मराठी ब्लॉग जगतातील सर्वोत्तम लेखांना जास्तीत जास्त वाचकवर्ग मिळवुन देणार्या नेटभेट ई-मासिकाचा सहावा अंक आज गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर वाचकांच्या हाती देताना आम्हांस अतिशय आनंद होत आहे. नेटभेटच्या ईतर मासिकांप्रमाणेच वाचकवर्गाकडुन मार्च २०१० या अंकाचे स्वागत होईल याची आम्हाला खात्री आहे.
http://magazine.netbhet.com
नेटभेट ई-मासिक मार्च २०१० चा अंक ऑनलाईन वाचण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
नेटभेटच्या अंकासाठी आपले लेख देऊ करणार्या सर्व मराठी ब्लॉगर्सचे आम्ही आभारी आहोत. आपल्या सहकार्यामुळेच नेटभेट ई-मासिकाने ऑनलाईन जगतामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ई-मासिकामुळे थेट ईमेलद्वारे मराठी वाचकांना ऑनलाईन साहित्याचा आनंद देता येतो ही बाब आम्हाला निश्चीतच सुखावणारी आहे.
मित्रहो, प्रत्येक महिन्यातील अंकामध्ये आम्ही नविन ब्लॉगर्सचा समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो. नेटभेट ईमासिकाला आवश्यक असे सातत्यपुर्ण, वैविध्यपुर्ण आणि नाविन्यपुर्ण लेखन जास्तीत ब्लॉगर्सनी करावे अशी आमची अपेक्षा आहे. नेटभेटच्या ई-मासिकासाठी लेख निवडण्यास सोपे जावे म्हणुन आम्ही ब्लॉगर्सना काही टिप्स देऊ इच्छीतो. आपल्या ब्लॉगवरील लेखाचा समावेश ई-मासिकामध्ये करण्यात यावा अशी आपली अपेक्षा असल्यास खालील टीप्स नक्कीच उपयोगी पडतील.
१. ई-मासिकासाठी आम्ही ललित, प्रवासवर्णन, माहितीपर, तंत्रज्ञान विषयक (सामान्य Non technical व्यक्तींना कळेल आणि उपयुक्त असेल असे लेखन), तरुणाईला भावणारे, प्रोत्साहनपर लेख असे ढोबळ विषय ठरवलेले आहेत.
२. सदर विषयांवरील लेख किमान २०-२५ ओळींचा आणि कमाल ७०-८० ओळींचा असल्यास नेटभेट ई-मासिकासाठी आदर्श ठरेल.
३. लेखकाची विषय हाताळण्याची शैली , विषयाबद्दलचे ज्ञान तसेच लेख किती अभ्यासपुर्ण आहे या गोष्टी लेख निवडण्यासाठी लक्षात घेतल्या जातात.
४. ब्लॉग अपडेट करण्याची वारंवारता (Frequency) अतीशय महत्वाची असते.
५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बर्याच ब्लॉगर्सनी संपर्कासाठी ईमेल पत्ता ब्लॉगवर दीलेला नाही आहे. About us चे
एक पान ब्लॉगवर असणे नेहमीच चांगले परंतु जर तुम्ही स्वतःबद्दल फारशी माहिती देउ इच्छीत नसाल तर किमान ईमेल पत्ता तरी नक्कीच द्या.
मित्रांनो नेटभेट ई-मासिक आम्ही जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ईमेलद्वारे ई-मासिक पोहोचवुन एकुणच मराठी ब्लॉगींगच्या प्रसाराला हातभार लावावा ही विनंती.
0 comments:
Post a Comment