Sunday, 16 September 2012
Tagged under: ebook, marathi books, marathi books free, टल्लीची शाळा
टल्लीची शाळा
२००९ साली भाऊबीजेच्या मुहुर्तावर प्रकाशित झालं, मराठी साहित्यात थेट ई-आवृत्तीत प्रकाशित होणारं हे पहिलंच ई-बुक आहे. और्कुटच्या एका थ्रेडवर टल्ली नावाच्या एका व्यक्तीने टाकलेल्या या कविता. कथेचं एक सुत्र त्यात होतंही आणि नव्हतंही. होतं, कारण त्यात एका मुलाच्या आयुष्याचा धागा होता. नव्हतं, कारण या कथेत काही नाविन्य नव्हतं, नाट्य नव्हतं.
आपल्या आजुबाजुला घडणा-या असंख्य घटनांपैकी या साध्यासुध्या घटना आहेत. कविता म्हटलं कारण त्यांतून भावुकतेचा एक स्त्रोत आहे पण ती भावुकता शब्द बंबाळ नाही.थोडक्यात एखादी बातमी सांगावी तसा त्यांचा बाज आहे. त्यात गा-हाणं नाही. फ़क्त मुलाला दिसलेल्या घटना. त्या घटनांचा अर्थ वाचकावर सोडलेला आहे हे वर्णन सेल्फ़लेस नाही. पण त्यातला सेल्फ़ इतरांवर स्वत:च्या भावना लादत नाही. तरीही जर कुणी भावुक झालंच तर त्याचं श्रेय वाचकाच्या संवेदनशीलतेला जातं.
( पुस्तक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment