दुसरा उपाय म्हणजे एका फाइलची प्रींट आउट घ्यायची आणि संगणकातील दुसर्या फाइलबरोबर तुलना करायची. मात्र या दोनही उपायांमध्ये बराच वेळ वाया जातो. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्याद्वारे आपल्याला दोनही फाइल्स बाजुबाजुला ठेवुन कंपेअर करता येतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड २००३ मध्ये ही सुविधा आहे.
समजा तुम्हाला डॉक्युमेंट्स अ आणि ब ची तुलना करायची आहे. त्या दोनही फाइल्स ओपन करा.
1. सर्वात वर टुलबार मध्ये “Window” बटण दीसेल त्यावर क्लिक करा.
2. आता “Compare side” वर क्लिक करा. जर दोनच वर्ड फाइल्स ओपन असतील तर दुसरी वर्ड फाइल आपोआप सीलेक्ट होइल आणि जर दोनापेक्षा अधिक फाइल्स ओपन असतील तर एका डायलॉग बॉक्समध्ये पाहीजे ती फाइल सीलेक्ट करता येते.

3. आता “Compare Side by Side” असा टुलबार दीसेल. त्यामध्ये Synchronous movement चा पर्याय निवडा. Synchronous movement म्हणजे एकाच वेळेला कर्सर दोनही डॉक्युमेंट्स मधुन फीरतो.
4. जर दोनही वर्ड फाइल्स पुर्ववत करायच्या असतील तर “Reset window position” या बटणावर क्लिक करा.
5. दोनही वर्ड फाइल्सची तुलना करुन झाल्यानंतर "Close Side by Side" वर क्लिक करा.

0 comments:
Post a Comment