
मागील लेखामध्ये आपण पाहीलेले फंक्शन्स तुम्हाला नक्की उपयोगी पडले असतीलच. याहीपेक्षा काही महत्त्वाचे TEXT टेक्स्ट संबंधीत फंक्शन्स आपण आजच्या लेखामध्ये शिकुया.
LOWER - दीलेले टेक्स्ट मोठ्या लिपितुन छोट्या लिपीमध्ये बदलायचे असेल तर LOWER हे फंक्शन वापरतात.( Converts text to lowercase)
=LOWER(Text)
Text - येथे जे टेक्स्ट कॅपीटल लेटर्स मधुन स्मॉल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे आहे त्याचा सेल क्रमांक लिहावा.
खालील उदाहरणावरुन LOWER हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.

UPPER - दीलेले टेक्स्ट स्मॉल लेटर्स मधुन कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे असेल तर UPPER (अपर) हे फंक्शन वापरतात. ( Converts text to uppercase).
Text - येथे जे टेक्स्ट स्मॉल लेटर्स मधुन कॅपीटल लेटर्स मध्ये रुपांतरीत करायचे आहे त्याचा सेल क्रमांक लिहावा.=UPPER((Text)
खालील उदाहरणावरुन UPPER हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.

CONCATENATE - कॉनकॅटीनेट हे फंक्शन माझे सर्वात आवडते फंक्शन आहे. कारण मी शीकलेले हे सर्वात पहिले एक्सेल फंक्शन आहे. हे फंक्शन शिकल्यानंतरच मला एक्सेल फंक्शन्सची ताकद कळुन आली.
कॉनकॅटीनेट हे फंक्शन दोन किंवा अधिक सेल्स मधिल मजकुर एकत्र जोडण्यासाठी वापरतात.
text1,text2...... = ज्या सेल्समधिल मजकुर एकत्र करायचा आहे त्या सेल्सचे क्रमांक=CONCATENATE(text1,[text2]......)
म्हणजे समजा A2 सेल मध्ये salil असे लिहिले आहे आणि A3 या सेल मध्ये chaudhary असे लिहिले आहे. जर ही दोनही नावे एकत्र करायची असतील तर CONCATENATE हे फंक्शन वापरुन salil chaudhary असे एकत्र लिहिता येइल.
=CONCATENATE(A2,A3)
Output = salilchaudhary
टीप 1 - सेल नंबर्सच्या ऐवजी जर फॉर्म्युल्यामध्ये किंमती लिहायच्या असतील तर प्रत्येक मजकुर खालीलप्रमाणे अवतरण चिन्हांमध्ये लिहावा.
=CONCATENATE("salil","chaudhary")
Output = salilchaudhary
टीप 2 - जोडलेल्या दोन मजकुरांमध्ये जर एक रीकामी जागा ठेवायची असेल तर दोन सेल नंबर्समध्ये किंवा दोन टेक्स्ट मध्ये " " असे ("spacebar")रीकामे अवतरण चिन्ह लिहावे.
=CONCATENATE("salil"," ","chaudhary")
Output = salil chaudhary
खालील उदाहरणावरुन CONCATENATE हे फंक्शन कसे वापरावे याची कल्पना येइल.
0 comments:
Post a Comment