300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday 29 April 2012

Tagged under: , ,

गुगल ड्राईव्ह ( Google Drive )

गुगल ड्राईव्ह -

गुगल काकांनी अखेरीस त्यांचे बहुचर्चित उत्पादन "गुगल ड्राईव्ह" इंटरनेट वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. गेले २-३ वर्षे मी गुगल ड्राईव्ह बद्दल चर्चा ऐकत होतो (वाचत होतो :-) तेव्हा गुगल ड्राईव्ह बाजारात आणण्यास थोडा उशिरच झाला गुगलला.

काय आहे गुगल ड्राईव्ह (Google Drive) -

गुगल ड्राईव्ह म्हणजे क्लाऊड कंप्युटींगच्या क्षेत्रात गुगलचे पुढचे पाउल आहे. या सुविधेमार्फत आता संगणकावरील महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फाईल्स (वर्ड, एक्सेल, पीडीफ, पॉवरपॉईंट फाईल्स, फोटोग्राफ्स, zip फाईल्स, म्युझिक फाईल्स, व्हीडीओ) गुगल ड्राईव्ह मध्ये साठवता येतात. एकदा अपलोड केल्यानंतर या सर्व फाईल्स आपल्याला जगातील कोणत्याही ठिकाणाहुन पाहता येतील, डाउनलोड करता येतील आणि त्यामध्ये बदलही करता येतील.

गुगल ड्राईव्हचा कसा उपयोग करता येईल ?

समजा तुमच्या घरातील संगणकावर काही फोटोग्राफ्स साठविलेले आहेत आणि तुम्हाला ऑफिसमधील संगणकावरुन ते फोटो कोणाला त्वरीत पाठवायचे आहेत तर अशा वेळेस घरच्या संगणकावरील फोटो CD किंवा USB pen drive मध्ये कॉपी करुन घ्यावे लागतात. आणि हे काम त्वरीत करता येईलच असे नाही. अशा वेळेस जर फोटो गुगल ड्राईव्ह मध्ये साठविलेले असले तर कधीही वापरता येतात.

जर तुम्ही एखाद्या पिकनिक करीता बाहेर गेला आहात आणि अचानक ऑफीसमधील संगणकावर असलेली महत्त्वाची फाईल तुम्हाला पहायची असेल तर पुर्ण संगणक (लॅपटॉप) सोबत न्यायची आवश्यकता नाही , गुगल ड्राईव्ह वर फाईल्स सेव्ह करा आणि निश्चींतपणे कोठुनही फाईल्स पहा अथवा डाउनलोड करा.

गुगल ड्राईव्हचा आणखी एक फायदा आहे. आपल्या महत्वाच्या फाईल्स एकदा गुगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह केल्या की त्यानंतर कधी लॅपटॉप हरवला किंवा संगणक खराब झाला तरी महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षीत राहतात.



गुगल ड्राईव्ह आपल्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५ GB इतकी स्टोरेज स्पेस उपलब्ध करुन देते. एवढी स्टोरेज स्पेस आपली आयुष्यभरची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी पुरेशी आहे. एवढेच नव्हे तर $२.४९ प्रती महिना या दरात गुगल ड्राईव्ह मध्ये २५ GB इतकी स्टोरेज स्पेस विकत घेता येते.

मित्रांनो गुगल ड्राईव्ह म्हणजे फक्त "इंटरनेटवरील फाईल्स साठविण्याची जागा" एवढेच नसून त्यापलीकडे बरेच काही आहे. गुगल ड्राईव्ह सोबत मिळणार्‍या इतर अनेक सुविधा खालीलप्रमाणे -
  1. गुगल ड्राईव्ह मध्ये फक्त फाईल्स साठविताच येत नाही तर गुगल डॉक्स प्रमाणे नविन फाईल्स बनविता देखिल येतात. आपण बनविलेल्या फाईल्स इतरांसोबत शेअर करता येतात. आणि सर्वांसोबत एकत्र edit करता येतात.
  2. गुगल ड्राईव्ह मधील फाईल्स पाहण्यासाठी डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. गुगल ड्राईव्ह मध्येच फाईल्स (म्युझिक फाईल्स वगळता) उघडता आणि वाचता येतात.
  3. गुगलची ताकद म्हणजे "सर्च". आपण अपलोड केलेल्या फाईल्स आणि त्यामधील मजकुर देखिल सर्च करता येतात. एवढेच नव्हे तर स्कॅन केलेल्या फाईल्स मधील मजकुर शोधणे पण यामध्ये शक्य होते.
  4. तुम्ही Gmail वापरत असाल तर गुगल ड्राईव्ह मधील फाईल ईमेल अ‍ॅटॅच करणे सोपे होते.
  5. एकापेक्षा अधिक संगणक आपल्याला गुगल ड्राईव्ह सोबत जोडता (Sync) येतात. संगणकावरील विशिष्ट फोल्डर गुगल ड्राईव्ह सोबत sync केल्यानंतर फोल्डरमध्ये केलेले बदल आपोआप गुगल ड्राईव्ह मध्ये समाविष्ट केले जातात. उदाहरणार्थ - Sync केलेल्या फोल्डरमध्ये जर एखादी नविन फाईल सेव्ह केली तर ती आपोआप गुगल ड्राईव्ह मध्ये समाविष्ट केली जाते.
क्लाउड कंम्प्युटींगचा खरा उपयोग करण्यासाठी "गुगल ड्राईव्ह" वापरणे निश्चीतच आवश्यक आहे.
गुगल ड्राईव्ह वापरण्यासाठी drive.google.com/start येथे भेट द्या आणि आपल्या Gmail id  ने लॉगईन करा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment