मित्रहो, आज मी एक साधी पण अतीशय उपयुक्त टीप सांगणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्याआधी त्याचा प्रीव्ह्यु (Preview) पाहता येतो, हे तुम्हाला ठाउक होते काय. नसल्यास ठाउक करुन घ्या :-)
- कोणतीही एक मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल ओपन करा.
- आता मुख्य मेनु बार मध्ये File व नंतर Open वर क्लिक करा. (यासाठी ctrl + O हा शॉर्टकट देखील वापरु शकता.)
- येथे View बटण दीसेल (खालील चित्र पहा) त्यावर क्लिक करुन नंतर Preview हा पर्याय निवडा.
- आता कोणत्याही वर्ड फाइल वर क्लिक केल्यास बाजुलाच त्या फाइलचा Preview म्हणजेच त्यातील मजकुर दीसेल.
0 comments:
Post a Comment