300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 28 June 2009

Tagged under:

Gmail labs जीमेल लॅब्ज - माझे आवडते फीचर्स !


कोणीही गूगल काकांप्रमाणे विचार नाही करु शकत. मी पैजेवर सांगतो की कुणीच गूगल काकांची बरोबरी नाही करु शकत.

आपण गेल्या कित्येक वर्षांपासुन इ- मेल वापरतोय. आणि इतके दिवस आपण विचार करत होतो की जी इ-मेल सर्वीस आपण वापरतोय ती एक्दुम भन्नाट आहे (?).मित्रहो जरा इथे पहा. Gmail Labs जीमेल लॅब्ज चे हे काही नविन फीचर्स. पाहील्यावर तुम्ही लगेच म्हणाल,"हे तर मला खुप गरजेचे होते, इतके दिवस कोणी कसे दीले नाही हे फीचर!"हीच तर कमाल आहे गूगल काकांची.

1. Forgotten Attachment Detector (अ‍ॅटेचमेंट विसरलात , जीमेल आठवण करुन देइल)-

घाई घाईत बर्‍याच वेळा अ‍ॅटेचमेंट जोडायची राहुन जाते आणि आपण मेल पाठवुन देतो.चिंता नको. गूगल काकांनी उपाय शोधलाय. Gmail > settings > Labs मध्ये जा आणि Forgotten attachment detector ला चित्रात दाखवल्याप्रमाणे चालु (Enable) करा. आता यापुढे मेल मध्ये अ‍ॅटेचमेंटचा उल्लेख असला (अर्थात इंग्लिशमध्ये !) आणि तुम्ही ती जोडायची विसरलात तर गूगल काका स्वतः आठवण करुन देतील.


2. Email addict - (इमेलचं व्यसन जडलय ?)

त्या सर्वांसाठी जे आपला बराचसा वेळ मेल वाचण्यात किंवा मेल लिहीण्यात घालवतात (माझ्यासारखे काही उद्योगी लोक !) हे एक उपयुक्त फीचर. आता तुमची आई नव्हे तर चक्क गूगल काका आठवण करुन देतील की, " बाबारे आता पुरे, जरा आराम करा (Take a break)". फक्त Gmail > settings > Labs मध्ये जाउन Email addict ला चित्रात दाखवल्याप्रमाणे चालु (Enable) करा. गूगल किती वेळाने आणि किती वेळा तुम्हाला आठवण करेल हे तुम्ही एकदाच सेट करु शकता.


3. Undo send (पाठवलेली मेल थांबवा)

बर्‍याच वेळा आपण मेल पाठवण्यासाठी Send बटण दाबतो आणि नेमके तेव्हाच आठवतं अरेरे काही राहुन गेले. आता असे हळहळण्याची आवश्यकता नाही. gmail > settings > Labs मध्ये जाउन Undo Send हे फीचर (Enable) चालु करा. त्यानंतर मेल पाठवल्यानंतर ५ सेकंदांपर्यंत वाट पाहेल, तुम्ही पुन्हा थांबवण्याची!



खरेच या सर्व भन्नट कल्पना ज्यांच्या डोक्यातुन निघाल्या असतील त्या सर्व गूगल कर्मचार्‍यांना सलाम !

0 comments:

Post a Comment