
आज आपण टेक्स्ट म्हणजेच शब्द आणि वाक्य यांसोबत काम करताना जे फंक्शन्स उपयोगी पडतात ते पाहुया.
RIGHT - दीलेल्या टेक्स्ट मधील उजवीकडचा भाग वेगळा काढायचा असेल तर तर RIGHT हे फंक्शन वापरतात.
उदाहरणार्थ - समजा सेल A2 मध्ये ABCDEF असे लिहिले आहे. यापैकी फक्त DEF ही उजवीकडील तीन अक्षरे वेगळी करायची असतील तर =RIGHT(A2,3) असा फॉर्म्युला लिहावा.
=RIGHT(OriginalText,NumberOfCharactersRequired)
OriginalText = A2 = ज्या सेलमधील उजवीकडील भाग वेगळा काढायचा असेल त्या सेलचे नाव.
NumberOfCharactersRequired = 3 = उजवीकडील जेवढी अक्षरे वेगळी करावयाची आहेत त्यांची संख्या
खाली चित्रात दीलेल्या आणखी काही उदाहरणे अभ्यासल्यास RIGHT फंक्शनचा वापर अधिक स्पष्ट होइल.
LEFT - दीलेल्या टेक्स्ट मधील डावीकडचा भाग वेगळा काढायचा असेल तर तर RIGHT हे फंक्शन वापरतात.
उदाहरणार्थ - समजा सेल A2 मध्ये ABCDEF असे लिहिले आहे. यापैकी फक्त ABC ही डावीकडील तीन अक्षरे वेगळी करायची असतील तर =LEFT(A2,3) असा फॉर्म्युला लिहावा.
=LEFT(OriginalText,NumberOfCharactersRequired)
OriginalText = A2 = ज्या सेलमधील डावीकडील भाग वेगळा काढायचा असेल त्या सेलचे नाव.
NumberOfCharactersRequired = 3 = डावीकडील जेवढी अक्षरे वेगळी करावयाची आहेत त्यांची संख्या
खाली चित्रात दीलेल्या आणखी काही उदाहरणे अभ्यासल्यास LEFT फंक्शनचा वापर अधिक स्पष्ट होइल.
MID = दीलेल्या टेक्स्ट मधील मधला भाग वेगळा काढायचा असेल तर तर MID हे फंक्शन वापरतात.
उदाहरणार्थ - समजा सेल A2 मध्ये ABCDEF असे लिहिले आहे. यापैकी फक्त CD ही मधली दोन अक्षरे वेगळी करायची असतील तर =MID(A2,3,2) असा फॉर्म्युला लिहावा.
=MID(OriginalText,PositionToStartPicking,NumberOfCharactersToPick)
OriginalText = A2 = ज्या सेलमधील डावीकडील भाग वेगळा काढायचा असेल त्या सेलचे नाव.
PositionToStartPicking = 3 = ज्या अक्षरापासुन पुढची अक्षरे वेगळी काढावयाची आहेत त्या अक्षराचा क्रमांक
NumberOfCharactersToPick = २ = एकुण जेवढी अक्षरे वेगळी काढावयाची आहेत त्यांची संख्या
खाली चित्रात दीलेल्या आणखी काही उदाहरणे अभ्यासल्यास MID फंक्शनचा वापर अधिक स्पष्ट होइल.

0 comments:
Post a Comment