ही आम्ही पहिला मोबाईल हातात घेतला तो "नोकिया"चाच. कसाही वापरला, कितीही पडला-आपटला तरी हमखास चलणारच अशी नोकिया मोबाईलची ख्याती सर्वश्रुत होती.
भारतीयांनी नोकियाला पुरेपुर पाठींबा दिला. २-३ वर्षांपुर्वी तर नोकियाने भारतीयांचा सर्वात आवडता ब्रँड असा नावलौकिक मिळवला होता. नोकियाचा ३३१० आठवतो का ?
भारतीयांना मोबाईलचं वेड या ३३१० ने लावलं. याच मोबाईल मधल्या स्नेक गेम ने सर्वांना वेड लावलं होतं. त्यानंतर नोकियाने भराभर बरेच फोन बाजारात आणले. नोकिया ६६१०, नोकिया N-Gage, ९२१० Communicator, अंड्याच्या आकाराचा ६६०० , वीटेईतका जड असणारा N72, QWERTY कीपॅड असलेले E -series चे फोन्स, आणि नंतर आलेले नोकिया आशा , ल्युमिया असे अनेक फोन नोकियाने आणले. आता हे सर्व फोन जुने झाले. काळाच्या ओघात इतिहासजमा झाले. आणि काही दिवसांपूर्वी नोकिया ही कंपनी देखिल ईतिहासजमा झाली.
नोकियाने आपल्या सर्वांना "मोबाईल"युग अनुभवायला दिलं त्याबद्दल फिनलँड देशात जन्मलेल्या आणि जगभर पसरलेल्या या कंपनीचे मनापासून आभार ! नोकियाच्या आणखी एका चाहत्याने हा सर्व ईतिहास जोपासलाय आणि आपणा सर्वांसाठी तो ऑनलाईन माध्यमाद्वारे खुलाही केलाय. Alin Labau असे नाव असलेल्या या महाशयांनी नोकियाचं एक ऑनलाईन संग्रहालय तयार केलय. १९८२ सालापासुन नोकिया कंपनीने बाजारात आणलेल्या सर्व फोन्सची यात माहिती देण्यात आलेली आहे. सर्व फोन्सचे फोटो, थोडक्यात माहिती आणि वर्षांनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.
http://nokiamuseum.info या त्याच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपण भरपुर प्रेम केलेल्या पण पुन्हा कधीही न पाहता येणार्या मोबाईल फोन्सना पाहुनच connecting people चे बिरुद मिरवणार्या आपल्या लाडक्या नोकियाला शेवटचा निरोप द्या !
0 comments:
Post a Comment