300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 14 August 2013

Tagged under: , , , , ,

ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग २/३

ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग २/३

मागील लेखात आपण काही ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करुन देणार्‍या वेबसाईट्सची माहिती पाहिली. मला खात्री आहे की आपल्यापैकी बर्‍याच जणांनी या कोर्सेसचा फायदा घेतला असेल. आणि नसेल घेतला तर अजुनही वेळ गेलेली नाही. (नविन काही शिकण्यासाठी कोणतीही वेळ चांगलीच !)
आज आपण या लेखाच्या दुसर्‍या भागात अशाच आणखी काही साईटसची माहिती घेऊया -

COURSEHERO

 

 


कोर्सहीरो.कॉम या वेबसाईटला मी ती सुरु झाल्यापासुन पाहतोय. खुप कमी कालावधीत खुप जास्त प्रगती केली आहे या साईटने. Coursehero मध्ये खुप सारे शैक्षणीक कागदपत्रे आहेत. अनेकविध विषयांच्या आणि कॉलेजेसच्या नोट्स ईथे मिळतात. याच साईटमध्ये आणखी एक सेक्शन कोर्सेसचा आहे. सुरुवातीला हे कोर्सेस मोफतच होते मात्र आता बर्‍याच कोर्सेस साठी पैसे आकारण्यात येतात. काही मुलभूत कोर्सेस अजुनही मोफत आहेत.
Business (व्यवसाय), Entreprenuership (उद्योजगता) , web programming (वेब प्रोग्रमींग) असे तीन मुख्य प्रकारचे कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत. पुर्णपणे व्हीडीओच्या माध्यमातून हे कोर्स उपलब्ध असल्याने आपल्या वेळेनुसार ते केव्हाही आणि कितीही वेळ घेऊन पुर्ण करता येतात. 



कोर्सटॉक ही साईट अतीशय उपयुक्त आहे. या साईटचा स्वतःचा असा कोणताही कोर्स नाही आहे. मात्र इथे अनेक ऑनलाईन साईट्स आणि प्रख्यात युनीवर्सीटी मधील कोर्सेसची यादी एकाच ठीकाणी देण्यात आलेली आहे. सर्व कोर्सेसची विषयवार मांडणी आणि प्रत्येक कोर्सला रेटींग देण्यात आलेले आहे. त्यमुळे कोणता कोर्स अधिक चांगला आहे हे लगेचच ओळखता येते.

 

UDEMY -


युडेमी ही तशी नविन साईट आहे परंतु अल्पावधीतच तिने चांगला जम बसवला आहे. यातिल बरेचसे कोर्सेस हे पैसे भरुन करावे लागतात. थोडे शोधल्यावर मोफत कोर्सेसही मिळतील. अनेकविध विषयांचे कमी वेळात पुर्ण करता येणारे कोर्सेस ईथे मिळतात. युडेमीची खासियत म्हणजे येथे कोणीही कोर्स बनवुन विकु शकतो. जर तुम्हाला एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल आणि तो तुम्ही ऑनलाईन शिकवु शकत असाल तर युडेमी नक्की वापरुन पहा. ऑनलाईन पैसे कमावण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

 

LURNQ -




लर्नक्यु ही एक भारतीय साईट आहे. गेल्यावर्षीच सुरु झालेल्या या साईट मध्ये विविध विषयांवरील तज्ञ आपापल्या आवडीच्या विषयांवरील माहितीचे येथे आदानप्रदान करतात. या साईट वरील माहिती पुर्णपणे मोफत आहे.


जर तुम्हाला Ruby, Python , PHP, Jquery, HTML, CSS अशा वेबप्रोग्रामींगच्या भाषा (Codeing languages) शिकायच्या असतील तर codeacademy इतका दुसरा चांगला पर्याय नाही. नुसतं पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा जे शिकवलं जातं ते लगेचच वापरुन पाहण्याच्या codeacademy च्या पद्धतीमुळे वेब प्रोग्रामींग शिकणे अतीशय रंजक ठरते.


ईंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सीटी म्हणजे ईग्नोउ (IGNOU) तर आपल्याला ठाऊक असेलच. फ्लेक्झीलर्न हा IGNOU चाच एक उपक्रम आहे. शेकडो विषयांवरचे lectures येथे सर्वांसाठी खुले करण्यात आलेले आहेत. कोणीही, कधीही या lectures चा फायदा करुन घेऊ शकतो.

National Program on Technology Enhanced Learning म्हणजेच NPTEL. हा भारत सरकारचा उपक्रम असुन येथे IIT मधील प्रोफेसर्सचे अनेक व्हीडीओ लेक्चर्स एकत्रीत करण्यात आले आहेत. मुख्यत्वे करुन अभियांत्रिकी विषयांबद्दलचे हे लेक्चर्स म्हणजे एक खजिनाच आहे.

मित्रांनो ऑनलाईन शिक्षण हे नवे क्षेत्र आता फार झपाट्याने वाढत आहे. कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण जगभर पोहोचवता येत असल्यामुळे हे क्षेत्र वाढतय. रोज नवनविन कंपन्या या क्षेत्रात येत आहेत. अशाच आणखी काही नविन पर्यायांची माहिती आपण पुढील लेखात घेऊ. तोपर्यंत Happy Learning !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment