300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday 22 February 2012

Tagged under:

फेसबुकचे उत्पादन - आपण !


फेसबुकचा आयपीओ येतोय. भांडवली बाजारात आता फेसबुकच्या समभागांची विक्री होणार आहे. आणि फेसबुकची एकुण अंदाजे किंमत ठरवण्यात आली आहे तब्बल १०० बिलियन अमेरीकन डॉलर्स. (१ बिलियन म्हणजे १०० करोड! असे १०० बिलियन !)

सिलिकॉन व्हॅलीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ आहे. केवळ ६-७ वर्षातच एवढ्या मोठ्या झालेल्या फेसबुकचा प्रवास आश्चर्यकारक आहे. फेसबुकचे वापरकर्ते म्हणजे लोकसंख्या आहे असे मानले तर फेसबुक जगातील तिसरा सर्वात मोठा देश ठरेल. इंटरनेट वापरणार्‍यांपैकी  (किंवा हा लेख वाचणार्‍यांपैकी !) सर्वच जण फेसबुक वापरत असतील. अहो पाहता पाहता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी फेसबुक सारखी असामान्य (अद्भुत !) कंपनी बनविली.

बरोबर की नाही ! मार्क झुकरबर्गने तर फक्त कंपनी सुरु केली. लाइक करुन, फोटो शेअर करुन, स्टेट्स अपडेट करुन, कमेंट्स देऊन आपणच मोठं केलं फेसबुकला जर आपल्यामुळे फेसबुक एवढी मोठी झाली आहे तर यात "आपल्याला काय फायदा?" हा विचार कधी तुमच्या मनात आला का? फेसबुकची किंमत १०० बिलियन डॉलर्स इतकी ठरवण्यात आली आहे. म्हणजे प्रती वापरकर्ता ११८ डॉलर्स ! तुम्ही वेळोवेळी जे फोटो पाहिले, अपलोड केले, लाईक केले, अपडेट केले, फेसबुक वर तासनतास घालवले त्याची किंमत तुम्हाला मिळाली का? की तुम्ही मोफतच केले  हे सर्व काही ? अरे वा ! एरवी एखाद्याला एक रुपया पण फु़कटात न देणार्‍यांनी फेसबुकला (मार्क झुकरबर्गला) अब्जोपती बनवलं !


मित्रांनो, स्पष्टच सांगायचं तर फेसबुकने आपल्याला विकलंय. होय, फेसबुकचं उत्पादन म्हणजे आपण आहोत. रोज लगबगीने ऑनलाईन जाउन फेसबुक लॉग्-ईन करताना कदाचित लक्षात आले नसेल पण हे सत्य आहे. आपल्या भावना, संवाद, फोटो, वय, आवडी-निवडी, ऑनलाईन संवांदातून व्यक्त होणारा आपला स्वभाव या सर्व गोष्टी जाहिरातदारांना विकल्या जातात.

फेसबुकने आपली ही संपत्ती वापरकर्त्यांसोबत वाटून घ्यावी अशी एक विचारधारा निर्माण होऊ लागली आहे. संगणक तज्ञ जेरॉन लॅनीअर (Jeron Lanier) याने हा मुद्दा पहिल्यांदा मांडला. फेसबुकने आपल्या युजर्सना पैसे द्यावेत किंवा किमान एक शेअर (समभाग) तरी द्यावा अशी विनंती त्याने केली. अर्थात तसे काही होण्याची शक्यता कमीच आहे पण एकदा का जनमानसात अशी लाट उसळली तर फेसबुकचे होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. ऑर्कूट आठवतं का ? एकेकाळी तासनतास ऑर्कूट कट्ट्यावर पडून राहणार्‍यांनी ऑर्कुट कडे अशी पाठ फिरवली की जणू त्यांनी कधी ऑर्कुट पाहिलेच नाही.

सांगण्याचा मुद्दा हाच की तुम्ही आपला बहुमुल्य वेळ मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबाला न देता फेसबुक ला देत आहात आणि यातुन तुमचं नुकसान आणि साता समुद्रापार बसलेल्या मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या कंपनीचा फायदा होतोय. तेव्हा पुढच्या वेळेला फेसबुक लॉग्-इन करताना सावधान !!!

(हा लेख आवडल्यास फेसबुक वर लाईक/ शेअर करायला विसरु नका !! हाहाहा !!!)


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment