नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेता लेख
कोणत्याही समाजाची समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून ठरते.ती परिस्थिती जाणून घेण्याचे उत्तम साधन म्हणजे त्या समाजाचे वांड्गमय होय. महाराष्ट्रातील मौखिक वांड्गमयापासून ते लिखित वाड्मयापर्यंतचा आढावा घेतला तर स्त्री जीवनाची स्थित्यंतरे सहज लक्षात येतात. मौखिक वांड्गमयाचा विचार केल्यास कहाण्या व लोककथा या प्रकारांमधून स्त्री विविध रूपातून प व्यक्त होत गेलेली दिसून येते. परंतु ही व्यक्तता स्वतंत्रतेचा वेगळा ठसा देखील उमटवीत गेल्याचे लक्षात येते. उदाहरणच द्यायचे झाल्यास सोमवारच्या खुलभर दुधाच्या कहाणीतील राजाच्या दवंडीचे उल्लंघन करणारी म्हातारी , किंवा शुक्रवारच्या कहाणीतील श्रीमंत भावाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी बहीण या दोन्ही स्त्रियांचे देता येईल. या दोन्ही स्त्रिया परंपरेचे टोक धरुनच स्वतंत्र अस्तित्वाची बीजे पेरतांना दिसून येतात.
लिखित स्वरूपातील वांड्गमयाचा विचार करतांना वेदकालीन स्त्रिच्या जिवनाचा आलेख पुरुषांना समांतर असा होता. वेदकालीन स्त्रीजीवन समृध्द होते, पुरुषांप्रमाणेच स्त्रिला स्वतंत्र बौध्दिक वा आध्यात्मिक जीवन होते. शिक्षणात , यज्ञकर्मात, तिला स्वतंत्र स्थान होते. म्हणूनच उर्वशी ,अपाला, सूर्या, गार्गी इत्यादी तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या.सूत्रकालात स्त्रियांचा दर्जा हीन झाला याची असंख्य कारणे देता येतील त्यात प्रामुख्याने राजकीय स्थित्यंतर हे होय. धर्मशास्त्रांत पुरुषांना प्राधान्य मिळाल्याने स्त्रिया बंधनात अडकल्या, स्त्रीजीवन संकुचित झाले, त्या परावलंबी झाल्या . या सर्व पार्श्व भूमीवर इ.स. १३०० मध्ये उदयास येणारी आद्य संत कवयित्री महदाइसा किंवा महदंबा हे मला आवडलेले व्यक्तिमत्व होय.
मराठीतील पहिले स्त्री रचित काव्य ’धवळे’ हे असून याची रचनाकार महदाइसा असल्याने आद्य कवयित्रीचा मान तिला मिळतो. महदाइसेचे कर्तृत्व , मोठेपण समजून घेण्यासाठी तत्कालीन समाज परिस्थिती , समाजातील स्त्रीचे स्थान तसेच स्त्री जिवन समजून घेणे आवश्यक ठरते. यादवकालात एकेश्वरी वादाचा पुरस्कार करणाऱ्या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण , श्री दत्तगुरू, चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली. श्री चक्रधर स्वामींच्या कालखंडात खऱ्या अर्थाने ह्या संप्रदायाचा प्रसार व प्रचार झाला.
हिंदू धर्मातील कर्मठपणा, कर्मकांडे, जातीय विषमता इत्यादी अनेक बाबींपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वसामान्यांनी या पंथाचा स्वीकार केला. श्री चक्रधर स्वामींचे शिष्यत्व पत्करलेल्या अनेक महानुभावीयांनी पंथीय अभिमानातून व स्वामी भक्तीतुन लेखन केले. हे लिखाण सामान्य जनांच्या भाषेतूनच व्हावे असा चक्रधरस्वामींचा आग्रह होत आणि यातूनच मराठीतील आद्य ग्रंथांची निर्मिती झाली. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सांगणे , श्रीकृष्ण जन्माचे तसेच विवाहाचे सोहोळे सांगणे, श्रीकृष्ण भक्ती हे विषय त्यांच्या ग्रंथलेखनाचे विषय होते. ’लीळाचरित्र’ ,’ गोविंदप्रभू चरित्र’ ,’ सैह्याद्रिवर्णन’, ’वछाहरण’, ’सूत्रपाठ’, ’धवळे’ हीच ती ग्रंथनिर्मिती होय.
या पैकी केशिराज बास किंवा केसोबास यांनी संपादित केलेले ’सूत्रपाठ’ व ’दृष्टान्त पाठ’ यातून तात्कालीन समाजजीवनाचे दर्शन घडते. मुळात दृष्टान्त हा अलंकाराचा प्रकार होय. एखादे तत्त्वज्ञान सहजपणे समजावून सांगण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तत्कालीन समाजजीवनात स्त्रीच्या पातिव्रत्याच्या कल्पनेला विशेष महत्व होते. आपल्या स्त्रीवर नजर ठेवणारे पती, आवडती नावडती पत्नी असा भेदाभेद, विधवा व परित्यक्ता स्त्रियांची दयनीय अवस्था ह्या सर्व गोष्टी या दृष्टान्त पाठातून ठळकपणे दिसून येतात. उदा. ’इसाळुवाचा दृष्टान्त’ (इसाळू = संशय घेणारा)’द्विभार्या दृष्टान्त’, ’पतिव्रतेचा दृष्टान्त’, ’शय्यापालनेचा दृष्टान्त’ ही याची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. एकूण काय, तर स्त्री आणि तिची विविध रुपे आपल्याला दिसतात. स्त्री -जीवनाच्या अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर महदाइसा हिचे करतृत्व विशेष प्रकारे उठून दिसते.
महदाइसाचा जन्म एका विद्वान घराण्यात झाला. तिचे पणजोबा वामनाचार्य हे यादवराजांचे आश्रित असून पणजी महदाइसा विद्वान होती. पणजीला म्हाळसा प्रसन्न होती. पणजी महादेवरायाची पुरोहित असल्याने राजा तिला नित्य प्रश्न विचारीत असे व ती भविष्य सांगत असे. एका वादात तिने परप्रांतीय विद्वानांचा पराभव केल्याने तिला जैतपत्र मिळाले. राजाने पाच गावे इनाम म्हणून दिली. अशा विद्वान पणजीचा वारसा चालवणारी विद्वान नात महदाइसा होय. महदाइसाचा जन्म वायेनायक व कामाइसा ह्यांच्या पोटी झाला.
बालपणीच वैधव्य आलेली महदाइसा त्या काळच्या प्रथेनुसार माहेरी येते. माहेरी तिला प्रतिष्ठा असते. तिच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ’माझ्या विना घरचे काहीच चालत ना, घरचे करणे सवरणे मीच करी! ’महदाइसा ला चुलत बहीण भावंडेही होती. त्यातले नागदेव हे पुढे तिचे गुरु झाले. महदाइसेच्या व्यक्तिमत्वाचा शोध हा चार ग्रंथातून घेता येतो. ’लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतीस्थळ’ व ’धवळे’ या ग्रंथांमधून तिची प्रतिमा दृष्टीस पडते. तीर्थयात्रेस जाणे ,व्रतवैकल्य करणे, देवपूजेत रमणे या रुढ परमार्थाच्या वाटेने जाणे तिला आवडत असे. सुरुवातीच्या काळात चक्रधर स्वामींचे शिष्य दादोस हे तिचे गुरु होते. यांच्या कडूनच नागदेवाला व महदाइसाला श्री चक्रधरस्वामींचे मोठेपण कळते नागदेवाला चक्रधरस्वामींचे नांव कानी पडताच स्थिती प्राप्त होते( म्हणजेच दर्शन घडते) परंतू श्री चक्रधर्स्वामीचे दर्शन घडूनही महदाइसेने मात्र चटकन शिष्यत्व पत्करले नाही . तिच्या स्त्री मनाने जणूकाही गुरुची परिक्षा घेण्याचे ठरवले होते. आणि इथेच महदाइसच्या कर्तुत्वाचे , मोठेपणाचे ,वेगळेपणाचे दर्शन घडते.
श्री चक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला. स्त्री,शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता. त्यामुळेच चक्रधरस्वामी हे आद्य कृतिशिल सुधारक ठरतात. अशा स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने विचारपुर्वक पारख करुनच स्वीकारले होते. महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग ती स्वीकारते. महदाइसेचे वडील याला विरोध करतात परंतु ती आपल्या ठाम निश्चयापासून दुरावत नाही. महानुभावावे अत्यंत खडतर असलेले भिक्षाव्रत ती स्वीकारते. या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्विकारायचे व ते अन्न नदीच्या काठी जाउन , नदीकडे तोंड करुन प्राशन करायचे व पाणी प्यायचे. वैराग्यवृत्ती मनोनिग्रह या गुणांमुळेच ती हा खडतर प्रवास पार करू शकली. श्री चक्रधर स्वामींवर तिची नितांत श्रध्दा आहे. त्यांच्या प्रत्येक विचाराला तत्वज्ञानाला अनुसरणारी ती आदर्श शिष्या होते. श्री चक्रधर स्वामींना आपले जीवन ती समर्पित करते. परंतु इथे हे समर्पण परमार्थाच्या भक्तीतून आले असल्याने त्याला आध्यात्माचा रंग चढला आहे.
स्वतंत्र वृत्ती, कुशाग्र बुध्दी असलेली महदाइसा ही आपल्याला लीळाचरित्रात भेटते. श्री चक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीळेचे वर्णन करण्यासाठी लीळाचरित्राची निर्मिती झाली . या लीळांमधे प्रामुख्याने श्री चक्रधरस्वामींना जिज्ञासा व बुध्दिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारून हैराण करणारी महादाइसा भेटते.’ म्हातात्री चचकः, म्हातारी विसासकः एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे’ असे उदगार स्वमी तिच्या बद्दल काढतांना दिसतात, त्याच वेळी तिच्या विचक्षण बुध्दिची साक्ष पटते. दोघांच्या संवादातून प्रश्नोत्तरातून पंथाची माहिती आपल्याला मिळत जाते. अशा महदाइसाशी संवाद साधताना चक्रधर मनापासून रमतात, म्हणूनच ती त्यांच्या मर्जितील , अंतेवासी शिष्या होते.
चक्रधरांचे तत्त्वज्ञान नीट समजून न घेतल्याने त्यांना अवयव विच्छेदनाची शिक्षा होते. पैठणचे विद्वान त्यांना पकडून घेउन जातात . आपल्या अवतार कार्याची समाप्ती होत आहे अशी जाणीव चक्रधरांना होते व पंथाची धुरा नागदेव व महदाइसा या दोघांच्या खांद्यावर देतात. महदाइसा आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या चिंतनात व पंथाच्या कार्यासाठी समर्पित करते. श्री चक्रधर स्वामींच्या चिंतनाच्या याच काळात’ धवळ्या ’ची रचना झाली. धवळे , मातृकी, रुकमिणी सैवंर, गर्भकांड ओव्या, आरती अशी महदाईसाची वांड्गमय निर्मिती होय. यातील धवळ्यात भेटणारी कवयित्री महदाइसा मला विशेष आवडते. श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या विवाह कथेकडे महदाइसा आकर्षित झालेली दिसते. रुक्मिणीच्या मनातील भक्तीभाव हा तिला विलक्षण वाटला. किंबहुना तिचे चक्रधरस्वामिंशी असलेले गुरु शिष्याचे नाते ती या धवळ्याद्वारा व्यक्त करताना दिसते.अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवराची कथा ही तिला आद्य कवियित्रीचा मान मिळवून देणारी ठरली. श्री चक्रधरांनी श्री कृष्णचरित्र ७१ प्रसंगात वर्णन केले आहे. त्याचेच श्रवण मनन व चिंतन करून धवळ्याची निर्मिती झाली आहे. श्री चक्रधर स्वामींचा वियोग तिला सहन झाला नाही. श्री चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशिच विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली .
श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करीत ती संन्यासिनी , धवळे कर्ती कवयित्री प्रसंगी पंथात आईची भूमिका पार पाडणारी,’कोण देहाते सांभाळी’ या अवस्थेला पोचणारी ज्ञानवान तपस्विनी आहे. अखेरच्या काळात चक्रधरांच्या शिकवणुकीप्रमाणे शारीरिक व्याधी जडली असतांना देखील औषधांना नकार देते.शेवटी नागदेव सुध्दा त्यांचे मोठेपण मान्य करतात.
नागदेव तिला विचारतात ’रुपै देव आठवतो’ ती म्हणते ’हो नागदेवा आठवतो’ नागदेव म्हणतात कैसा? ती म्हणते ’वजरी घडिता’ हे वजरी घडिता चक्रधरस्वामींचे रूप तिच्या ठायी चिरंतन वसलेले असते. ’रुपै देह’ पर्यंत उचित स्मरणा चुकवीशीः पहिल्या दिवसापासोनी सेवटील दिसापर्यंत देतो तुवाचि धरला असे’ अशी कबुली नागदेव देतात तेंव्हाच महदाइसेचे मोठेपण लक्षात येते.
स्त्री जीवनाचा खरा अर्थ दाखवून देणाऱ्या काही स्त्रियांपैकी एक म्हणजेच महदाइसा अथवा महदंबा होय. तिचे जीवन एक मानबिंदू ठरतो. या पंथाने स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग मोकळा करून दिला त्याचा फायदा घेउन परमोच्च स्थान प्राप्त करणारी महदाइसा ही आद्य कवियित्री म्हणून मानाचे स्थान प्राप्त करते. आजच्या कवितांमधून तिने पेरलेली काव्याची बीजे प्रतित होतांना दिसतात. तेंव्हा अभिमानाने उर भरुन येतेओ. जीवनातील प्रतिकूलतेवर मात करीत आत्मभानाने जागृत होणाऱ्या ,आध्यात्माची कास धरीत मुफ्तीचा खडतर मार्ग स्वीकारणाऱ्या महदाइसाला माझा मानाचा मुजरा!
सुपर्णा कुलकर्णी
मालाड पूर्व
मुंबई-४०००९७

0 comments:
Post a Comment