[ ENGLISH/ MARATHI ].......
जाहीरातींचं क्षेत्र अफाट आहे. खुप क्रीएटीव्ह आणि अफलातुन गोष्टी या क्षेत्रामध्ये करायला मिळतात. जाहीरातींच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना सतत काहीतरी नविन करावं लागतं. काहीतरी भव्यदीव्य, जगावेगळं, सर्वांचच लक्ष वेधुन घेईल असे काहीतरी करणं हे जाहीरात क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.
अशीच एक भन्नाट कल्पना ईचबर्न (Eichborn) नावाच्या एका जर्मन पुस्तक कंपनीने आपल्या जाहीरातीसाठी वापरली. २००९ च्या फ्रॅंकफर्ट येथील पुस्तक प्रदर्शनात आपल्या स्टॉलवरील जाहीरातींपुरता मर्यादीत न राहता ईचबर्न कंपनीने सर्वात छोट्या, उडत्या जाहीराती बनवील्या. त्यांनी वापरलेली कल्पना एकदम अफलातुन होती. अगदी हलक्या अशा छोट्याश्या कागदावर जाहीरात छापुन ते कागद घरमाश्यांना (Home-flies) चिकटवले. (होय! अगदी खर्याखुर्या माशा) आणि अशा कागद चिकटवलेल्या माशा प्रदर्शनात इतरत्र सोडुन दील्या. घरमाशांच्या सोबत इतरत्र उडणार्या या छोट्या जाहीरातींनी सर्वांचच लक्ष वेधुन घेतले.
अर्थात जास्तीचं वजन उचलुन उडणे माशांना अजिबात आवडलं नसणार, परंतु ईचबर्नच्या क्रीएटीव्हीटीला मात्र दाद द्यायलाच हवी. (मला तर आम्ही लहानपणी धागा बांधुन "चतुर" पकडायचो त्याचीच आठवण झाली )
तो दिवस दुर नाही जेव्हा लवकरचं कावळे, चिमण्या, कबुतर आणि क्त्र्या-मांजरांच्या अंगावरही जाहीराती दीसु लागतील. !
घरमाश्यांच्या सहाय्याने केलेल्या या अफलातुन कँपेनचा व्हीडीओ येथे देत आहे, एंजॉय !
0 comments:
Post a Comment