काही दीवसांपुर्वी मी एका लेखामध्ये वाचले होते की जगभरातील इंटरनेट मजकुरापैकी ९०% मजकुर हा इंग्लीश भाषेमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात ईंटरनेटवरील ज्ञानावर फक्त इंग्रजी भाषा येणार्यांचाच हक्क आहे असे म्हणणे वावगे होणार नाही. (मला हे बिलकुल मान्य नाही म्हणुनच मोठ्या प्रयत्नाने मी मराठी आणि इंग्लीश या दोनही भाषांमधुन लिखाण करत असतो.) माझ्याप्रमाणेच गुगल काकांनाही हे मान्य नाही म्हणुनच गुगल काकांनी एक अप्रतीम सुविधा जगभरच्या नॉन्-इंग्लीश भाषीकांसाठी उपलब्ध करुन दीली आहे. सध्या प्रायोगीक तत्त्वावर सुरु करण्यात आलेल्या या सुविधेचं नाव आहे गुगल ट्रान्सलेशन टुलकीट (Google translation toolkit).
गुगल ट्रान्सलेशनची सुविधा यापुर्वीही गुगलच्या होमपेजवर उपलब्ध होती मात्र त्यामध्ये बर्याच सुधारणा करुन ट्रान्सलेशन टुलकीट सुरु करण्यात आले आहे. उदाहरणार्थ यापुर्वीच्या ट्रान्सलेशनमध्ये उपलब्ध नसलेल्या या काही सुविधा ट्रान्सलेशन टुलकीट मध्ये उपल्ब्ध आहेत.- यामध्ये संगणकावरील फाइल्स तसेच पुर्ण वेबसाईट भाषांतरीत करता येते. एवढेच नव्हे तर विकिपेडीया किंवा नॉल (Knol - वीकीपेडीयाला मात देण्यासाठी गुगलने सुरु केलेला उपक्रम. मात्र Knol फारसे यशस्वी झालेले नाही) या साईट्सवरील लेख देखील पुर्णपणे भाषांतरीत करता येतात.
- भाषांतरीत केलेला मजकुर संपादीत करता येतो (Edit)
- भाषांतरीत केलेला मजकुर पाहण्यासाठी तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी इतरांना आमंत्रीत करता येते.
- भाषांतरीत केलेल्या फाइल्स संगणकावर आणि ऑनलाइन सेव्ह करता येतात.
Google Translation Toolkit कसे वापरावे?
- Google Translation Toolkit (गुगल ट्रान्सलेटर टुलकिट) वर आपल्या गुगल अकाउंटच्या सहाय्याने लॉग्-इन करा.
- त्यानंतर नाव, तुम्ही राहत असलेला देश आणि तेथील वेळ निवडा.
- आता गुगल ट्रान्सलेटर टुलकिट च्या मुख्य पानावर तुम्ही याल. तेथे अपलोड बटणावर क्लिक करुन भाषांतरीत करावयाची फाइल संगणकामधुन निवडा किंवा एखादे वेबपेज भाषांतरीत करायचे असल्यास त्याची URL लिहा.
- कोणत्या भाषेतुन आणि कोणत्या भाषेत भाषांतर करायचे आहे ते ठरवा
- Upload Document for translation वर क्लिक करा.


खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे दोन भागांमध्ये भाषांतर दीसुन येइल. पहील्या भागात मुळ पान तर दुसर्या भागात भाषांतरीत पान दीसेल.
गुगल ट्रान्सलेटर टुलकिट मध्ये मराठीचा समावेश केलेला आहे हे पाहुन मी प्रचंड खुष झालो होतो. परंतु मराठीत भाषांतराचा प्रयत्न करुन पाहील्यावर निराश झालो कारण येथे मराठीत भाषांतर झालेच नाही. त्यानंतर हिंदीचा प्रयत्न केला तो सफल झाला.अजुनही गुगल ट्रान्सलेटर टुलकिटवर बरेच काम व्हायचे आहे. हिंदीमध्ये केलेला अनुवाद जुजबी माहीती पुरवीण्यासाठी उपयोगी असला तरी पुर्ण वाक्यांचा अर्थ मात्र लागत नव्हता.
मला खात्री आहे की गुगल काकांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होइल आणि ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली होतील.
0 comments:
Post a Comment