300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Monday, 18 April 2011

Tagged under:

"मुंबई दर्शन" करा गुगल मॅप्स (Google Maps) च्या मदतीने !

खरी मुंबई पहायची असेल तर लोकल ट्रेन आणि लाल रंगाच्या "बेस्ट" बसेस शिवाय पर्याय नाही. मुंबईचं अवघं जीवन या ट्रेन्स आणि बसेसच्या अवतीभवतीच फिरत असतं. मात्र हा प्रवास सोपा नाही हे काही वेगळ सांगायला नको. आपणा मुंबईकरांना याची सवय झाली असेल कदाचित, परंतु नियमीत प्रवास न करणार्‍या मुंबईकरांना तसेच मुंबईत येणार्‍या पाहुण्यांना या प्रवासाची धास्तीच असते. कोणती टेन, किती वाजता, कुठे पकडायची असे प्रश्न तर असतातच त्यासोबत स्टेशन पासून पुर्वेला बाहेर पडायचे की पश्चीमेला, कोणती बस, कोठून पकडायची, कुठे उतरायचे असे अनेक प्रश्न मनात घेऊन नवख्या माणसांना प्रवास करावा लागतो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या लेखात मिळणार आहेत.

आपल्या गुगल काकांनी या प्रश्नावरही उत्तर शोधले आहे. गुगल काकांच्या यशाचे रहस्य दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोपी उत्तरे शोधण्याच्या त्यांच्या कलेत दडलेले आहे. चला तर मग पाहुया गुगल काकांनी आपल्याला कशी मदत केली आहे ते.

गुगल मॅप्स (Google Maps) या सेवेमध्ये गुगलने संपुर्ण जगाचा नकाशा यापुर्वीच उपलब्ध करुन दिला होता. याच सेवेसोबत आता गुगलने मुंबईच्या बस आणि ट्रेनचे मार्ग, वेळापत्रक इत्यादी माहिती एकत्र गुंफली आहे. http://maps.google.co.in या लिंकवर क्लिक करुन आपल्याला गुगल मॅप्स वर जाता येईल. तेथे डाव्याबाजुला सर्वात वरती Get Directions असे लिहिलेले आढळेल. त्यावर क्लिक करा.


A आणि B असे दोन पर्याय दिसतील. A मध्ये सुरुवातीचे ठीकाण आणि B मध्ये जेथे जायचे आहे ते ठिकाण लिहा. आणि Get Directions (वरील चित्रात पहा) या बटणावर क्लिक करा. तुम्ही दिलेल्या पत्ता अचूक नसल्यास त्याच्याशी मिळताजुळता पर्याय खाली दिलेला दिसेल, त्यांपैकी योग्य ते ठिकाण निवडा. आता उजव्या बाजुला नकाशात A पासून B पर्यंत जाण्याचा रस्ता दिसेल आणि डाव्या बाजुला त्याबद्दल माहिती आणि प्रवासासाठी लागणारा वेळ दिसु लागेल.

मात्र आपल्याला लोकल ट्रेन आणि बसचा मार्ग (Public Transit) पहायचा आहे. त्यासाठी A आणि B च्या वर चित्रात दाखविल्याप्रमाणे ट्रेनचे एक चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा.


A आणि B च्या खाली आणखी काही पर्याय दिसतील त्यांचे स्पष्टीकरण -

  • Leave Now - त्वरीत प्रवासास निघायचे असल्यास हा पर्याय वापरा.
  • Depart At - ज्या वेळेस तुम्ही प्रवासास सुरुवात करणार आहात त्या वेळेवर उप्लब्ध असणार्‍या ट्रेन्सची माहिती मिळवण्यासाठी हा पर्याय वापरा.
  • Arrive By - ज्या वेळेपर्यंत तुम्हाला ईच्छीत स्थळी जायचे असेल त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यासाठी हा पर्याय वापरा.

उदाहरणादाखल आपण येथे ठाणे स्टेशन (A) ते सिद्धीविनायक मंदीर, दादर (B) या प्रवासाची माहिती घेउया. त्यासाठी येथे क्लिक करा.

डाव्या बाजुला प्रवासाचे विविध पर्याय दिसतील. त्यावर क्लिक केल्यास त्या पर्यायाची सविस्तर माहिती मिळेल.


अगदी ट्रेन मधून उतरल्यावर कोणत्या दिशेला किती मिनेटे चालावे लागेल, किती नंबरची बस कोठून मिळेल आणि त्यानंतर किती थांब्यांनंतर उतरावे लागेल अशी बारीकसारीक परंतु उपयुक्त माहिती देखिल यात देण्यात येते. मोबाईल मध्ये ईंटरनेट असल्यास हीच माहिती आपण कधीही आणि केव्हाही पाहू शकतो.

मुंबईतील प्रवास सुकर होवो न होवो, निदान या माहितीमुळे प्रवासाचे दडपण तरी नक्कीच दूर होईल. या अप्रतीम सेवेसाठी गुगल काकांना माझा सलाम !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment