- एखाद्या सेलमध्ये ctrl + ; हा शॉर्टकट वापरुन आजची तारीख लिहिता येते. (:-p)
- संपुर्ण वर्कशीट सीलेक्ट करण्यासाठी ctrl + A वापरतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण हे माहीत आहे का -
- रो (Row) सीलेक्ट करण्यासाठी shift + spacebar वापरावे.
- कॉलम सीलेक्ट करण्यासाठी ctrl + spacebar वापरावे. - ओळ वाढविण्यासाठी (to add row) आधी रो सीलेक्ट करुन घ्यावी आणि त्यानंतर Ctrl + shift + + वापरावे.
- स्तंभ वाढविण्यासाठी (to add coloumn ) आधी कॉलम सीलेक्ट करुन घ्यावा आणि त्यानंतर Ctrl + shift + + वापरावे.
- ओळ लपविण्यासाठी (To hide a row) ctrl + 9 वापरावे.
- व स्तंभ लपविण्यासाठी (To hide a coloumn) ctrl + 0 वापरावे.
- लपवीलेली ओळ पुन्हा बाहेर काढण्यासाठी (To unhide a row) ctrl + shift + 9 वापरावे.
- लपवीलेला कॉलम पुन्हा बाहेर काढण्यासाठी (To unhide a coloumn) ctrl + shift + 0 वापरावे.
- दीलेल्या कॉलममधील सर्व संख्या अनुक्रमे लावायच्या असतील (To sort data) तर कॉलम आधी सीलेक्ट करावा आणि Alt + D + S (altDS म्हणजे Data Sort मधील आद्याक्षरे)
दीलेल्या कॉलममध्ये फील्टर वापरायचा असेल तर डाटा सीलेक्ट करुन Alt + D + F + F (AltDFF म्हणजे Data Filter Autofilter)
एक्सेलचे हे भन्नाट शॉर्टकट्स कसे वाटले ते मला कमेंट्स मध्ये नक्की लिहुन पाठवा.
0 comments:
Post a Comment