भारतीय समाजातील देवादिकांचे आणि पुजाअर्चांचे असणारे महत्त्व लक्षात घेउन प्रकाश मुंध्रा (Prakash Mundhra) नावाच्या एका तरुणाने एक अनोखा व्यवसाय चालु केला. त्याची ही अतीशय प्रेअरणादायी गोष्ट खास नेटभेटच्या वाचकांसाठी.प्रकाश मुंध्रा यांची कंपनी "सॅक्रीड मुवमेंट्स" ही "ब्रँडेड पुजा किट्स" च्या व्यवसायात आहे. विविध पुजांसाठी तसेच सण्-समारंभासाठी आवश्यक असणारे पुजासामान आकर्षकरीत्या पॅक करुन "Blessingz" या ब्रँडने विकण्याचा प्रकाशचा व्यवसाय आहे.
ब्रँडेड पुजा किट्सची कल्पना प्रकाशला सिंबॉयसिस इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट (पुणे) येथे असताना आली होती. मात्र त्याचे मार्केटींगचे प्रोफेसर शिवराम आपटे यांनी ती कल्पना साफ नाकारली. त्यांच्यामते ब्रँडेड पुजा किट्सला बाजारपेठच नव्हती. अशा पुजा किट्सची बाजारात मागणी नाही आणि त्यामुळे हा व्यवसाय अजिबात चालणार नाही असे त्यांचे मत होते. पण स्वतःच्या कर्तुत्वावर ठाम विष्वास असलेल्या प्रकाशने प्रकाशने कॉलेज संपताच स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि पहील्याच वर्षी १०००० पुजा किट्स विकुन तब्बल ३५ लाखांची उलाढाल केली.
एमबीएच्या पहील्या वर्षाला असताना ITC कंपनीने आयोजीत केलेल्या एका स्पर्धेत प्रकाशने ही कल्पना प्रथम मांडली. ITC ला ही कल्पना फारशी रुचली नाही. मात्र पुढे मुळ कल्पनेत थोडे बदल करुन प्रकाशने एक पुर्ण बिझनेस प्लान तयार केला. आणखीन सहा स्पर्धांमध्ये प्रकाशने का बिझनेस प्लान मांडला, त्यापैकी पाच स्पर्धांमध्ये प्रकाशच्या या कल्पनेला विजेतेपद मिळाले. (झी टीव्हीवर बिझनेस बाझीगर नावाचा कार्यक्रम पुर्वी लागायचा त्यामध्ये प्रकाशच्या या कल्पनेला रुपये ५०००० पारीतोषिक मिळाले होते.) या स्पर्धांमध्ये मिलालेल्या यशामुळे प्रकाशला खात्री वाटु लागली की त्याचा बिझनेस प्लान सर्वोत्तम आहे आणि मग तो धडाडीने तयारीला लागला.
झी टीव्हीने दीलेले ५०००० आणि इतर स्पर्धांमधुन मिळालेली बक्षीसाची रक्कम तसेच नातेवाईक व मित्रांकडुन थोडेसे पैसे जमा करुन प्रकाशने त्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. GIFTEX या प्रदर्शनात एक छोटासा स्टॉल मांडुन त्याने त्याचे काही प्रॉडक्ट्स दाखवीले. गिफ्टेक्स मधील हा स्टॉल त्यावर्षीचे मुख्य आकर्षण ठरला.गिफ्टेक्सने देखील त्याला "Best product award" देउन गौरवले.
प्रत्येक पुजेसाठी वेगवेगळे पुजासामान लागते. त्यासाठी जवळपास ३२ वेगवेगळे पुजा किट्स प्रकाशने बनवीले आहेत. शेंदुर्,गुलाल्,हळद, कापुर, पुजेचं पुस्तक, मध, गंगाजल अशा अनेक वस्तु छान सुबक, आकर्षक पॅकींगमध्ये एकत्र पॅक केल्या जातात. प्रत्येक वस्तुवर हिंदी आणि इंग्लिशमध्ये नाव असलेले लेबल लावले जाते. पुजेचं पुस्तकही हिंदी आणि इंग्लीश या दोनही भाषांमध्ये असतं.
खरतंर या सर्व गोष्टी बाजारात सहजरीत्या आणि खुप स्वस्त मिळतात. मात्र त्या विकत घेण्यासाठी लागणारा वेळ, एखादी गोष्ट राहुन जाण्याची असलेली भीती आणि पदार्थांच्या क्वालीटी बद्दल असणारी साशंकता या सर्वांवर उपाय म्हणुन लोक blessingz पुजा किट्सना प्राधान्य देतात. प्रकाशचे हे पुजा किट्स UK,USA आणि Canada येथे निर्यात केले जातात.
एका छोट्या साध्या कल्पनेतुन उभारलेला प्रकाशचा हा व्यवसाय निश्चीतच प्रत्येक होतकरु तरुणासाठी आदर्श निर्माण करणारा आहे.
http://www.blessingzonline.com/

0 comments:
Post a Comment