URL forwarding मु़ळे जरी ब्लॉगला स्वतःचे डोमेन नाव मिळत असले तरी ब्लॉगमधील ईतर लेखांच्या लिंक्स मात्र झाकल्या (Hide) जायच्या. त्यामुळे URL पाहुन आपण ब्लॉगवर नक्की कोठे आहोत याची वाचकाला काहीच कल्पना येत नसे. आज मी या लेखाद्वारे आपल्या ब्लॉग्जसाठी co.cc हे .com, .in, .net किंवा .org सारख्या नियमीत वापरल्या जाणार्या डोमेन नावांप्रमाणे कसे वापरावे ते सांगणार आहे. (फक्त blogger.com वरील ब्लॉग्जसाठी ही युक्ती आहे, wordpress.com वरील ब्लॉग्जसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आलेली नाही)
या पुर्ण पद्धतीचे तीन मुख्य भागांमध्ये विभाजन करता येईल. -
- Co.cc या साईटवर खाते उघडून नविन डोमेन रजिस्टर करणे.
- आपल्या नविन co.cc डोमेनवर आपला ब्लॉग सेट-अप करणे.
- आपल्या ब्लॉगर ब्लॉग मध्ये co.cc डोमेन सेट-अप करणे.
१. http://www.co.cc/ या संकेतस्थळास भेट द्या आणि या Create an account now या लिंकवर क्लिक करुन सभासद व्हा.
२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे Getting a new domain या लिंक वर क्लिक करुन आपले डोमेन नाव रजिस्टर करा. (प्रत्येक सभासदास जास्तीत जास्त चार डोमेन नावे मोफत मिळवता येतात. )
३. आपले डोमेन निवडा, ते उपलब्ध आहे का ते पहा आणि मग रजिस्टर करा. मी येथे उदाहरणादाखल www.salilchaudhary.co.cc हे डोमेन नाव रजिस्टर केले आहे.
आपल्या नविन co.cc डोमेनवर आपला ब्लॉग सेट-अप करणे.
१. Domain settings वर क्लिक करा. खाली दाखविल्याप्रमाणे एक तक्ता दिसु लागेल. त्यापैकी तुम्ही नोंदवलेल्या डोमेन नावावर क्लिक करा.
२. आता Set Up या बटणावर क्लिक करा.
३. डोमेन सेट-अप करण्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे चार पर्याय दीसतील.
४. त्यापैकी दुसरा म्हणजे Zone records हा पर्याय निवडा.
५. खाली दिल्याप्रमाणे झोन रेकॉर्ड्सच्या किंमती लिहा.
Host - www.salilchaudhary.co.cc (येथे तुमचे डोमेन नाव लिहा, www. लिहिण्यास विसरु नका)
TTL - 1D
Type - CNAME
Value - ghs.google.com
६. Set up या बटणावर क्लिक करा.खालीलप्रमाणे नविन डोमेन नावाचा Zone record दीसेल.
आपल्या ब्लॉगर ब्लॉग मध्ये co.cc डोमेन सेट-अप करणे.
१. Blogger.com मध्ये लॉग-ईन करुन ज्या ब्लॉगसाठी डोमेन नाव सेट अप करायचे आहे त्या ब्लॉगच्या Dashboard मध्ये Settings >> Publishing येथे जा.
मी माझ्या salilpro.blogspot.com या ईंग्रजी ब्लॉगसाठी www.salilchaudhary.co.cc हे डोमेन नाव वापरले आहे. क्लिक करा आणि जरुर पहा.
२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे कस्टम डोमेन या लिंकवर क्लिक करा.
३. येथे Switch to advance setting अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
४. आता तुम्ही निवडलेले डोमेन नाव येथे लिहा (www सहित), word verification साठी दिलेला शब्द लिहा आणि save settings या बटणावर क्लिक करा.
५. Congratulations, your blog is ready ! असा संदेश दिसु लागेल. (असे नाही दिसले तर काहीतरी चुक झाली आहे असे समजा आणि पुन्हा प्रत्येक पायरी बरोबर तपासुन पहा)
अभिनंदन आता तुमचा ब्लॉग स्वतःच्या डोमेन नेमवर जाण्यासाठी तयार झालेला आहे. मात्र डोमेन नेम Activate होण्यासाठी ४८ तासांचा अवधी जावा लागतो. तेव्हा थोडा संयम बाळगावा लागेल.
यापुढे वाचकांनी ब्लॉगचे नाव (उदाहरणार्थ - myblog.blogspot.com ) टाईप केले तरी ते आपोआप डोमेन नावावर म्हणजे www.myblog.co.cc वर वळवले जातील.
या सेवेचा वापर करुन आपल्या ब्लॉगसाठी तुम्ही बनविलेले डोमेन नाव खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरु नका. तुमच्या प्रोफेशनल ब्लॉगला नव्हे वेबसाईटला भेट द्यायला आम्हाला ( आणि इतर वाचकांना) खुप आवडेल.
मित्रांनो ब्लॉगला डोमेन दिल्यावर ब्लॉग प्रोफेशनल दिसु लागेल तसेच ब्लॉगर (म्हणजे तुम्ही !) प्रोफेशनल आहे हे दाखविण्यासाठी आणखी एक जबरदस्त युक्ती आपण उद्याच्या लेखात पाहणार आहोत. So stay Tuned..................... !
0 comments:
Post a Comment