300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 26 March 2013

Tagged under: , ,

उद्धब भराली - The grassroot innovator




मित्रहो, आज मी तुमची भेट एका अवलियाशी करुन देणार आहे. हा अवलिया एक अतिशय हुशार , बुद्धीमान आणि मेहनती असा संशोधक आहे. उद्धब भराली (Uddhab Bharali) नावाच्या या व्यक्तीकडे एकुण ३९ जागतीक पेटंट्स आहेत आणि त्यांनी ९८ वेगवेगळी उत्पादने बनविली आहेत.
आसाम मध्ये राहणार्‍या उद्धब यांनी बनविलेल्या एका उपकरणाला नुकताच नासाने (NASA) NASA Exceptional Technology Achievement या पुरस्काराने गौरविले.

उद्धब हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांच्या या हुशारीमुळेच त्यांना शाळेत असताना पहिलीतून थेट तिसरीत आणि पुढे पाचवीतून थेट दहावीत प्रवेश मिळाला होता. त्यांना गणित या विषयात विशेष रुची होती. शाळेत असताना देखिल ते ११-१२ ची कठीण गणिते सोडवु शकत होते. उद्धबजींनी पुढे इंजीनीअरींगला प्रवेश मिळवला परंतु आर्थिक समस्येमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काम करुन घरखर्च चालवण्याची जबाबदारी त्याम्च्यवर पडली आणि यातूनच त्यांना त्यांच्यातील संशोधकाची ओळख झाली.

वडीलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायामुळे उद्धब यांच्या घरावर बॅंकेचे १८ लाख इतके कर्ज झाले होते. कोणतीही नोकरी करुन इतके कर्ज फेडता येणे शक्य नव्हते हे उद्धबना ठाऊक होते. त्याचवेळेस एका कंपनीस पॉलीथीन बनविणार्‍या एका परदेशी मशिनची कॉपी करुन तशीच मशीन कमीत कमी खर्चात भारतात बनवाय्चे होती. उद्धबजींनी हे आव्हान स्वीकारले. ५ लाख रुपये किंमत असलेल्या या मशीनची प्रतीकृती त्यांनी बनवून दाखविली आणि ते देखील फक्त ६७००० रुपये इतक्या कमी किमतीत. तेव्हा उद्धबजीम्चं वय होते २३ वर्षे. आपल्यातील या कौशल्याची त्यांना जाणीव झाली नंतर त्यांनी अनेक अशी उत्पादने बनविण्याचा सपाटाच लावला.

२००५ साली National Innovation foundation (NIF) Ahmedabad यांनी उद्धब भरालींच्या उत्पादनांची आणि शोधांची दखल घेतली. आणि त्यानंतर उद्द्बजींना कधीच मागे वळून पहावे लागले नाही.



उद्धब यांनी मुख्यत्वेकरुन शेती साठी उपयुक्त ठरतील अशी अनेक उपकरणे बनविली. त्यांचे सर्वात जास्त गाजलेले संशोशन म्हणजे Pomegranate de-seeder.(डाळींब सोलण्याचे यंत्र). डाळींबाचे फळ सोलण्यासाठीचे यंत्र बनविण्यासाठी अमेरीकेतील इंजीनीअर्स बरेच प्रयत्न करत होते. परंतु ३० वर्ष मेहनत करुन देखील असे यंत्र त्यांना बनवता आले नव्हते.

जेव्हा उद्धबजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी या यंत्रावर काम करण्याचे ठरविले. आसाममध्ये डाळिंब हे फळ सहजगत्या उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांना फळे विकत  आणण्यासाठी ५०० किमी प्रवास करावा लागत असे. अनंत प्रयोग करुन अखेरीस त्यांनी हे यंत्र बनवून दाखविलेच. याच यंत्राला NASA , MIT या मोठ्या संस्थांनी नावाजले. आणि उद्धब भराली हे व्यक्तीमत्व जगासमोर आले. आज त्यांना अनेक विविध देशांमधून वेगवेगळी उत्पादने बनविण्याची कामे दिली जात आहेत.



Pomegranate de-seeder.(डाळींब सोलण्याचे यंत्र) प्रमाणेच सुपारी फोडण्याचे यंत्र, अपंगांसाठी बनविलेली Mechanised toilet , चहाच्या पानांपासुन चहा पावडर (CTC) बनविण्याचे यंत्र ही त्यांची गाजलेली इतर उत्पादने होत.




एवढ्या विविध उपकरणांचा शोध लावून देखील उद्धबजींनी कोणतेही उपकरण गरजु आणि गरीब शेतकर्‍यांना विकले नाहे, तर ते त्यांनी मोफत वाटले आहे. तसेच या उपकरणांची व्यापारी तत्त्वावर निर्मीती (Commercial production) करणे त्यांनी टाळले. पैसा आणि संपत्ती ही माणसाला वेडं करते आणि त्यामुळे नविन संशोधन होऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत आहे. आपले कुटूंब आणि संशोधनाचा खर्च चालावा यासाठी ते आपली उत्पादने बनविणार्‍या कंपन्यांकडून Royalty च्या स्वरुपात पैसे घेतात.

असा हा जागतीक दर्जाचा innovator  हा भारताचा खरा सुपुत्र आहे. उद्धब भरालींसारख्या व्यक्ती भारतात असणे ही आपणां भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment