ब्लॉगर ने टेम्प्लेट डीझाईन करण्यासाठीची सोपी पद्धत विकसीत केली आहे. या पद्धतीला WYSIWYG असे म्हणतात. WYSIWYG म्हणजे What You See Is What You Get. याचाच अर्थ टेम्प्लेट बनवताना आपण दिलेल्या अनेक पर्यायांपैकी पर्याय निवडत जायचे, त्यासाठीचा कोड आपोआप तयार होत जातो. चला तर मग आपली स्वतःची टेम्प्लेट करुया. (आता तरी जुनाट, निरस ब्लॉगर टेम्प्लेट बदलुन ब्लॉगला रंगरंगोटी करायला तयार व्हा !)
( उदाहरणार्थ मी माझ्या www.salilchaudhary.co.cc या ब्लॉगसाठी नुकताच डीझाईन केलेली नविन टेम्प्लेट पहा.)
सध्या ही सुविधा draft.blogger.com येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. draft.blogger.com ला भेट देउन लॉग्-ईन करा.
ब्लॉगच्या Dashboard मध्ये Layout चा पर्याय निवडा.
येथे नविन Template Designer चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे टेम्प्लेटसचे अनेक पर्याय दीसतील. डाव्या बाजुला असलेले Templates , Background , Layout आणि Advanced असे चार मुख्य पर्याय दीसतील. या प्रत्येक पर्यायाची आता आपण माहिती घेउया.
1. Templates -
येथे Simple , Picture window , Awesome inc आणि watermark असे चार टेम्प्लेटसचे पर्याय दीसतील. या प्रत्येक पर्यायाखाली टेम्प्लेटचे चार आणखी पर्याय दीसतील. म्हणजे एकुण सोळा पर्यायांपैकी टेम्प्लेटची बेसीक डिजाईन निवडता येईल. यापैकी तुमची आवडती टेम्प्लेट निवडा. (फक्त एवढेच पर्याय आहेत हे पाहुन चिंताग्रस्त होऊ नका, पुढे बरीच कलाकुसर करायची आहे)
2. Background -
तुम्ही निवडलेल्या टेम्प्लेटची रंगसंगती बदलण्याचे अनेक पर्याय येथे दीसतील. तसेच ब्लॉगचे Background बदलण्यासाठी अनेक पर्याय दीसतील. (खालील चित्र पहा)
यामधुन ब्लॉगसाठी आवडती रंगसंगती निवडा आणि आवडते Background निवडण्यासाठी वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे क्लिक करा. येथे Background images चा खजिनाच दडलेला आहे. एवढेच नव्हे तर ब्लॉगच्या विषयानुसार Background images चे वर्गीकरण देखिल केले आहे.
उदाहरणार्थ पाककृती , कला, तंत्रज्ञान , निसर्ग , विज्ञान , मनोरंजन , हस्तकला अशा अनेक विषयांना अनुसरुन Background images येथे दीसतील. त्यापैकी आवडत्या Background image वर क्लिक केल्यास आपोआप आपल्या ब्लॉगवर ती टेम्प्लेट (आणि Background image) कशी दिसेल त्याचे प्रात्यक्षीक खाली पाहता येईल.
3. Layout -
ब्लॉग टेम्प्लेट डीझाईनींग मधील हा सगळ्यात कठीण भाग आहे मात्र टेम्प्लेट डीझाईनर मुळे हे काम चुटकीसरशी संपवता येते. Layout मध्ये तीन उपपर्याय दीसतील ते असे - Body Layout , Footer Layout, Adjust width.
- Body Layout - टेम्प्लेटसाठी एक कॉलम, दोन कॉलम , तीन कॉलम किंवा चार कॉलम असे प्रकार येथे निवडता येतात. त्याचप्रमाणे Sidebar डाव्या बाजुला असावा की उजव्या ते देखील येथे निवडता येते.
- Footer Layout - Footer म्हणजे ब्लॉगच्या पायथ्याजवळील भाग. हा भाग एक कॉलम, दोन कॉलम किंवा तीन कॉलम प्रकारात मोडणारा असावा ते येथे निवडता येते.
- Adjust width - ब्लॉगची रुंदी आणि साईडबारची रुंदी बदलण्यासाठी हा पर्याय वापरावा. (मला टेम्प्लेटसंबंधी विचारल्या जाणार्या प्रश्नांमध्ये याबद्दल सर्वात जास्त विचारणा होत असे. आता मात्र ब्लॉगर्सना स्वतःच आपल्या ब्लॉगची रुंदी कीती असावी ते ठरवता येईल.
ब्लॉगर मित्रांनो आता अजिबात थांबु नका . त्वरीत draft.blogger.com ला भेट द्या आणि आपल्या ब्लॉगला नविन रुपात सजवा.
या लेखाबद्दल प्रतीक्रीया अवश्य द्या आणि तुमच्या ब्लॉगचे नाव देखिल. (त्यामुळे मला तुमचा ब्लॉग पाहताही येईल आणि तुमच्या ब्लॉगचा pagerank आणि trafic वाढण्यास मदत होईल )
0 comments:
Post a Comment