गुगल कंपनी आणि या कंपनीचे सर्च्,जीमेल, गुगल प्लस, जीटॉक, गुगल डॉक्स असे अनेक प्रॉडक्ट्स आपण नेहमी वापरतो. पुर्णपणे मोफत आणि अतीशय उपयक्त अशा गुगल उत्पादनांनी आपले जीवनच बदलवून टाकले आहे. अनेक अभिनव उत्पादने सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देणार्या गुगल कंपनीने आणखीन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता तो २०१० साली. अकदी अशक्य आणि अतर्क्य वाटणार्या या प्रकल्पाचे नाव होते "Google self driving car" म्हणजेच स्वतः चालणारी चालक विरहीत कार.
ऑनलाईन क्षेत्रात काम करणार्या या कंपनीने अचानक गाड्यांच्या क्षेत्रात कसे पाउल टाकले याचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांवरील अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी, कमीतकमी इंधनाचा वापर करणारी आणि रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरक्षीत करणारी कार बनवून गुगलने तंत्रज्ञानाची दैनंदीन जीवनाशी सांगड घालण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
गुगलची अत्याधुनीक स्वयंचलीत कार अनेक व्हीडीओ कॅमेरे, लेझर आणि रडार सेन्सर्स, गुगल मॅप्स आणि गाडीमध्येच बसवण्यात आलेल्या संगणकाच्या सहाय्याने चालते. गुगलची ही कार बाजारात येण्यास अजून बराच अवकाश आहे. सर्व काटेकोर नियमांवर आणि निकषांवर खरी उतरल्यानंतरच अशा प्रकारच्या गाड्यांना रस्त्यावर उतरवण्याची परवानगी मिळेल. मात्र सध्या अशा एका कारचे परीक्षण अमेरीकेत केले जात आहे.
नुकत्याच या स्वयंचलीत कारने २,००,००० मैल चालण्याचा पल्ला गाठला. हे औचित्य साधून गुगलने या गाडीचा एक व्हीडीओ प्रकाशीत केला. यात स्टीव महन (Steve Mahan) या अंध व्यक्तीला बसविण्यात आले होते. संगणकाच्या सहाय्याने चालणार्या या गाडीत स्टीव ड्राईवर सीटवर बसला होता. मात्र स्टीअरींग व्हीलला हातही न लावता त्याने प्रवास केला. उत्कृष्टरीत्या बनविण्यात आलेला हा ३ मिनिटांचा व्हीडीओ अवश्य पाहण्यासारखा आहे.
गुगलने नेहमीच भविष्यातील गरजा ओळखून आपली उत्पादने बनविली आहेत. भविष्यातील वाहने कशी असतील हे दाखवून देऊन गुगलने पुर्ण जगाला पुन्हा एकदा नवी दिशा दाखविली आहे.
Sunday 3 June 2012
Tagged under: इंटरनेट (internet);, सृजनशीलता (Creativity)
गुगलची नवी स्वयंचलित कार -( Google self driving car )
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment