300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 21 December 2010

Tagged under: ,

Gmail Security Check List


तुम्ही जीमेल (Gmail) वापरता का? उत्तर "हो" असेल तर इथे लक्ष द्या. (जीमेल अकाउंट नसलेला नेटकरी अजुन मला तरी भेटलेला नाही !).

ईमेल्स साठी आपण हमखास Gmail वापरतोच पण त्याच सोबत मिळणार्‍या Gtalk, Google Docs, Orkut, blogger या सेवांसाठीपण आपण Gmail वापरतो. त्यातच Gmail ने 7 GB हून अधिक जागा ईमेल्ससाठी मोफत उपलब्ध करून दिली आणि आपण ईमेल्स डिलीट करणे कायमचे विसरून गेलो. तर असा हा Gmail Inbox आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे यात कुणाचेच दुमत नसावे. Gmail मध्ये आपला बराच महत्त्वाचा डेटा आणि माहिती समावलेली असते म्हणूनच Gmail अकाउंट हॅकर्स पासून सुरक्षीत ठेवणे अत्यावश्यक आहे.
गेल्या काही महिन्यात Gmail अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत आणि म्हणून गुगलकाकांनी स्वतःच जीमेल अकाउंट जपण्याविषयीची माहिती जीमेल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. Gmail Security Check List या लिंकवर ही माहिती उपलब्ध आहे. नेटभेटच्या वाचकांसाठी  ही माहिती मी मराठीत (थोडक्यात) देण्याचा प्रयत्न करत आहे.


जीमेल सीक्युरीटी चेकलीस्ट मुख्यत्वे ५ भागांत विभागलेली आहे. प्रत्येक भागामध्ये २-३ उपविभाग आहेत. या लेखामध्ये आपण या ५ मुख्य प्रकारांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.


Part 1: Your Computer (संगणक)


या भागामध्ये तुमच्या संगणकाच्या सुरक्षेसंबंधी टिप्स दिल्या आहेत. संगणकामधील व्हायरस आणि मालवेअर वेळीच शोधुन त्यावर उपाय योजना करणारे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स इंस्टॉल करणे आणि अद्ययावत ठेवणे याबाबत येथे माहिती देण्यात आली आहे. तसेच गुगल पॅक मध्ये मिळणार्‍या मोफत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्सची आणि इतर उपयोगी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्सच्या लिंक्स देखिल येथे देण्यात आल्या आहेत.
संगणकाची ऑपरेटींग सीस्टम आणि इतर प्रोग्राम्स (Third party softwares) सुरक्षीत आणि अद्ययावत ठेवण्याबाबत टीप्स देखिल यामध्ये देण्यात आल्या आहेत.


Part 2: Your Browser (इंटरनेट ब्राउजर)


इंटरनेट ब्राउजर्स हे कोणत्याही हॅकर्सचे किंवा व्हायरसेसचे आवडते अप्लिकेशन असते कारण संगणकामध्ये किंवा ईमेल अकाऊंट मध्ये शिरकाव करण्यासाठीचा हा सर्वाधिक सोपा मार्ग आहे. इंटरनेट एक्स्प्लोरर, क्रोम, फायरफॉक्स, ओपेरा, सफारी यापैकी आपण वापरत असलेले ब्राउजर्स आणि add ons /extensions अद्ययावत ठेवण्याबद्दल माहिती या भागात देण्यात आलेली आहे. माझ्या मते गुगल क्रोम हा सध्याचा सर्वाधिक सुरक्षीत मानला गेलेला वेब ब्राउजर आहे.

Part 3: Your Google Account (गुगल अकाउंट)

जीमेल अकाउंटचा पासवर्ड सतत बदलत राहण्याचे महत्त्व, हॅक केलेला/विसरलेला पासवर्ड परत मिळविण्या संबंधीची माहिती आणि चांगला पासवर्ड निवडण्यासंबंधीच्या काही टीप्स या भागात देण्यात आल्या आहेत.

Part 4: Your Gmail Settings (जीमेल सेटींग्ज)

जीमेल अकाऊंटमध्ये असलेल्या सेटींग्ज देखिल ईन-बॉक्सच्या सुरक्षीतते संबंधी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ जीमेल सोबत http:// ऐवजी HTTPS:// हा सुरक्षीत प्रोटोकॉल वापरणे, जीमेल ईनबॉक्समध्ये सगळ्यात खाली "Last account activity" नमूद केलेली असते तिच्या सहाय्याने आपल्या ईमेल अकाउंटमध्ये झालेल्या काही गैरप्रकारासंबंधीची माहिती मिळवणे अशा टीप्स जीमेल सेटींग्ज या भागात दिलेल्या आहेत.

Part 5: Final Reminders (आणखीन काही महत्त्वाच्या सूचना)
  • जीमेल कधीही कोणत्या मेसेज किंवा ईमेलद्वारे तुमचे युझरनेम आणि पासवर्ड संबंधी विचारणा करणार नाही. त्यामुळे अशी विचारणा करणार्‍या ईमेल्सपासून सावध रहा.
  • तुम्हाला पाठविल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करुन त्यानंतर तुमचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड टाईप करु नका. नेहमी https://mail.google.com किंवा https://gmail.com/ हा पत्ता ब्राउजर मध्ये टाईप करुनच आपला ईमेल बॉक्स उघडावा.
  • इतर वेबसाईट्सना आपला जीमेल पासवर्ड देऊ नका कारण या वेबसाईट्सच्या सत्यासत्यतेची खात्री गुगल देउ शकत नाही. (सध्या अनेक सोशल नेटवर्कींग साईट्समध्ये आपल्या Gmail contacts ला आमंत्रणे पाठविण्याची सोय असते. पुर्णपणे खात्री असल्याशिवाय अशा साईट्सना आपला पासवर्ड देऊ नये.
  • "Stay signed in" या पर्यायाचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुम्ही स्वतःचा संगणक वापरत असाल. कॉलेज, हॉटेल, सायबर कॅफे किंवा ऑफीसमधील संगणकांचा वापर करताना या पर्यायाचा कटाक्षाने वापर टाळा.
  • ईमेल वाचुन झाल्यावर Sign Out  करायला विसरु नका.
मित्रहो, तशा साध्यासोप्या वाटणार्‍या या टीप्सकडे दुर्लक्ष करु नका. ऑनलाईन सुरक्षेची सुरुवात आपल्या ईमेल अकाउंटपासून आजच करा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment