300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Monday, 1 March 2010

Tagged under:

Rule of 72


" माझ्याकडे एक चांगली इंन्वेस्टमेंट स्कीम आहे. म्हणजे बघा, तुम्ही १०००० रुपये गुंतवायचे आणि केवळ दोन वर्षात तुमचे पैसे दुप्प्ट होणार. तेच पैसे पुन्हा गुंतवलेत तर आणखी दोन वर्षांत तेही दुप्पट होतील."


मित्रहो, असे बिचकु नका. मी काही तुम्हाला कोणती इन्व्हेस्टमेंट स्कीम विकणार नाही. तुमच्या इतकाच मला देखिल या "स्कीम"वाल्यांचा त्रास होतो. पण अशा दामदुपटीच्या स्कीम्स सांगणारा कोणीतरी कधीतरी आपल्या प्रत्येकाला भेटलेला असतोच. मी फक्त तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे जिचा वापर करुन खरेच तुमचे पैसे दुप्प्ट होणार का (?) आणि कधी ? याचा अंदाज तुम्ही स्वतःच लावु शकता.
या युक्तीचे नाव आहे Rule of 72. बँकींग किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणार्‍या बर्‍याच जणांना Rule of 72 माहित असेलंच.


Rule of 72 हा तुम्ही गुंतविलेली रक्कम साधारण किती वर्षातं दुप्पट होईल हे ठरविण्यासाठीचा सोपा उपाय आहे. गुंतवीलेल्या रकमेवर मिळणार्‍या वार्षीक व्याजदराने ७२ या संख्येला भागल्यास मिळणारे उत्तर म्हणजे मुळ रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी (वर्षे).
उदाहरणार्थ जर १०००० रुपये १०% वार्षिक  व्याजदराने गुंतविले तर ते दुप्पट होण्यास ७२/१० = ७.२ वर्षे लागतील.


Rule of 72 हा एक ढोबळ नियम आहे. हा नियम वापरुन अगदी अचुक उत्तर मिळत नाही मात्र बर्‍यापैकी बरोबर उत्तर मिळते. मुख्य म्हणजे ६% ते २०% या व्याजदरांसाठी हा नियम खरोखरच्या उत्तराच्या अगदी जवळचे उत्तर देतो. (व्याजदरांचा पल्ला साधारण इतकाच असतो.)



परताव्याचा व्याजदरRule of 72 वापरुन मिळणारे उत्तरअचुक उत्तर दोघांमधील फरक
2%36.0351.0
3%24.023.450.6
5%14.414.210.2
7%10.310.240.0
9%8.08.040.0
12%6.06.120.1
25%2.93.110.2
50%1.41.710.3
72%1.01.280.3
100%0.710.3



Rule of 72 चे आणखी काही उपयोग -


आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे जर चलनवाढीचा दर (Inflation Rate) माहित असेल तर हाच Rule of 72 वापरुन आपण रुपयांची भविष्यातील किंमत (Future value of money) ठरवु शकतो. उदाहरणार्थ जर चलनवाढीचा दर (Inflation Rate) ३% इतका असेल तर २४ वर्षांनी (७२/३ = २४)  आजच्या रुपयांची किंमत अर्धी झालेली असेल.


आणखी एक उदाहरण देतो. जर लोकसंख्यावाढीचा दर प्रतीवर्षी २% इतका असेल तर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. पण हाच दर जर ३% असला तर लोकसंख्या दुप्पट होण्यास फक्त २४ वर्षे लागतील. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की सरकारतर्फे करण्यात येणार्‍या विविध गणना आणि सांख्यीकींचा भविष्यातील तरतुदींवर किती परीणाम होउ शकतो. लोकसंख्यावाढीचा दर ठरवण्यात झालेली थोडीशी चुक भविष्यातील सर्व योजनांना फोल ठरवु शकते.


मित्रांनो यापुढे कोणी जर तुम्हाला दामदुपटीची स्कीम सांगु लागला तर पहिल्यांदा त्यास परताव्याचा वार्षीक व्याजदर किती असेल ते विचारा (तसे लिहुन घ्या), मग रक्कम दुप्पट होण्यास कीती कालावधी लागेल ते स्वतःच ठरवा आणि मगच आपले मेहनतीने कमावलेले पैसे गुंतविण्याचा निर्णय घ्या.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment