तंत्रज्ञानाने आजच्या जगात अनेक परीणामे बदलली आहेत. पुर्वी जसे कामकाज, व्यवसाय केला जायचा त्या पद्धती आता तंत्रज्ञानामुळे, इंटरनेटमुळे कमालीच्या बदलल्या आहेत. दहा वर्षांपुर्वी अगदी छोट्याश्या कामासाठी सुद्धा बँकेमध्ये रांगेत उभे रहावे लागायचे पण इंटरनेट बँकीग, मोबाईल बँकींग वापरु लागल्यापासुन "बँके"चा चेहरा पहायलाही लागला नाही. असे असले तरी सरकारी कामे मात्र अजुन कचेरीत (सरकारदरबारी) चार हेलपाटे खाल्याशिवाय पुर्ण होतच नाहीत. फक्त माहिती देणार्या वेबसाईट्स सर्व सरकारी विभागांनी बनवील्या एवढीच काय ती त्यांची इंटरनेट प्रगती. इंटरनेटच्या खर्या ताकदीचा वापर अजुन तरी शासकीय विभागांमध्ये दीसत नाही.
पण नुकताच महाराष्ट्र पोलीस विभागाने एक नविन वेब अप्लिकेशन वापरुन याला अपवाद निर्माण केला आहे. महाराष्ट्र पोलिस खात्याने सामान्य जनतेसाठी एक ई-तक्रार निवारण केंद्र चालु केले आहे. याद्वारे नागरीकांना ईमेल द्वारे पोलिसांत तक्रार नोंदवता येणार आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी http://gms.maharashtra.gov.
पडताळणीचा शब्द (Verification Code) वापरुन पुढे तक्रारीची सद्यस्थीती पाहता येईल आणि उच्च अधिकार्यांकडे पाठपुरावाही (Escalate) करता येईल.
मात्र ही सुविधा वापरण्याआधी महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात घ्या -
- चुकीची तक्रार करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे.
- पोलिसांनी आपणास संपर्क करण्यासाठी आपली सविस्तर माहिती आवश्यक आहे.
- संकटसमयी या प्रणालीचा वापर करण्याऐवजी नजदिकाच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा
महाराष्ट्र पोलिसांच्या (म.पो. - याला आम्ही कॉलेजमध्ये असताना गमतीने "मला पोसा" असे म्हणायचो. उगाचच आठवलं) या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन.
सुजाण नागरीकांनो आता "हॅलो ईन्स्पेक्टर" म्हणण्यापेक्षा "Dear Inspector" म्हणा !
0 comments:
Post a Comment