अगर वो जान भी मांग लेते तो शिकवा न था
मगर कम्बख्त ने जीमेल का पासवर्ड मांग लिया ...........
जीमेल च्या पासवर्ड चे महात्म्य सांगण्यासाठी मला यापेक्षा चांगली प्रस्तावना करता आली नसती :-)
मित्रहो आपला जीमेलबॉक्स हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. खाजगी, व्यावसायाशी संबंधीत , आर्थिक असे अनेक महात्वाचे दस्तऐवज आपल्या जीमेलबॉक्स मध्ये दडलेले असतात. हा अतिमहात्वाचा ऐवज असलेली तिजोरी असते ती केवळ पासवर्ड रुपी किल्लीच्या भरवशावर ! साहाजीकच ही तिजोरी उघडण्यासाठी अनेक चोर टपून बसलेले असतात. अशा चोरांपासून जीमेलबॉक्सला अधिक सूरक्षीत करण्यासाठी गुगलने Two Step Verification ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यालाच Two Factor Authentication असेही म्हणतात.
Two Step Verification म्हणजे काय ?
सोप्या भाषेत सांगायच तर Two step verification म्हणजे गुगल अकाउंट वापरण्यासाठी एक नव्हे तर दोन पासवर्ड वापरणे. यापैकी पहिला पासवर्ड आपला नेहमीचा जीमेल / गुगल पासवर्ड असतो. पहिला पासवर्ड बरोबर असल्यास दुसरा पासवर्ड विचारला जातो. हा दुसरा पासवर्ड मोबाइल फोन मध्ये SMS च्या स्वरूपात पाठवला जातो. किंवा असा पासवर्ड generate करणारे अप्लीकेशन्स Android/ iphone/ Blackberry मध्ये उपलब्ध आहेत.
Two Step Verification कसे वापरावे ?
Step 1 - गुगल अकाउंट / जीमेल मध्ये Log In करा आणि खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Account ला क्लिक करा
Step 2 - Security या लिंक वर क्लिक करा.
Step 3 - Settings या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला पुन्हा जीमेल मध्ये Log in करावे लागेल.
Step 4 - २ स्टेप वेरीफिकेशन ची प्रक्रिया येथून सुरु होते.
Step 5 - ज्या मोबाईल नंबर वर २ स्टेप वेरीफिकेशन कोड यायला हवा तो क्रमांक येथे लिहा आणि चित्रात दाखविल्या प्रमाणे Text Message हा पर्याय निवडा.
Step 6 - गुगल द्वारे एक SMS त्वरीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. या SMS मध्ये एक कोड दिलेला असेल. तो खाली चित्रात दाखविलेल्या चौकोनात लिहा आणि Verify या बटनावर क्लिक करा.
Step 7 -
Step 8 - आता २ step verification ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यापुढे Log in करताना दोन पासवर्ड द्यावे लागतील. दुसरा पासवर्ड गुगलद्वारे SMS केला जाईल अथवा मोबाईल अप्लिकेशनवर दाखविला जाईल.
जर तुमचा मोबाईल फोन हरवला तर -
https://accounts.google.com/Sm
जर तुम्ही परदेशात असाल, किंवा कोणत्याही मोबाइल पासुन दूर असाल तर
https://accounts.google.com/Sm
2 Step Verification चे मोबाईल अप्लिकेशन्स डाउनलोड करा -
Android - https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.authenticator2
iPhone - https://itunes.apple.com/us/app/google-authenticator/id388497605?mt=8
आजच 2 Step Verification कार्यान्वित करा आणि निश्चिंतपणे गुगलच्या सर्व सेवांचा उपयोग करा. आता चोरांपासून तुमच्या गुगल अकाऊंटला बिलकूल धोका नाहीं.
0 comments:
Post a Comment