300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 8 July 2015

Tagged under: , , ,

आपला ऑनलाईन व्यवसाय सुरु करा केवळ काही मिनिटात !



भारतामध्ये ई-कॉमर्स अतिशय वेगाने वाढत आहे हे नव्याने सांगायला नकोच. फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीम यांसारख्या मोठ्या कंपन्या ई-कॉमर्स व्यवसायात चांगला जम बसवून आहेतच, त्याशिवाय अनेक नवीन ई-कॉमर्स स्टार्टअप्स रोज या व्यवसायात येत आहेत. खरतर हे मार्केट एव्हढ मोठ आहे की अजूनही बरयाच ई-कॉमर्स कंपन्यांना यात सामावून घेऊ शकेल. आणि हीच गरज ओळखून एक नवीन पेमेंट सर्विस बाजारात आली आहे. तिचे नाव आहे इंस्तामोजो (Instamojo). इंस्तामोजो एक अशी जादुई सर्विस आहे जी आपल्याला काही मिनिटात ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करून देऊ शकते. इंस्तामोजो वापरून आतापर्यंत हजारो लहान-मोठ्या उद्योगांनी, गृहिणीनी आणि उद्योजक होण्याची इर्षा असलेल्या अनेकांनी आपल्या ऑनलाइन व्यवसायाला सुरुवात केली आहे.

नेटभेटच्या ई-पुस्तक लायब्ररीमधील पुस्तकांची विक्री देखील आम्ही इंस्तामोजोच्या सहाय्यानेच करतो. 2013 साली जेव्हा इंस्तामोजो नुकताच सुरु झाली होती तेव्हापासून मी नेटभेट साठी या सर्वीसाचा वापर करत आहे. मला यातील सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे इंस्तामोजो वापरण्यातील सोपेपणा. ज्याने कधी प्रोग्रामिंग केले नाही, सोफ्टवेअर कोडची एक ओळही लिहिलेली नाही , कोणता व्यवसाय यापूर्वी केलेला नाही अशी कोणतीही व्यक्ती काही मिनिटातच इंस्तामोजो वापरून आपल्या ऑनलाईन व्यवसायाला सुरुवात करू शकते.

पेपाल (Paypal), सीसी-अव्हेन्यू (CC Avenue), क्लिकबँक (Clickbank) या मोठमोठ्या ई-पेमेंट कंपन्यांनी आणि भारतातील मोठ्या बँकानी यापूर्वी अशी सेवा उपलब्ध करून दिली होती परंतु त्यांनी केवळ मोठ्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी ऑनलाईन दुकान उघडण्याची प्रक्रिया कमालीची कठीण आणि खर्चिक बनविली. इंस्तामोजोने यावर तोडगा शोधून काढला आणि एक सोपी सहजसाध्य सेवा उपलब्ध करून दिली.

इंस्तामोजोची ई-पेमेंट सुविधा वापरून आपण डिजिटल उत्पादने उदाहरणार्थ ई-पुस्तके, ऑनलाईन कोर्सेस, कार्यक्रमाचे तिकीटे, सोफ्टवेअर, संगीत, सेवा विकू शकतो. तसेच पुस्तके, कपडे, कलाकृती अशा फिजिकल वस्तू देखील विकू शकतो. यासाठी वेगळे ऑनलाइन स्टोअर असण्याची सुद्धा आवश्यकता नसते. आपल्या वेबसाईटवरून , ब्लॉगवरून आणि फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस यासारख्या सोशल साईटवरून इंस्तामोजोच्या सहाय्याने विक्री करता येते. इतकच काय, केवळ ईमेल किवा whatsapp वापरून सुद्धा ऑनलाईन विक्री सुरु करता येऊ शकते.

इंस्तामोजोची नोंदणी प्रक्रिया -
केवळ आपल्या Pan Card आणि Bank Account ची माहिती देऊन इंस्तामोजो वापरण्यास सुरुवात करता येते.

इंस्तामोजोचे पेमेंट चार्जेस -
डीजीटल वस्तू - 5% आणि फिजिकल वस्तू - 1.9%

इंस्तामोजोची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता -
  • सहजसोपी नोंदणी प्रक्रिया 
  • कमीतकमी चार्जेस 
  • केवळ काही मिनिटात विक्रीची सुरुवात 
  • वापरण्यास सोपे 
  • विक्री वाढविण्यासाठी Affiliate marketing, Discounting, Customer tracking ची सुविधा 
  • विक्री केल्यानंतर तीन दिवसात पैसे आपल्या खात्यात जमा होतात. 
  • केवळ उत्पादनांचीच नव्हे तर सेवा विक्री साठी सुद्धा उपयुक्त 
उदाहरणे -
उत्पादन - शोध लैंगिक समस्यांचा ई-पुस्तक
सेवा - नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स - MS Excel एक्स्पर्ट कोर्स


येथे क्लिक करून इंस्तामोजो वापरायाला सुरुवात करा. ही सेवा समजायला आणि वापरायला खूप सोपी आहे त्यामुळे मी येथे खूप सविस्तर माहिती नाही देत आहे. परंतु काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास खाली कमेंट्स मध्ये लिहून कळवा. मी प्रत्येक शंकेचे निरसन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

तेव्हा मित्रांनो, आता तुम्हालाही इंटरनेट उद्योजक होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. आपला ऑनलाईन व्यवसाय आजच सुरु करा.....न जाणो...उद्याची फ्लिपकार्ट कदाचित मराठी माणसाची असेल !!

तुमच्या नवीन व्यवसायाला नेटभेटच्या खूप शुभेच्छा !!

(टीप - इंस्तामोजो वापरून तुम्ही ऑनलाईन विक्री सुरु केली असेल तर त्याबद्दल खाली कमेंट्स मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा)
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment