Youtube.com (युट्यूब.कॉम) ही साईट तुम्ही पाहीली असेलच. गुगलच्या अधीपत्याखालील या वेबसाइटचे चाहते जगभर आहेत. ज्ञान आणि मनोरंजनाचा इंटरनेट वरील सर्वात मोठा खजिना असलेली या साईटवर आपण तासनतास घालवु शकतो.
पण या अतीशय चांगल्या आणि उपयुक्त वेबसाईटची एकमेव गोष्ट आपल्याला खटकते आणि ती म्हणजे युट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करण्यासाठी असलेला निर्बंध. खरेतर व्हीडीओ डाउनलोड करणे तसे अयोग्यच पण भारतात जिथे इंटरनेट कनेक्शन केवळ काही वेळापुरताच उपलब्ध असते आणि असले तरी गोगलगायीच्या वेगाने चालते, तिथे सध्यातरी ऑनलाइन व्हीडीओ पाहणे हे एक स्वप्नच आहे.
आपल्या लक्षात आले असेलच की आज मी वाचकांना युट्यूब वरुन व्हीडीओ डाउनलोड करण्याची एक युक्ती सांगणार आहे. अतीशय साधी आणि सोपी. आणि ते ही कोणतेच सॉफ्टवेअर किंवा वेब अप्लिकेशन न वापरता.
1. youtube.com वर जा आणि तुम्हाला डाउनलोड करावयाचा असेल तो व्हीडीओ/क्लिप चालु करा.
२. अॅड्रेस बार मध्ये या व्हीडीओ ची वेबलिंक म्हणजेच URL दीसेल.
उदाहरणार्थ -
http://www.youtube.com/watch?v=MtirDMfcOKE&feature=channel
3. या URL मध्ये youtube शब्दापुढे snips हा शब्द जोडा. आता नविन URL खाली दील्याप्रमाणे दीसेल -
http://www.youtubesnips.com/watch?v=MtirDMfcOKE&feature=channel
4. एंटर बटण दादाबा.
आता तुम्ही आपोआप http://www.youtubesnips.com/ या वेबसाईट कडे वळवले जाल आणि तेथे खालीलप्रमाणे डाउनलोडींगचे चार पर्याय दीसतील. –
- FLV Download
- 3gp Download (मोबाइल वर पाहण्यासाठी)
- MP4 High Quality Download- HD
- High Definition 720p
तुमचा आवडता पर्याय निवडा आणि आपले आवडत्या क्लिप्स एंजॉय करा.
Friday, 22 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment