300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 10 January 2014

Tagged under: , , ,

बहुपयोगी ट्विटर याद्या म्हणजेच लिस्ट्स कशा तयार कराव्यात ?


ट्विटर या सोशल नेटवर्किंग वाहिनी वर अनेकविध विषयांचे तज्ञ भरपूर माहिती ट्विट म्हणजे प्रसारित करीत असतात. ट्विटर हा माहितीचा एक महासागर बनलेला आहे. त्यामुळे ट्विटर युजर्स सहसा हजारो लोकांना फॉलो करीत असतात. सेकंदा – सेकंदाला एकदम पंचवीस तीस ट्विट्सचा भडीमार आपल्या टाईमलाईन वर होत असतो. अशा वेळा काय बघावे आणि काय सोडावे ते कळत नाही.  ट्विट्स पण वेगवेगळ्या विषयांवरच्या असतात. या गोंधळातून आपल्याला हव्या त्याच माहितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘ट्विटर याद्या’ (Twitter Lists) हे फीचर आपल्या मदतीला येते. आज आपण ट्विटर याद्या म्हणजे काय, त्या कशा तयार कराव्यात आणि त्यांचे फायदे काय हे बघणार आहोत.

ट्विटर याद्या म्हणजे काय?

ट्विटर वर एखाद्या विशिष्ट युसर्सचा समूह बनवून त्यांच्या ट्विट एकाच जागी बघायच्या असल्यास ट्विटर वर यादी बनविता येते. अशा प्रत्येक यादीचा स्वत:चा एक दुवा तयार होतो. आणि अशा अनेक याद्या तयार करता येतात. ट्विटर याद्या सहसा विशिष्ट विषयांच्या ट्विट फोलो करण्यासाठी बनविल्या जातात. उदा. मला सोशल मिडिया बद्दल तज्ञ काय म्हणत आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर मी सोशल मिडियासाठी एक यादी बनवून त्यात सदस्य म्हणून मला हव्या असलेल्या युसर्सची नावे समाविष्ट करू शकते. एका यादीत आपण जास्तीत जास्त ५००० सदस्य समाविष्ट करू शकतो आणि जास्तीत जास्त एक हजार याद्या आपण बनवू शकतो. म्हणजे माहितीचा महासागर आपल्या हातात तो सुद्धा कमीत कमी वेळ खर्च करून आणि आपल्या मेंदूत खूप माहितीचा गोंधळ उडू न देता.       

ट्विटर याद्या कशा तयार कराव्यात:

ट्विटर वर यादी बनविणे खूपच सोपे आहे.
ट्विटर वर याद्या बनविण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

१. ट्विटरमध्ये लॉग इन केल्यावर आपण फोलो करत असलेल्या ट्विट दिसतात. उजव्या हाताला गियरचे चिन्ह असते. त्यावर टिचकी द्या.


प्रतिमा: ट्विटर गियर चिन्ह


२. गियरच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर लिस्ट्स असा पर्याय दिसतो. त्यावर टिचकी द्या. किंवा लिस्ट्स पर्याय हा 'Me' असे लिहिलेले असते तिथे टिचकी दिल्यास डाव्या हाताला दिसतो, त्यावर टिचकी देऊनही आपण लिस्ट्स पर्यंत पोहोचू शकतो.

३. उजव्या हाताला Create List हा पर्याय दिसतो. त्यावर टिचकी द्या.  

प्रतिमा: ट्विटर वर यादी (लिस्ट) कशी बनवावी
४. पुढे आपल्याला चौकोनी खिडकीत नवीन यादी संदर्भात नाव, यादीचे वर्णन असे पर्याय दिसतात. आपल्या लिस्ट म्हणजे यादीचे नाव लिहावे. आपण अनेक याद्या बनविल्यावर पुन्हा कुठली यादी कशाची याचा गोंधळ उडणार नाही, असे विशिष्ट नाव यादीला द्यावे.  



५. खालील चौकोनात Description म्हणजे यादी कशाबद्दल आहे, त्याची माहिती थोडक्यात लिहावी. १०० Characters मध्येच ही माहिती लिहिण्याची परवानगी आहे. त्यामुळे मोजक्याच शब्दांत पण माहितीवरून या यादीतून कुठल्या विषयाच्या ट्विट किंवा कुठल्या विषयाचे तज्ञ या यादीत सदस्य आहेत हे स्पष्ट होईल असे लिहावे. माहिती म्हणजे Description लिहिणे बंधनकारक नाही. त्यामुळे एकदा यादी बनविल्यावर नंतर केव्हाही माहिती लिहिली तरी चालते.

६. ट्विटर लिस्ट सार्वजनिक किंवा खासगी ठेवता येऊ शकते. त्यासाठी Public किंवा Private असे पर्याय असतात. आपल्याला हवा असलेला पर्याय निवडावा. आणि Save वर टिचकी द्यावी.

ट्विटर यादीत सदस्य कसे समाविष्ट करावेत?

१. आपल्याला ज्या ट्विटर युसरला यादीत सदस्य करायचे आहे, त्यांच्या नावावर टिचकी द्या. एक पॉप अप खिडकी उघडेल, जे त्या युसरचे प्रोफाईल असेल.

२. फोलो बटणाच्या डावीकडे जो आयकॉन असेल त्यावर टिचकी द्या. त्यात विविध पर्याय दिसतील.

३. त्यांतील Add or Remove from the list पर्यायावर टिचकी द्या. 

प्रतिमा :ट्विटर यादीत सदस्य कसे समाविष्ट करावेत


४. आपल्याला हवी ती यादी चेकबॉक्स वर टिचकी देऊन निवडा. सदस्य यादीत समाविष्ट होतील.

ट्विटर यादीतून सदस्य काढून कसे टाकावे?:

Add or Remove From The list पर्याय अनचेक करा. जे सदस्य यादीतून काढले जातील.

ट्विटर याद्या: महत्त्वाची माहिती:

आपण ज्या व्यक्तीला फोलो करीत नाही, त्यांना सुद्धा ट्विटर लिस्ट मध्ये सदस्य बनवू शकतो.
आपल्या लिस्ट सार्वजनिक म्हणजेच पब्लिक ठेवल्या तर इतर युसर्सना त्या Subscribe करता येतात. त्यामुळे लिस्ट पब्लिक ठेवणेच अधिक चांगले.

इतर युसर्ससुद्धा आपल्याला लिस्टमध्ये सदस्य बनवू शकतात.

आपल्याला कोणी एखाद्या लिस्ट मध्ये घातल्यास त्याची सूचना ट्विटर देते. आपण कुठकुठल्या लिस्टचे सदस्य आहोत हे बघण्यासाठी आपल्या प्रोफाईलवर म्हणजे जिथे ‘मी’ लिहिले आहे तिथे जावे. आणि लिस्ट वर टिचकी द्यावी. Member Of  वर टिचकी दिल्यास आपण ज्या लिस्ट मध्ये आहोत त्यांची यादी दिसेल.

प्रतिमा: ट्विटर वर लिस्ट्स बटन


ट्विटर लिस्ट्स नक्की वापरून पहा. आपण एखादी उपयुक्ती यादी बनवून इतरांसाठी माहितीचे स्रोत बनू शकता. त्यामुळे आपले फोलोअर्स वाढतील. विविध लिस्टना सब्स्क्राइब करून बघा आणि माहितीचा नवीन खजिना उघडा.
आपल्या शंका, प्रश्न आणि प्रतिक्रिया अवश्य मांडा.     



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment