
[ MARATHI ].......
मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे माझ्यामते जगातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. एक्सेल मध्ये काय काय दडलय हे सांगता येणे कठीण आहे. गेली सहा-सात वर्षे एक्सेलमध्ये काम करुन सुद्धा मला एक्सेल फक्त पन्नास टक्केच समजलंय. एक्सेल मध्ये एकतरी नविन गोष्ट रोज शिकायची असा मी नियमच बनविला आहे.
एक्सेल म्हणजे फक्त कॅलक्युलेशन्स, फॉर्मुले, ग्राफ्स एवढच शिकायचय असं मला वाटत होते. पण आज युट्युबवर एक व्हीडीओ पाहीला आणि खर्या अर्थाने एक्सेलची ताकद कळली. हा व्हीडीओ एक्सेल ड्रॉइंगचा (चित्र).
एक्सेलवर एक सॉलीड ३ डायमेन्शन चित्र बनविणारा हा पठ्या एकदम भन्नाट चित्र काढुन गेलाय.
तुम्ही स्वतः देखील पहा आणि अचंबीत व्हा (माझ्यासारखे) !
0 comments:
Post a Comment