स्टीव्ह जॉब्जचं निधन झालं तेव्हा अख्ख जग रडलं होतं. कारण या अवलियाने आपल्या मेहनतीने, ध्यासाने आणि तंत्रज्ञानातील अनन्यसाधारण हुशारीने जग बदललं होतं. संगणक, मोबाईल, संगीत, डीझायनींग या सर्व क्षेत्रांमध्ये त्याने कमालीचे बदल घडवुन आणले. शेवटी जग सर्वाधीक पैसे कमावणार्या,सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची दखल न घेता असामान्य कर्तुत्वाची दखल घेते हे स्टीव्हने दाखवुन दिले.
स्टीव्ह प्रमाणेच जग बदलवण्याची क्षमता असणारा आणखी एक ईंजीनीअर, डीझायनर, बिझनेसमॅन अशी व्यक्ती सध्या अमेरीकेत आहे. आणि मला असं वाटतंय की नेटभेट्च्या बर्याच वाचकांना त्या व्यक्तीबद्दल माहिती नाही आहे.
मित्रांनो, या व्यक्तीचे नाव आहे एलॉन मस्क (Elon Musk). एलॉनला आताच भविष्यातील स्टीव्ह जॉब्स असे लोक म्हणू लागले आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण असं का म्हंटल जातं ते पाहणार आहोत आणि त्याच्या अनन्यसाधारण , महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती घेणार आहोत.
टेस्लाने विकसित केलेली इलेक्ट्रिक कार टेक्नोलॉजी (electric powertrain systems) स्वत:पुरती मर्यादित न ठेवता मर्सिडीझ आणि टोयोटा या कंपन्यांना विकायलाही सुरुवात केली. टेस्लाची या तंत्रज्ञानातील प्रगती पाहून या दोनही कंपन्यांनी टेस्लामध्ये मोठी गुंतवणूक केली. जून २०१२ मध्ये टेस्लाने आपली दुसरी कार Tesla Model S ही लक्झरी सेदान या श्रेणीतील कार बाजारात आणली. ही खऱ्या अर्थाने पहिली परिपूर्ण इलेक्ट्रिक कार होती. डिसेंबर २०१३ पर्यंत टेस्लाने २५००० गाड्या विकल्या आहेत.
येत्या काही वर्षात पेट्रोल, डीझेल वरील गाड्यांची जागा पूर्णपणे इलेक्ट्रिक कार्स ने घेतलेली असेल.
गेले कित्येक वर्षे दररोज १६ तास असे अथक आणि अविरत परिश्रम करणारा एलॉन मस्क हा अनोखा ईंजीनीअर आणि बिझनेसमॅन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखीही जीवनमान बदलवून टाकणारया आणखीही काही महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया पुढील लेखात !
स्टीव्ह प्रमाणेच जग बदलवण्याची क्षमता असणारा आणखी एक ईंजीनीअर, डीझायनर, बिझनेसमॅन अशी व्यक्ती सध्या अमेरीकेत आहे. आणि मला असं वाटतंय की नेटभेट्च्या बर्याच वाचकांना त्या व्यक्तीबद्दल माहिती नाही आहे.
मित्रांनो, या व्यक्तीचे नाव आहे एलॉन मस्क (Elon Musk). एलॉनला आताच भविष्यातील स्टीव्ह जॉब्स असे लोक म्हणू लागले आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण असं का म्हंटल जातं ते पाहणार आहोत आणि त्याच्या अनन्यसाधारण , महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती घेणार आहोत.
सुरुवात
दक्षीण अफ्रीकेमध्ये जन्म झालेल्या आणि नंतर अमेरीकेत स्थीरावलेल्या एलॉनने 12 वर्षांचा असताना स्वतः प्रोग्रामींग करुन बनवलेला एक व्हिडीओ गेम कोड ५०० डॉलर्सला विकला होता. ती त्याच्या व्यवसायाची छोटीशी सुरुवात होती. त्यानंतर दहा वर्षांनी त्याने ZIP2 ही कंपनी सुरु केली आणि लवकरच ३ करोड अमेरिकन डॉलर्सला Compaq या बड्या अमेरिकन कंपनीला ती विकली.पुढे जाऊन एलॉनने X.com ही ऑनलाईन फायनान्स कंपनी सुरु केली. याच कंपनीने जगप्रसिद्ध Paypal ही कंपनी विकत घेतली. पुढे Paypal ने ऑनलाईन खरेदी आणि पैशाची देवाणघेवाण या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. एक यशस्वी उद्योजक म्हणून एलॉन नावारूपाला आला. मात्र या मध्ये न रमता एलॉनने ही कंपनी देखील ebay.com या मोठ्या कंपनीला २००२ साली तब्बल १५० करोड अमेरिकन डॉलर्सला विकली.
टेस्ला मोटर्स
इथेपर्यंत सगळं ठीक होतं पण नंतर एलॉनने जे केलं त्यामुळे बऱ्याच लोकांनी एलॉनला वेड्यात काढलं. एलॉनने सुरु केली SpaceX नावाची एक रॉकेट कंपनी. ही कंपनी तग धरते न धरते तोपर्यंत त्याने टेस्ला मोटर्स Tesla Motors या आणखी एका नव्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. टेस्ला मोटर्स ही इलेक्ट्रिक कार्स बनविण्यासाठी संशोधन करत होती. २००८ पर्यंत Tesla Motors ची किंमत कमी होऊन फक्त ९० लाख डॉलर्स इतकी राहिली होती. पण अजिबात हार न मानता एलॉनने या कंपनी मध्ये आपले सर्व पैसे पणाला लावले. याच वर्षी एलॉनला कंपनीचा चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने Tesla च्या Product Development ची पूर्ण जबाबदारी घेतली आणि कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार Tesla Roadster बाजारात आणली. ही कार खूप महाग असल्याने फारशी चालली नाही. परंतु ही कंपनी करत असलेल्या प्रयोगांमध्ये काही खास आहे हे तथ्य जगासमोर आलं.टेस्लाने विकसित केलेली इलेक्ट्रिक कार टेक्नोलॉजी (electric powertrain systems) स्वत:पुरती मर्यादित न ठेवता मर्सिडीझ आणि टोयोटा या कंपन्यांना विकायलाही सुरुवात केली. टेस्लाची या तंत्रज्ञानातील प्रगती पाहून या दोनही कंपन्यांनी टेस्लामध्ये मोठी गुंतवणूक केली. जून २०१२ मध्ये टेस्लाने आपली दुसरी कार Tesla Model S ही लक्झरी सेदान या श्रेणीतील कार बाजारात आणली. ही खऱ्या अर्थाने पहिली परिपूर्ण इलेक्ट्रिक कार होती. डिसेंबर २०१३ पर्यंत टेस्लाने २५००० गाड्या विकल्या आहेत.
२०१३ चा World Green Car of The Year आणि Car of the year हे दोनही सन्मान टेस्ला मॉडेल S ला मिळाले. तसेच टाईम मासिकाचा २५ महत्वपूर्ण शोधांपैकी एक हा पुरस्कार ही मिळाला.
मॉडेल S चा व्हीडीओ पाहून या गाडीची क्षमता आपल्या लक्षात येईल.
येत्या काही वर्षात पेट्रोल, डीझेल वरील गाड्यांची जागा पूर्णपणे इलेक्ट्रिक कार्स ने घेतलेली असेल.
SpaceX Technologies
एलॉनने २००२ साली सुरु केलेल्या SpaceX Technologies या कंपनीने दरम्यानच्या काळात बरीच प्रगती केली होती. SpaceX ने फाल्कन ९ हे रॉकेट आणि Dragon हे स्पेसक्राफ्ट बनविले. २००८ साली खुद्द NASA ने SpaceX बरोबर सहकार्य करार केला. सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेबाहेर पोहोचवणारी SpaceX Technologies ही जगातील पहिली खाजगी कंपनी ठरली.मंगळावर मानवी वस्ती करण्यासाठी संशोधन करणे, मंगळावर माणसाला पोहोचवण्यात येणाऱ्या खर्चाच्या १/१० (एक दशांश) खर्चात मंगळावरील दळणवळण शक्य करणे ही SpaceX ची मुख्य उद्दिष्टे आहेत. एलॉनच्या मते मानवी संस्कृती टिकण्यासाठी आणि तिची प्रगती होण्यासाठी पृथ्वी व्यतिरीक्त इतरत्र मानवी वस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्लोबल वार्मिंग, अणुयुद्ध, प्रलय, दुष्काळ, पाणी आणि अन्नाचा अभाव अशा कोणत्याही कारणाने मनुष्यजातीचा संपूर्ण विनाश होईल. त्याच्या मते, डायानोसोर्स ना जे शक्य नव्हत ते माणसाला शक्य आहे. म्हणूनच इतरत्र वस्ती करणे हे संपूर्ण मनुष्यजातीसाठी आवश्यक आहे.
SpaceX ने मंगळावर माणसे आणि सामग्री पोहोचवून पुन्हा व्यवस्थित पृथ्वीवर परत येणारे यान बनवायला घेतले आहे आणि त्याची पहिल्या टप्प्यातील यशस्वी चाचणीही घेतली आहे. आणखी १०-१२ वर्षांत मंगळावरील दळणवळण सोपे, स्वस्त आणि शक्य होईल (थोडक्यात मंगळावरील शटल सर्विस!) असा एलॉनचा दावा आहे.
खाली दिलेला व्हीडीओ पाहून SpaceX च्या कामाची एक झलक आपल्याला दिसू शकेल.
गेले कित्येक वर्षे दररोज १६ तास असे अथक आणि अविरत परिश्रम करणारा एलॉन मस्क हा अनोखा ईंजीनीअर आणि बिझनेसमॅन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखीही जीवनमान बदलवून टाकणारया आणखीही काही महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया पुढील लेखात !
क्रमशः
सलिल चौधरी
0 comments:
Post a Comment