मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे (Microsoft Excel) आणखी काही उपयोगी functions !
Exact (text1,text2)
- मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील दिलेले दोन शब्द एकसारखे आहेत की नाही हे तपासण्यासाठी EXACT हे फंक्शन वापरता येते.
उदाहरणार्थ -
खालील कोष्टकामध्ये कॉलम B1 आणि C1 मध्ये लिहिलेला शब्द एकच असला तरी अक्षरे वेगळी आहेत आणि त्यामुळे शब्द भिन्न अहेत. या दोन भिन्न cells मधील शब्द सारखे आहेत किंवा नाहित हे जाणण्यासाठी =EXACT(B1,C1) असा फॉर्म्युला वापरल्यास TRUE किंवा False असे उत्तर येईल.
LEN(text)
एखाद्या cell मधील दिलेल्या शब्दातील एकूण अक्षरे मोजण्यासाठी LEN हे फंक्शन वापरता येते.
उदाहरणार्थ खाली A1 मध्ये Salil असे लिहिले आहे. म्हणजे एकूण पाच अक्षरे. यामध्ये =LEN(A1) असा फॉर्म्युला वापरल्यास उत्तर ५ असे येईल.
TRIM("text") -
दोन किंवा अधिक शब्दांमधील अनावश्यक मोकळ्या जागा काढून टाकण्यासाठी TRIM हे फंक्शन वापरतात.
उदाहरणार्थ
खाली दिलेल्या चित्रामध्ये सेल A2 मध्ये दिलेल्या वाक्यामधील शब्दांत अनावश्यक मोकळ्या जागा आहेत. सेल C3 मध्ये TRIM फंक्शन वापरुन त्यातील सर्व स्पेसेस काढून टाकल्या आहेत आणि दोन शब्दांमध्ये फक्त एकच मोकळी जागा आहे.
हे तीन नविन फंक्शन्स जरूर वापरून पहा. तुम्हाला एक्सेल मास्टर बनविण्यास हे फंक्शन्स नक्कीच उपयुक्त ठरतील. आपले अभिप्राय अवश्य कळवा.
Monday 27 February 2012
Tagged under: Microsoft excel functions in marathi, संगणक
मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे (Microsoft Excel) आणखी काही उपयोगी functions !
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment