काही दिवसांपुर्वी मी एका इंटरव्यु मध्ये बसलो होतो. (मी इंटरव्यु घेणार्या पॅनेल मध्ये होतो) आमच्या दील्ली शाखेतील सेल्स एक्झीक्युटीव या पदासाठी हा इंटरव्यु होता.लेखी परीक्षा पास होउन मुलाखतीच्या फेरीसाठी तीन सभासद (Candidates) पुढे आले होते.पहीले दोन सभासद यथातथाच होते परंतु तीसर्या व्यक्तीने मात्र माझ्यावर चांगलीच छाप पाडली. मनोमन मी त्या व्यक्तीला सीलेक्ट केले देखील.
तीनही मुलाखती झाल्यानंतर आम्ही सर्व पॅनल मेंबर्सनी आपाआपसात चर्चा सुरु केली. आश्चर्याची बाब म्हणजे इतर तीघांनी त्या तीसर्या कँडीडेटला सपशेल रीजेक्ट केले . कारण काय तर म्हणे तो खुप प्रश्न विचारतो. खरेतरं त्याच्या याच गुणासाठी मी त्या व्यक्तीला सीलेक्ट करायचे ठरवले होते.
"प्रश्न विचारणे" या गोष्टीबद्दलच माझ्या मनत प्रश्न निर्माण झाला. जर प्रश्नच विचारले नाहीत तर उत्तरे मिळणार कशी? समोरच्या व्यक्तीला आपलं मन तर ओळखता येत नसतं मग ती व्यक्ती आपल्याला हवी ती उत्तरे किंवा स्पष्टीकरण देणार तरी कशी?
तसं पहायला गेलं तर हामुद्दा अगदी साधा आणि सोपा आहे.पण जरा खोलात जाउन पहा आणि विचार करा "आपण रोजच्या जीवनात कामावर किंवा इतर कोठीही आपण कीती वेळा प्रश्न विचारतो?" बर्याचदा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही मात्र तरीसुद्धा आपण प्रश्न न विचारता शांत राहतो. कारण आपल्या मनातील भीती आणि संकोच आपल्याला तसं करु देत नाही. "मी अगदीच मुर्खासारखा प्रश्न विचारला तर इतर लोक हसतील" या भीतीपोटी आपण काहीच विचारत नाही. अज्ञान लपविण्याच्या प्रय्त्नात अज्ञान वाढवत जातो.
लहानपणी शाळेमध्ये सर्वांत जास्त प्रश्न विचारनारी मुलेच शिक्षकांना हुशार वाटतात याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहेच ना, मग शाळेतील ही साधी शिकवण आचरनात आणण्यास का कचरतो आपण?
जरा आसपासच्या यशस्वी लोकांचे निरीक्षण करा. ते प्रश्न विचारतात. अगदी साधे (Basic) प्रश्न विचारतात (साधे याचा अर्थ सोपे असा नाही). उचीत प्रश्न विचारणे ही देखील एक कला आहे. आणि इतर कलांप्रमाणेच सरावाने यात निपुण होता येते.
प्रश्नोत्तरामुळेच संवाद होतो. एक्-दुसर्यांकडुन कोणाला काय अपेक्षा आहेत ते कळते. आयुष्य सुलभ करण्यासाठीचा हा एक औपाय आहे. चांगल्या संवादासाठीचा हा एक उपाय आहे.
शेवटी त्या कँडीडेटला निवडण्यासाठी मी इतरांना राजी केलंच.
हे झालं इतरांना प्रश्न विचारण्याबद्दल, याचप्रकारे काही प्रश्न स्वतःला विचारणे देखील महत्त्वाचे असते. त्याबद्दल सांगेन पण पुन्ही कधीतरी!
0 comments:
Post a Comment