300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 24 January 2010

Tagged under:

विमा पॉलिसी व्यतीरीक्त कर वाचवण्याचे आणखी उपाय तुम्हाला माहित आहेत का? भाग १



प्रत्येक वेळी मार्च महिना जवळ आला की कर वाचवण्यासाठी कीतीतरी गुंतवणुकीचे पर्याय आपल्यासमोर येतात. विमा पॉलिसी उतरवणे हा अशा गुंतवणुकींचा हमखास उपाय आपणा सर्वांना ठाउक आहेच. मात्र दुर्दैवाने भारतामध्ये विमा योजना या संरक्षणासाठी नव्हे तर कर वाचवण्यासाठी घेतल्या जातात (कारण त्या याच कारणासाठी विकल्या जातात).
मात्र विमा योजनांव्यतीरीक्त इतरही अनेक योजना सेक्शन 80C अंतर्गत करबचतीसाठी उपलब्ध आहेत.आज आपण अशाच काही गुंतवणुकीच्या पर्यायांची थोडक्यात माहिती घेऊयात.
सेक्शन 80C अंतर्गत जस्तीत जास्त रुपये १०००००/- (एक लाख) पर्यंतची गुंतवणुक करु शकतो. या सेक्शन अंतर्गत येणार्‍या गुंतवणुक प्रकारांची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे -

1. Employee provident fund (EPF) - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

गुंतवणुकीचा हा सर्वात प्राथमिक प्रकार म्हणुन ओळखला जातो. EPF कोठेही जाउन विकत घेण्याची आवश्यकता नसते. नोकरीवर रुजु झाल्यादिवसापासुन या गुंतवणुकीची सुरुवात होते. EPF मध्ये एकुण बेसिक (Basic + DA ) पगाराच्या १२% इतकी रक्कम गुंतवली जाते. याव्यतीरीक्त कंपनीतर्फे तेवढीच म्हणजे basic + DA च्या १२% इतकी रक्कम जमा केली जाते. कंपनीने जमा केलेल्या या रकमेपैकी ८.३३% हे employee pension scheme (EPS) व ३.६७% हे EPF मध्ये जमा केले जातात. EPF वर करमुक्त व्याजही मिळते. सध्या EPF वर मिळणार्‍या व्याजाचा दर ८.५% (द.सा.द.शे.) इतका आहे.
EPF मुदत तुम्ही जोपर्यंत नोकरीत आहात तोपर्यंत असते.

2. Public provident fund (पब्लिक प्रोव्हिडंट फंड) PPF

EPF नंतर दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे PPF. कमीत कमी १५ वर्षांसाठी ८% या व्याजदराने प्रतीवर्षी जास्तीत जास्त रुपये ७०००० इतकी गुंतवणुक PPF मध्ये करता येते. PPF च्या गुंतवणुकीला पुर्णपणे सरकारी सुरक्षा लाभलेली असल्याने या गुंतवणुकीत कोणतीही जोखिम नाही. तसेच PPF मधुन मिळणारे उत्पन्न पुर्णपणे करविरहीत असते हा आणखी एक फायदा.
दीर्घमुदती गुंतवणुक म्हणुन PPF कडे पहावयास हवे. प्रतीवर्षी जास्तीत जास्त १००००० रुपये इतकी रक्कम आपणास टॅक्स बचतीसाठी गुंतवता येते त्यापैकी ७०००० रुपये प्रतीवर्षी असे १५ वर्षांकरीता जर आपण गुंतवले तर मुदतीअखेर आपणांस एकरकमी १९ लाख रुपये मिळतील आणि ते देखिल पुर्णपणे करमुक्त.

3. National Savings certificate (NSC) - राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

NSC मध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचा सहा वर्षांमध्ये १ लाख ६ हजार रुपये इतका परतावा मिळतो. यामध्ये एकरकमी गुंतवणुक करायची असते. गुंतवलेल्या रकमेवर मिळालेले व्याज दर सहा महिन्यांनंतर मुळ रकमेमध्ये समाविष्ट केले जातात आणि या रकमेवर पुढील सहा महिन्यांचे व्याज मिळते.
NSC मध्ये जास्तीत जास्त सहा वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात.

4. Fixed Deposits (मुदत ठेव) -

पोस्ट ऑफीस किंवा बँकांमध्ये पाच वर्षे किंवा त्याहुन अधिक काळासाठी ठेवलेली रक्कम ही सेक्शन 80C च्या अंतर्गत करसवलतीसाठी पात्र ठरते. 80C च्या अंतर्गत सर्व योजना या फक्त कमावत्या तरुणांसाठी असुन निवृत्त झालेल्या जेष्ठ नागरीकांसाठी मात्र यापैकी एकही योजना नसते या ज्येष्ठ नागरीकांच्या भावनेला छेद देणारा हा गुंतवणुकीचा पर्याय आहे.
वेगवेगळ्या बँका ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच मुदत ठेवींसाठी नक्की किती व्याजदर असेल हे सांगता येत नाही मात्र साधारणतः मुदत ठेवींचा व्याजदर ५.७०% ते ८.२५% यादरम्यान असतो.

5. Seniour citizen savings scheme (SCSS) ज्येष्ठ नागरीक बचत पत्र योजना

या पर्यायाअंतर्गत निवृत्त नागरीक एक मोठी रक्कम एकरकमी गुंतवु शकतात आणि यावर मिळणारा व्याजदरही चांगला मिळतो.
जर तुमचे वय साठ वर्षे किंवा त्याहुन अधिक असेल (किंवा ५५ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असेल ) तर तुम्ही जास्तीत जास्त रुपये १५ लाख इतकी रक्कम जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत गुंतवु शकता. या रकमेवर तुम्हाला परतीवर्षी ९% इतका व्याजदर मिळतो मात्र या योजनेअंतर्गत मिळालेले व्याज करमुक्त नसते.

मित्रांनो या झाल्या पुर्णपणे सुरक्षीत म्हणजेच No Risk योजना. या योजनांपेक्षा जास्त परतावा मिळवुन देणार्‍या ईतरही अनेक योजना आहेत मात्र त्यांमध्ये असलेली जोखीमही तेवढीच जास्त आहे. अशा योजनांची माहिती आपण पाहुया पुढील लेखात.

(मला स्वतःला या क्षेत्रातील जास्त ज्ञान वा अनुभव नाही आहे. मात्र तरीही मराठी वाचकांसाठी इंटरनेटवर इतरत्र असलेली माहिती वाचुन ती येथे सोप्या भाषेत देण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. मी वाचकांना विनंती करेन की आपणांस या विषयांबद्दल अधिक माहिती असल्यास इतरांच्या फायद्यासाठी कृपया या लेखाच्या प्रतीक्रीयांमध्ये ती मांडावी. किंवा यावर लेख लिहुन आम्हांला पाठविल्यास आम्ही नेटभेटवर आपल्या नावासहित जरुर प्रकाशित करु.)

Image Credits


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


0 comments:

Post a Comment