आज मी नॉस्टॅल्जीक झालोय. ( nostalgia = भूतकालीन जीवनाविषयी वाटणारी ओढ). आणि हा लेख वाचताना तुम्ही पण व्हाल याची मला खात्री आहे. मित्रांनो स्वतंत्र भारतातील एका पुर्ण पीढीवर आई-वडील आणि शिक्षकांव्यतीरीक्त आणखी एका गोष्टीने संस्कार केले आहेत. ती गोष्ट म्हणजे टेलीव्हिजन. (TV). आणि मी ज्या पीढीचं प्रतीनिधीत्व करतोय त्या पीढीसाठी संस्कार करणारा TV म्हणजे दुरदर्शन. आज मी नॉस्टॅल्जीक झालोय ते दूरदर्शन साठीच.
दूरदर्शनवरील जुन्या मालिका, जाहिराती, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम, घरातील प्रत्येकाला भावणार्या आणि बांधून ठेवणार्या मालिकांची आठवण झाली की "बालपणीचा काळ सुखाचा आठवतो". आता शंभराहून अधिक चॅनेलवर सर्फींग करुनही कधीच मिळणार नाही इतका आनंद दुरदर्शनच्या DD1 आणि DD2 या दोन वाहिन्यांनी आपल्याला दिला आहे. आणि नेमका तोच अनुभव आज आपण पुन्हा अनुभवणार आहोत. आज मी तुम्हाला एका ब्लॉगची माहिती करुन देणार आहे. हा ब्लॉग पुर्णपणे दुरदर्शनला वाहिलेला आहे.
दूरदर्शनवर गाजलेल्या तलाश, फौजी, उपन्यास, सुरभी, अलिफ लैला, टीपू सुलतान, चंद्रकांता, व्योमकेश बक्षी, अजनबी, दिदी, चुनौती या मालिकांचे काही भाग किंवा शिर्षकगीते पुन्हा पहायला मिळाल्यातर आवडतील ना तुम्हाला ? वीस वर्षांपुर्वी (माझ्या ईतक्याच) लहान असलेल्या)माझ्या मित्रांनो जर He-man and masters of the Universe, Giant Robot, Jungle Book (मोगली), पोटली बाबा की, मालगुडी डेज या मालिकांचे भाग आणि शिर्षकगीते पुन्हा पहायला मिळाली तर काय मज्जा येईल नाही?
मालिका आणि लहान मुलांच्या कार्यक्रमांव्यतीरीक्त आणखी एक गोष्ट म्हणजे पुर्वीच्या जाहिराती. अमुल बटर, बुलंद भारत की बुलंद तस्वीर....हमारा बजाज, गोल्डस्पॉट, I love you रसना, जोर लगाके हैय्या (Fevicol) या जाहिराती पुन्हा पाहण्याची एक वेगळीच मजा आहे.
मला खुप खुप आवडणार्या काही मालिका आणि जाहिरातींचे व्हीडीओज मी येथे देत आहे.
एक अनेक और एकता (Ek anek aur ekta)
मिले सुर मेरा तुम्हारा (Mile Sur mera tumhara)
जायंट ऱोबोट (Giant Robot)
वंदे मातरम
आय लव्ह यु रसना !
जब मे छोटा बच्चा था ! बजाज लाईट्स.
नटराज पेन्सिल्स
Heman and masters of the Universe
दुरदर्शन
दुरदर्शनची पुन्हा एकदा सफर घडवून आणणार्या ब्लॉगची लिंक आहे http://ddnational.blogspot.com.
खरेतर हा दुरदर्शनचा अधिकृत ब्लॉग नाही आहे मात्र तरी देखिल एक अनमोल खजिना आहे. तेव्हा या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि ते पाहून नॉस्टॅल्जीक झालात तर मला दोष देऊ नका.
पण हा खजिना आवडला तर कमेंट लिहुन नक्की कळवा.
0 comments:
Post a Comment