300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 10 March 2010

Tagged under:

Netbhet eBooks library - मराठी ई-पुस्तकांचा खजिना


मित्रहो आज नेटभेटचा पहिलावहिला वाढदिवस आहे. गेल्या वर्षभरात आम्ही नेटभेट.कॉम च्या माध्यमातुन २८५०० (१०९५४६ pageviews) नियमीत मराठी वाचकांपर्यंत पोहचु शकलो. त्याचप्रमाणे नेटभेट मराठी ईमासिका द्वारे आम्ही १ लाखांहुन अधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचलो. वाचकांचा आणि ब्लॉगरमित्रांचा भरपुर प्रतिसाद लाभला आणि त्यामुळेच सतत लिहत राहण्याची, काहीतरी नविन देत राहण्याची प्रेरणा आम्हांला मिळत राहिली.
मराठी ई-वाचक आणि ई-रसिकांचे आम्ही आभारी आहोत. सतत काहीतरी नविन व उपयुक्त गोष्टी वाचकांना देत राहण्याची परंपरा पुढे चालवत आणि वाचकांप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत Netbhet eBooks Library.


 मराठी मध्ये अजुनही ई-पुस्तके फारशी रुळलेली नसली तरी भविष्यात ई-पुस्तकांच्या क्षेत्रात मराठीचे भक्कम पाउल पुढे पडणार आहे या तीळमात्र शंका नाही. पुस्तक प्रकाशन आणि वितरणाचा अवाढव्य खर्च वाचवणारी, कागद वाचवुन पर्यावरणाचे संरक्षण करणारी, अत्यंत कमी खर्चात किंवा कधीकधी मोफतच  जगाच्या कानाकोपर्‍यातील वाचकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणार्‍या ई-पुस्तकांचा आवाका खुप मोठा आहे.  Netbhet eBooks Library. तर्फ आम्ही वाचकांसाठी १-२ नव्हे तर तब्बल १५० मराठी ई-पुस्तकांचा खजिना घेउन येत आहोत.
आरोग्य, योग, धार्मीक, संतसाहित्य, प्रवास, लघुकथा , ई-मासिके, कविता , संगणक अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश या  Netbhet eBooks Library मध्ये करण्यात आला आहे. या आधीच ही सर्व पुस्तके Scribd नामक संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहेत परंतु तेथे ही पुस्तके शोधुन वाचणे थोडे किचकट आहे,  म्हणुनच आम्ही सर्व मराठी पुस्तके  Netbhet eBooks Library मध्ये एकाच ठीकाणी एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला (embed) आहे.
वाचक पुस्तके डाउनलोड करुन आपल्या सवडीने वाचु शकतात किंवा  Netbhet eBooks Library च्या साध्या सोप्या इंटरफेसचा वापर्करुन ऑनलाईन वाचु शकतात.
मराठी वाचकांची भुक पाहता १५० पुस्तकांचा फडशा पाडण्यात वाचकांना अजिबात वेळ लागणार नाही हे देखिल आम्हाला ठाउक आहे. म्हणुनच वाचक, नवोदित लेखक, ब्लॉगर्स यांना विनंती आहे की तुम्ही लिहिलेल्या लिखाणाची ई-पुस्तके बनवुन आम्हाला पाठवा (कथा, कविता, पुस्तके इत्यादी) त्यापुढे जगभरातील लाखो मराठी बांधवांकडे तुमचे साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी आमची.
 Netbhet eBooks Library ला जरुर भेट द्या आणि तुमच्या प्रतीक्रीया आम्हाला नक्की कळवा.
http://eBooks.netbhet.com

( Netbhet eBooks Library मध्ये उपलब्ध करण्यात आलेली पुस्तके Scribd या  संकेतस्थळावरुन घेतलेली आहेत. पुस्तकांचे सर्व हक्क त्यांचे प्रकाशक/लेखक यांच्याकडे आहेत. या पुस्तकांच्या लेखकांना अथवा प्रकाशकांना Netbhet eBooks Library वर पुस्तके दाखविण्याबद्द्ल शंका अथवा हरकत असल्यास कृपया आम्हाला admin@netbhet.com वर संपर्क साधा )


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment