आज एका वेगळ्याच विषयावर लेख लिहायला घेतला होता आणि अचानक या व्हीडीओची आठवण आली. मग काय About turn, विषsssय बदल.:-)
मित्रांनो ज्या व्हीडीओबद्दल मी बोलत आहे तो व्हीडीओ आहे “This Too Shall Pass.” या गाण्याचा. "Ok Go" या म्युझिक बँडच्या “This Too Shall Pass.” या गाण्याचा व्हीडीओ म्हणजे एक अखंड मशिन आहे. हे मशिन रुब गोल्डबर्ग (Rube Goldberg) या नावाने प्रसिद्ध असलेल्या मशिनचा एक प्रकार आहे. रुब गोल्डबर्ग मशिन म्हणजे एखादी सोपी गोष्ट करण्यासाठी मुद्दामहून अतिशय गुंतागुंतीचे आणि किचकट बनविलेले मशिन. खालील चित्र पाहिल्यावर रुब गोल्डबर्ग मशिन म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल.
अॅडम सॅडोस्की (Adam Sadowsky) हा उद्योजक व त्याची कंपनी Syyn Labs मधील कर्मचार्यांनी मिळून हे मशिन तयार केले आहे. हे मशिन तयार करण्यासाठी अॅडम सॅडोस्कीला काही पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. पहिलं म्हणजे यामध्ये कोणतेही स्पेशल इफेक्ट किंवा संगणकाच्या सहाय्याने निर्माण केलेले कृत्रीम भास नसावेत, संपुर्ण मशिनची हालचाल गाण्याच्या ठेक्यासोबत सुसंगत रहायला हवी, मशिनने काही मोजके बीट्स वाजवून गाण्यात भाग घेतला पाहिजे, मशिनचं काम अगदी गाण्याच्या सोबतच बंद झाले पाहिजे आणि या सर्व अटी कमी होत्या की काय म्हणून अॅडम सॅडोस्कीला हा व्हीडीओ एकाच प्रयत्नान पुर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती.
खाली दिलेला पहिला व्हीडीओ “This Too Shall Pass.” या गाण्याचा आहे आणि दुसर्या व्हीडीओमध्ये हे मशिन बनवण्याची कथा खुद्द अॅडम सॅडोस्की प्रेक्षकांना सांगत आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अॅडम सॅडोस्कीने हे मशिन बनवताना आलेल्या अनुभवांचा जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल हे देखिल सांगितले आहे. त्याची शिकवण त्याच्याच शब्दात मांडायचा मी प्रयत्न केला आहे.
- लहान वाटणार्या. गोष्टीच सर्वाधिक त्रासदायक ठरतात. - मी आयुष्यात अनेकदा लहान सहान गोष्टींसाठी त्रासलेला असायचो, पण हे मशिन बनविताना लक्षात आले की लहान वाटणार्या गोष्टीच सर्वात महत्त्वाच्या असतात त्यामुळे मी बारिक-सारिक गोष्टींवर लक्षपूर्वक काम करु लागलो.
- नियोजन खुप महत्त्वाचे आहे - मी नियोजनात बर्यापैकी चांगला असलो तरी बर्याचदा ऐनवेळी उस्फुर्तपणे काही गोष्टी करण्याकडे माझा कल असायचा मात्र “This Too Shall Pass.” करताना मला मला जाणवले की कोणतीही गोष्ट सुनियोजित नसली तर तिचे अंतिम परीणाम कधीच चांगले नसतात.
- आयुष्य खुप गुंतागुंतीचं असते - तणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबीक प्रश्न या सगळयांमुळे आयुष्य खुप गुंतागुंतीचं होउन जाते मात्र या गुंतागुंतीचे उत्तर त्यातच दडलेले असते.
- This too shall pass. हे माझे अतिशय आवडते बोल आहेत. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाताना मला या शब्दांनीच धीर दिला आहे.
हे मशिन बनविण्यामागची कल्पनाशक्ती, इंजीनीअरींगचे कौशल्य, भौतीकशास्त्राची सांगड, कमालीचा संयम या गुणांचे मिश्रण असलेल्या “This Too Shall Pass.” या गाण्याचा व्हीडीओ म्हणजे म्युझिक, मशिन्स अँड लाइफ या तीन मुख्य संकल्पनांचा परमोच्च बिदू आहे.
0 comments:
Post a Comment