300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 24 December 2009

Tagged under:

How to write text on Image background ?

मित्रहो बर्‍याच वेळा विविध कारणांसाठी आपल्याला संगणकावरील चित्रांवर किंवा फोटोंवर काहीतरी लिहायची गरज भासते. कधी फोटोबद्दलची माहिती किंवा कधी फक्त स्वाक्षरी किंवा फोटोची ऑनलाईन चोरी होउ नये म्हणुन आपले नाव तर कधी एखादी चारोळी किंवा कवितेच्या ओळी. आज मी वाचकांना फोटो किंवा चित्रावर मजकुर लिहिण्यासाठी एक सोपी युक्ती सांगणार आहे.

खरेतर फोटोवर मजकुर लिहिण्यासाठी फोटोशॉप, GIMP यासारखे अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत तसेच ऑनलाईन सर्वीसेस देखील उपलब्ध आहेत. मात्र आज मी तुम्हाला जी युक्ती सांगणार आहे त्यात असे कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची किंवा ऑनलाईन सर्वीस वापरण्याची आवश्यकता नाही. आणि मुख्य म्हणजे चित्रावरील हा मजकुर मराठीत देखील लिहिता येतो. मायक्रोसॉफ्ट ऑफीसबरोबर मोफत मिळणार्‍या मायक्रोसॉफ्ट पेंट (Microsoft Paint) या अप्लिकेशनचा वापर आपण यामध्ये करणार आहोत.

मायक्रोसॉफ्ट पेंट Start → All programs → Accessories → Paint येथे जाउन सुरु करता येते.

१. पहील्यांदा ज्या चित्रावर मजकुर लिहायचा असेल त्यावर Right click करुन open with वर क्लिक करा आणि आलेल्या यादीतून Paint हा पर्याय निवडावा.

२. आता तुम्ही निवडलेले चित्र मायक्रोसॉफ्ट पेंटमध्ये उघडेल.
३. येथे टेक्स्टबॉक्स Textbox दीसेल त्यावर क्लिक करा. आणि त्यानंतर चित्रात दाखवील्याप्रमाणे खालील बॉक्सवर क्लिक करा.
४. आता चित्रामध्ये ज्या ठीकाणी मजकुर लिहायचा आहे तेथे माउसच्या सहाय्याने ड्रॅग करुन TextBox बनवा.
५. चित्रावर मजकुर ठळकपणे उठुन दीसेल असा फाँट कलर निवडा. टेक्स्टबॉक्स मध्ये Right click करुन टेक्स्ट टुलबार (Text Toolbar) वर क्लिक केल्यास फाँटचा प्रकार व आकार दोन्ही निवडता येतील.
६. या टेक्स्टबॉक्स मध्ये हवा तो मजकुर लिहा व लिहुन झाल्यावर टेक्स्टबॉक्सच्या बाहेर चित्रावर क्लिक करा.
७. आता File → Save As वर क्लिक करुन चित्र सेव्ह करा.

ही छोटीशी युक्ती वापरुन बघा आणि कशी वाटली ते कळवायला विसरु नका.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment