तुम्ही क्लाऊड स्टोअरेज हा शब्द कधी एकलाय? क्लाऊड स्टोअरेज या शब्दाचा अर्थ असा, की तुमच्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्मधल्या फाईल्स एका विशिष्ट ठिकाणी साठवून ठेवणे. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष! आपल्या संगणकावर आपण ह्या फाईल्स साठवतोच की! अगदी मान्य, पण विचार करा, समजा तुम्ही काही महत्वाच्या कामाकरता बाहेर गेलात. तुमच्या संगणकापासून लांब आहात. आणि अश्या वेळी त्यातल्याच एखाद्या फाईलची तुम्हाला गरज भासली, तर? तर अश्या वेळेला गुगल ड्राइव्ह हे क्लाऊड स्टोअरेज तुमच्या मदतीला येऊ शकतं. तुमचे जर जीमेल खाते असेल, तर १५ जीबी इतकी जागा मोफत देणारं हे गुगल ड्राइव्ह क्लाऊड स्टोअरेज तुमच्या दिमतीला हजर आहे.
नुसते जीमेल खाते आणि गुगल ड्राइव्ह वर फाईल्स स्टोअर करून त्या वापरणार कशा? तर हे गुगल ड्राइव्ह संगणकावरून, स्मार्टफोन वरून आणि टॅबलेट्स वरून देखील वापरता येते. वर दिलेल्या दुव्या वर जाऊन संगणकाकरता असलेली गुगल ड्राइव्ह प्रणाली उतरवून आपल्या संगणकावर इन्स्टॉल करा. स्मार्ट फोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ते ही आपल्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल करून घ्या. आता तुम्ही कोणतीही फाईल संगणकावरून किंवा स्मार्टफोनवरुन गुगल ड्राइव्हवर अपलोड केलीत की एकाच वेळी ती फाईल तुम्हाला तुमच्या संगणकावरून, वेबवरून आणि स्मार्टफोन च्या माध्यमातून पाहता येते.
नुसती पाहाताच नाही तर तुम्हाला ती कुणाला पाठवायची असेल तर ईमेलमध्ये जोडून पाठवता देखील येते; खरं तर याची गरज भासू नये याकरता , त्या फाईलची नुसती लिंक देऊन सुद्धा ती हव्या त्या लोकांच्या बरोबर शेअर करता येते, इतर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बदलता येते. अगदी एकाच फाईलवर एकापेक्षा जास्त जणांना काम करायचे असेल तर ते ही करता येते, कारण ह्या गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्ही वर्ड डॉक्युमेंट फाईल, एक्सेल स्प्रेडशीट फाईल, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन फाईल, माहिती गोळा करण्याकरता फॉर्म्स, एखादे चित्र स्वत: काढायचे / तयार करायचे असल्यास अश्या ५ प्रकारच्या फाईल्स स्टोअर करू शकता, इथल्या इथे तयार करू शकता आणि इतरांबरोबर एकाच वेळी त्यावर कामही करू शकता.
इथल्या फाईल्समध्ये केला जाणारा बदल तात्काळ सेव्ह केला जातो, तो वेबवर, संगणकावर आणि स्मार्टफोन अश्या सगळ्या ठिकाणी एकाचवेळी पाहाता देखील येतो.
इतकेच नाही तर, तुम्हाला ईमेल मध्ये येणा-या फाईल्स देखील थेट ड्राइव्ह वर स्टोअर करू शकता, त्या उघडून वाचू शकता आणि त्यात बदल देखील करू शकता.
गुगल ड्राइव्ह कोण वापरू शकेल? तर ज्यांच्याकडे यापैकी खालील प्रणाली असतील तेच.
For Windows
Windows Vista
Windows XP
Windows 7
Windows 8
For Mac
Mountain Lion (10.8)
Lion (10.7)
Snow Leopard (10.6)
Mobile and tablet
For Android phones and tablets
Eclair and up (Android 2.1+)
For iPhone and iPad
iOS 5.0+
संगणकावर गुगल ड्राइव्ह इन्स्टॉल केल्यावर, गुगल ड्राइव्ह नावाचा एक फोल्डर तुमच्या संगणकात तयार होतो. तुमच्याकडच्या ज्या ज्या फाईल्स गुगल ड्राइव्ह वर ठेवायच्या आहेत त्या सगळ्या त्या फोल्डर मध्ये कट/पेस्ट करा. ज्या ज्या वेळी तुम्ही इंटरनेट्शी जोडलेले असाल त्या त्या वेळी तो संगणकावरचा फोल्डर वेब फोल्डर तपासून त्याप्रमाणे बदल करून घेत राहील. अश्या प्रकारे एकाचवेळी तुमचा डेटा तुम्हाला संगणकावर, वेबवर, स्मार्टफोन आणि टॅबलेटअवर देखील उपलब्ध होत राहील.
गुगल ड्राइव्ह कसे इन्स्टॉल कराल -
1. drive.google.com मध्ये आपल्या जीमेल पत्त्याचा वापर करून Log In करा.
2. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे 'डाऊनलोड गुगल ड्राइव्ह फॉर पीसी' असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर एक सेट अप फाईल ( googledrivesync.exe) आपल्या संगणकावर डाऊनलोड होईल. त्या फाईलवर डबलक्लिक करून ती इन्स्टॉल करून घ्यायची. (गुगल ड्राइव्ह+जीमेल+फोटो अशी एकत्रित १५ जीबी जागा मिळते. त्यामुळे १५ जीबी डेटा साठविण्याची सोय जिथे असेल त्या ड्राइव्हवर हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा )
३. आता स्टार्ट मेन्यू मध्ये जाऊन, प्रोग्रॅम मध्ये गुगल ड्राइव्ह च्या शॉर्ट कट वर क्लिक केल्यावर संगणकावरचा गुगल ड्राइव्ह फोल्डर उघडेल. यात आपण आपल्याला हव्या त्या फाईल्स मूव्ह करून ठेऊ शकतो. जेव्हा हा फोल्डर आपल्या जीमेल खात्याशी संलग्न केला जाईल (आपल्या गुगल अकाउंटचे Username आणि Password वापरून) तेव्हा या सगळ्या फाईल्स आपण गुगल ड्राइव्ह वेब माध्यमातून देखील वापरू शकू.
गुगल ड्राईव्ह मध्ये फाईल अपलोड कसे कराल -
१. गुगल ड्राईव्ह वर जिथे Create असे लिहिले आहे, त्याच्या शेजारीच एक वरच्या दिशेने असलेल्या बाणाचे चित्र आहे. आपल्याला गुगल ड्राइव्ह वर फाईल्स अपलोड करण्याकरता त्या बाणावर क्लिक करून फाइल्स वर क्लिक करून आपल्या संगणकावरच्या हव्या त्या फाईल्स निवडून गुगल ड्राइव्हवर अपलोड कराव्या.
गुगल ड्राईव्ह मध्ये आपण पूर्ण फोल्डर देखील अपलोड करू शकता.
गुगल ड्राईव्ह मध्ये फाईल शेअर कशी कराल -
१. अपलोड केल्यावर, अपलोड डायलॉग बॉक्स मध्येच फाईलच्या नावासमोर शेअर हे बटण असेल ते क्लिक करावे.
किंवा फ़ाईल समोरील Check Box ला सिलेक्ट केल्यावर (खालील आकृतीत बाण १) शेअरिंग चे एक चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा (खालील आकृतीत बाण २)
गुगल ड्राईव्ह मध्ये फाईल शेअर करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
१. फ़ाईलची लिंक (दुवा) शेअर करणे (खालील आकृतीत बाण A)
२. फ़ाईल सोशल मिडीया वेबसाईट्स मध्ये शेअर करणे (खालील आकृतीत बाण B)
३. कोणत्याही ईमेल पत्त्यासोबत फाईल शेअर करणे (खालील आकृतीत बाण C)
तिसऱ्या प्रकारात कोणत्याही ईमेल पत्त्यासोबत फाईल शेअर करण्यासाठी आणखी उपप्रकार उपलब्ध आहेत ते पुढील प्रमाणे ( हे उपप्रकार पाहण्यासाठी वरील आकृतीत दाखविलेल्या बाण C वर क्लिक करा ) -
1. Public on the web - हा पर्याय निवडल्यास आपली फाईल गुगल सर्चच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध राहते.
2. Anyone with the link - हा पर्याय निवडल्यास आपल्या फाईलची लिंक ज्या व्यक्तींकडे आहे अशाच व्यक्ती फाईल पाहू शकतात.
3. Private - हा पर्याय निवडल्यास आपली फाईल केवळ तुम्ही परवानगी दिलेल्या व्यक्तॆंनाच पाहता येते. फ़ाईल पाहण्यासाठी ज्या व्यक्तींनी फाईल पाहणे अपेक्षित आहे त्यांना log in करणे आवश्यक असते.
मित्रहो , गुगल ड्राईव्ह चे फ़ाईल बनविणे , फाईल सुरक्षीत ठेवणे , फ़ाईल कोठूनही केव्हाही पाहता येणे , अवजड फाईल्स पाठवता येणे, एकाच वेळी अनेक व्यक्तॆंसोबत फाईल्स Edit करता येणे असे अनेक फायदे आहेत. तेव्हा आजच गुगलच्या या अफलातून सेवेचा लाभ घ्या.
श्रेया देवेंद्र रत्नपारखी
0 comments:
Post a Comment