म्हटलं यावरही काही युक्ती असेल जरा नेटवरती फेरफटका मारून बघुया काही शोध लागतो का ते !!!
आणि शोध लागला मंडळी !!! आपल्याला माहीत असलेल्या नेहमीच्या सोफ्टवेअरच्या आधारे आपल्याला नक्कीच अशा व्हिडीओ मधुन image capture करता येते.
त्या सोफ्टवेअरचे नाव आहे VLC Media Player. मला वाटते हा मिडिया प्लेयर ज्यांना माहीत नाही असे फार कमी असतील तसेच हा Install करण्यासदेखील अतिशय सोपा आहे.
जर तुमच्या कडे VLC Media Player नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून तो डाऊनलोड करावा लागेल तुम्हाला.
मला हवी असलेली व्हिडीओ फाईल मी VLC मध्ये Play करण्यासाठी मी त्या फाईलवर Right click केले आणि Open with -------> VLC Media Player हा पर्याय निवडला.
आणि माझा व्हिडीओ सुरु झाला. मला त्यातला एक विनोदी क्षण टिपावासा वाटला.
त्या साठी मी व्हिडीओ सुरु असताना वरील मेन्युबार मधून Video या पर्यायातून Snapshot हा पर्याय निवडला.
माझी ही image मला png या फॉरमेट मध्ये My Pictures या फोल्डर मध्ये दिसेल त्यासाठी मी Start या बटणावर क्लिक करून My pictures हा पर्याय निवडाला.तुम्ही हवे असल्यास नंतर त्या image चा फॉरमेट बदलू शकता त्यासाठी फॉरमेट फॅक्टरी आहेच की काय बरोबर ना !!!
माझ्या समोर My picture ची विंडो ओपन झाली. तिकडे मला मी निवडलेली (म्हणजेच Snapshot ची) image सापडली. आता मला हव्या त्या images मी सिनेमा बघताना निवडू शकतो.
तुमचा व्हिडीओ दिसायला जितका स्वच्छ (Clear )असेल तितकीच तुमची Image सुद्धा स्वच्छ असेल.
चालत्या व्हिडीओतून आपल्याला हवी तशी आणि हवी तेव्हा image capture (फोटो काढण्याची/ निवडण्याची) ही झटपट युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा.
तसेच तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचना देखील कळवा.
तुम्हाला जर काही संगणकाविषयी समस्या असतील तर त्यांचे ही नेटभेट वर स्वागत आहे.
प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.com
0 comments:
Post a Comment