300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 25 December 2009

Tagged under: ,

thecolor.com - Let's start coloring !

लहानपणी आपण सर्व शाळेत चित्रकला हा विषय शिकलो आहोत. आधी खडुचे रंग नंतर स्केच पेन, अजुन मोठे झाल्यावर वॉटर कलर आणि त्यानंतर ऑईल कलर्स असा चित्रकलेचा प्रवास विद्यार्थीदशेत सर्वांनीच अनुभवला असेल. पण आता मोठे झालो आणि या संगणकाच्या दुनियेत जिथे साधा कागद-पेन देखील कधीतरीच वापरायची गरज भासते तिथे रंग आणि ब्रश तर दुरच राहीले.

तुम्ही विचारात पडला असाल की मी आज अचानक भुतकाळात कसा पोहोचलो? ईंटरनेटवर फिरता फिरता एक वेबसाईट पाहण्यात आली आणि एकदम बालपणाची आठवण झाली. लहान मुलांची रंगांशी मैत्री करवुन देणार्‍या या वेबसाईटचे नाव आहे thecolor.com

thecolor.com ही साईट लहान मुलांना चित्रांमध्ये रंग भरण्यास शिकवते. या साइटवर १००० हुन अधिक चित्रे आहेत. या चित्रांची प्रींट घेण्याची आवश्यकता नसुन ही चित्रे संगणकावरच फक्त माउसच्या सहाय्याने रंगवता येतात.

साईटची डीझाइन अगदी लहान मुलांना आवडेल अशी सुटसुटीत आणि रंगीबेरंगी आहे. विविध विषयांनुसार चित्रांची ९० वेगवेगळ्या प्रकारांत मांडणी केलेली आहे. एकुणच वापरण्यास ही साईट अतीशय सोपी आहे. लहान मुलांना ही साईट तासनतास जखडुन ठेवु शकेल अशी आहे. ऑनलाईन चित्रकला ऐकताना थोडी निरस वाटेल मात्र चित्र रंगवताना खुप मजा येते. (मी देखील २-३ चित्रांवर हात मारलाच ! त्यापैकी एक खाली देत आहे)
या वेबसाईटचे खुप फायदे आहेत -

  • ऑनलाईन चित्रे रंगवता येत असल्याने कागद व रंग बनवताना होणारा पर्यावरणाचा र्‍हास कमी होतो.
  • कागद आणि रंग यांवर होणारा खर्च कमी करता येतो :-)
  • मुलांना रंगसंगती व रंगांचा उचीत वापर कसा करावा हे समजते.
  • विविध रंगांमध्ये एकच चित्र रंगवता येत असल्याने मुलांना रंगांबरोबर वेगवेगळे प्रयोग करता येतात.
  • मुलांचे hand-eye co-ordination सुधारण्यास मदत होते.
  • संगणकावर हाणामारीचे गेम्स सोडुन इतरही चांगल्या गोष्टी असतात हे मुलांना कळु लागेल.

मात्र या साईटची माहिती मी लहान मुलांसाठी दीलेली नसुन तुमच्या आमच्या सारख्या मोठ्यांना (वयाने !) माणसांसाठी दीलेली आहे. सहज भेट द्या या साईटला. एखादे सुटसुटीत चित्र निवडा आणि मस्तपैकी रंगवुन टाका. आपल्या प्रत्येकामध्ये लपलेल्या लहान मुलाचा पुन्हा एकदा प्रत्यय येइल.

आणि वयाने लहान मुलांना आपले पारंपारीक कागद आणि खडु, स्केच पेन, वॉटर कलर वापरु द्यात. पाने खराब होउ द्यात, ब्रश बिनधास्त वहीवर फीरु द्यात. वहीवरच्या चित्रांसोबत अंगावरचे कपडे रंगीबेरंगी होउन जाउ द्यात. ती मजा या ऑनलाईन कोरड्या चित्रकलेत कधीच कधीच येणार नाही.

What the website has to say about themselves -

ONLINE COLORING BOOK PAGES

You can save your interactive online coloring pages that you have created in your gallery, print the coloring pages to your printer, or email them to friends and family. These coloring pages are fun and they also help children develop important skills such as color concepts, the names of the 192 colors, eye-hand coordination, picture comprehension. These skills form the foundation for early learning success


No java, flash or applet is necessary to load our online coloring pages. The pages load immediately so you can start coloring immediately. If you would like to save your gallery of pictures on TheColor.com you can do so by registering for our site. We will never spam our users as we are COPPA; compliant so open an account start coloring online for free Today!


Feel free to contact us if there are any coloring pages you would like us to add to our site. If you want to email us the gif files of free coloring pages you have drawn we will add them to our online coloring site. Also please let us know if you have any suggestions as our goal is to be #1 online destination for online coloring. Our goal is to constantly build our pictures to color online and we will be adding new pictures to color every week.

Thank you.

TheColor.com Management Team


0 comments:

Post a Comment