मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये एक खुप छान सुविधा असते, आपला पासवर्ड लक्षात ठेवण्याची. याचे मुख्यत्वे दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे सतत पासवर्ड टाइप करण्यातला वेळ वाचतो आणि दुसरा फायदा म्हणजे आजुबाजुला उभी असलेली कोणीही व्यक्ती पासवर्ड टाइप करताना बघत असेल ही भीती राहत नाही.
पण होते काय की खुप कमी वेळा टाइप केल्यामुळे पासवर्ड विसरायला होतो. जर तुम्ही कधी अशा प्रकारे पासवर्ड विसरलात तर काय कराल?
पासवर्ड समोर दीसतोय, पण तो टींब टींब किंवा फुल्यांच्या मागे लपला आहे. अशा लपलेल्या पासवर्डसना शोधुन बाहेर करण्यासाठी एक मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दीले आहे Sandboy.com या साईटने. या सॉफ्टवेअरचे नाव आहे रीव्हेलेशन ( Revelation ).
रीव्हेलेशन सॉफ्टवेअर कसे वापरावे?
येथे क्लिक करुन रेव्हेलेशन हे मोफत सॉफ्टवेअर डाउनलोड करता येइल.
ईंस्टॉल केल्यानंतर रीव्हेलेशन सॉफ्टवेअर लाँच करा.
खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे गोल कर्सरवर डावे क्लिक करा आणि त्याला खेचुन (Drag) जेथे पासवर्ड लिहिला आहे तेथे न्या.
आता लपलेला पासवर्ड आपोआप दीसु लागेल (खालील चित्रातील दुसरा बाणाची जागा )
Image courtsy - img.brothersoft.com
टीप - हे सॉफ्टवेअर फक्त मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्येच काम करते.


0 comments:
Post a Comment