300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 18 March 2010

Tagged under: ,

Tiltshift - आपल्या छायाचित्रांना निरनिराळ्या ईफेक्ट्सनी सजवा.

आपल्यापैकी बर्‍याच जणांना फोटोंना निरनिराळे इफेक्ट किंवा लूक देऊन एडीट करण्याचा छंद असतो. अशाच प्रकारचा एक ईफेक्ट म्हणजे tiltshift. थोडक्यात म्हणजे हा इफेक्ट आपल्या फोटोतील एखादा भाग Highlight करायला वापरला जातो असे म्हणावे लागेल.या लाच धुकट इफेक्ट असेही आपण नाव देऊ शकतो. tiltshift हे सोफ्टवेअर इंटरनेटवर अगदी मोफत उपलब्ध आहे. परंतू हे सोफ्टवेअर install करण्याआधी तुमच्या कडे Adobe AIR Runtime हे सोफ्टवेअर असणे गरजेचे आहे जर नसेल तर ते खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा आणि install करुन घ्या.हे सोफ्टवेअर install करण्यासदेखील अगदी सोपे आहे. Adobe AIR Runtime हे सुद्धा अगदी मोफत सोफ्टवेअर आहे.
हे सोफ्टवेअर install केल्यावर तुम्हाला मुख्य सोफ्टवेअर म्हणजेच tiltshit Generator install करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आता हे सोफ्टवेअर वापरायचे कसे ते बघुया. आधी tiltshift उघडा. तिकडे तुम्हाल image फाईल उघडणयासाठीचा पर्याय आणि तयार केलेली फाइल सेव्ह करण्यासाठीचे पर्याय दिसतील.



वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स तुम्ही वापरुन बघू शकता जसे की मुळ इमेज फाईलचि क्वालिटी बदलणे, रंगांमध्ये बदल करणे, इत्यादि. विविध प्रकारे आपली कल्पकता वापरुन तुम्ही सुद्धा स्वतःच्या काही फोटोंना tiltshift च्या मदतीने एडीट करु शकता.
फोटोंना एक वेगळा ईफेक्ट देण्याची ही कल्पना कशी वाटली हे मला तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या माध्यमातून नक्की कळवा. 

प्रथमेश शिरसाट  

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment