मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील "Filter function"ची बेसिक माहीती आपण मागील लेखामध्ये घेतली. आज आपण Filter फंक्शनमधील "Custom" या पर्यायाचा वापर कसा करावा हे पाहुया.
Custom filter च्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स लावु शकतो.
ज्या कॉलममध्ये कस्टम फिल्टर लावायचा असेल त्या कॉलमचे शिर्षक सीलेक्ट करुन Alt → D → F → F क्लिक करुन नंतर (Custom....) हा पर्याय निवडा.
आता खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे एक छोटी विंडो उघडेल. या विंडो मध्ये चार ड्रॉप डाउन कॉलम्स दीसतील.
पहील्या ड्रॉप डाउन कॉलममध्ये खालील पर्याय दीसतील. त्यांचे स्पष्टीकरण व वापर आपण काही उदाहरणांद्वारे पाहुयात.
equals - कॉलममधील कोणत्याही सेलमधील किंमतीइतके इतर सेल्स फिल्टर करण्यासाठी equals हा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ दीलेल्या टेबल मधील "Marathi" हा विषय असलेल्या सर्व ओळी निवडण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "equals" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "Marathi" असे लिहावे/निवडावे.
Does not equals - दीलेल्या टेबल मधील "Marathi" हा विषय नसलेल्या सर्व ओळी निवडण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "Does not equals" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "Marathi" असे लिहावे/निवडावे.
is greater than - कॉलममधील कोणत्याही संख्येपेक्षा मोठ्या संख्यांची यादी बनवायची असेल तर "is greater than" हा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील ५० पेक्षा अधिक गुण मिळवीणार्या विद्यार्थ्यांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "is greater than" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "५०" असे लिहावे/निवडावे.
is greater than or equal to - कॉलममधील कोणत्याही संख्येइतकी किंवा त्या संख्येपेक्षा मोठ्या संख्यांची यादी बनवायची असेल तर "is greater than or equal to " हा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील ५० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवीणार्या विद्यार्थ्यांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "is greater than" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "५०" असे लिहावे/निवडावे.
is less than - कॉलममधील कोणत्याही संख्येपेक्षा लहान संख्यांची यादी बनवायची असेल तर "is less than" हा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील ५० पेक्षा कमी गुण मिळवीणार्या विद्यार्थ्यांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "is less than" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "५०" असे लिहावे/निवडावे.
is less than or equal to - कॉलममधील कोणत्याही संख्येइतकी किंवा त्या संख्येपेक्षा लहान संख्यांची यादी बनवायची असेल तर "is less than or equal to " हा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील ५० किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळवीणार्या विद्यार्थ्यांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "is greater than" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "५०" असे लिहावे/निवडावे.
begins with - कोणत्याही विशिष्ट अक्षराने किंवा अक्षरसमुहाने सुरु होणार्या कॉलममधील शब्दांची यादी बनवण्यासाठी "begins with"चा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील M अक्षराने सुरु होणार्या विषयांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "begins with" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "M" असे लिहावे/निवडावे.
does not begin with - कोणत्याही विशिष्ट अक्षराने किंवा अक्षरसमुहाने सुरु न होणार्या कॉलममधील शब्दांची यादी बनवण्यासाठी "does not begin with"चा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील H अक्षराने सुरु न होणार्या विषयांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "does not begin with" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "H" असे लिहावे/निवडावे.
ends with - कोणत्याही विशिष्ट अक्षराने किंवा अक्षरसमुहाने शेवट होणार्या कॉलममधील शब्दांची यादी बनवण्यासाठी "ends with "चा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील I अक्षराने शेवट होणार्या विषयांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "ends with" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "I" असे लिहावे/निवडावे.
does not end with - कोणत्याही विशिष्ट अक्षराने किंवा अक्षरसमुहाने शेवट न होणार्या कॉलममधील शब्दांची यादी बनवण्यासाठी "does not end with"चा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील I अक्षराने शेवट न होणार्या विषयांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "ends with" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "I" असे लिहावे/निवडावे.contains - कोणतेही विशिष्ट अक्षर किंवा अक्षरसमुह समाविष्ट असणार्या कॉलममधील शब्दांची यादी बनवण्यासाठी "contains"चा पर्याय वापरतात.
उदाहरणार्थ - दीलेल्या टेबल मधील कोठेही A अक्षर समाविष्ट असलेल्या विषयांची यादी बनवण्यासाठी पहील्या ड्रॉप डाउन मध्ये "contains" आणि दुसर्या ड्रॉप डाउन मध्ये "A" असे लिहावे/निवडावे.
does not contain - कोणतेही विशिष्ट अक्षर किंवा अक्षरसमुह समाविष्ट नसणार्या कॉलममधील शब्दांची यादी बनवण्यासाठी "contains"चा पर्याय वापरतात.
Filter फंक्शन मधील Custom या पर्यायाचा वापर इतर आणखीही प्रकारे करता येतो. या लेखमालेच्या तिसर्या आणि शेवटच्या भागात मी लवकरच त्याबद्दल माहीती देइन. तोपर्यंत मागील दोन भागांतील पर्यांयांची उजळणी व सराव करा.
0 comments:
Post a Comment