कामाच्या व्यापात जेव्हा आपल्याला ऑफिसमधून निघायला उशीर होतो किंवा अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी बाहेर जावे लागते त्यावेळी कॉम्प्युटर बंद करणे देखील तितकेच गरजेचे असते आणि तो shut down होईपर्यंत आपल्याला ढिम्म बसावे लागते. मग तो कॉम्प्युटर चालू असलेले एक एक porgram बंद करणार परत ते बंद नाही झाले तर End Now ह्या प्रोग्रामची window ओपन होणार आणि आपण जोपर्यंत त्या End Now ह्या tag वर क्लिक नाही करत तोपर्यंत shut down ची प्रक्रिया पुढे continue नाही होणार, आणि ही सगळी तारेवरची कसरत करताना तुमचा कॉम्प्युटर कधी कधी हँग होणार किंवा नीट shut down तरी नाही होणार हे नेहमीचच समीकरण बनलं आहे.
पण आता मी तुम्हाला अशी युक्ती सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा हा त्रास कायमचा कालबाह्य होईल. तसेच ह्या युक्तिमुळे तुम्हाला कॉम्प्युटर बंद करताना कुठलेही programs बंद करावे लागणार नाहीत ही महत्त्वाची बाब, म्हणजे तुम्ही पुन्हा कॉम्प्युटर सुरू केल्यावर सगळे programs जसेच्या तसे सुरू दिसतील.
यासाठी फक्त २ मुख्य गोष्टींची पूर्तता तुम्हला करावी लागेल त्या म्हणजे तुमच्या की-बोर्डवर sleep आणि power अशी २ buttons हवीत(शक्यतो Sleep बटण असे
यासाठी फक्त २ मुख्य गोष्टींची पूर्तता तुम्हला करावी लागेल त्या म्हणजे तुमच्या की-बोर्डवर sleep आणि power अशी २ buttons हवीत(शक्यतो Sleep बटण असे
आणि Power बटण
असे दिसते) आणि तुमची operating system विंडोज २००० किंवा XP हवी की झाले तुमचे निम्मे काम. उर्वरीत निम्मे काम फक्त २ मिनिटांचे आहे. तेही तुम्हाला एकदाच करावे लागेल परंतु कॉम्प्युटर फॉरमॅट केल्यावर मात्र ही setting तुम्हाला परत करवी लागेल याची नोंद घ्यावी. चला तर मग मंडळी बघुया काय आहे ही युक्ती !!!
तिकडे क्लिक केल्यावर Display Properties नावाची विंडो open होईल त्यातील Screensaver या tag वर क्लिक करून त्याच्याच खाली असलेल्या Power या बटणावर क्लिक करा
आता तुमच्या समोर Power Options Properties नावाची एक नवीन विंडो दिसेल. त्या विंडोवरील Hibernate या टॅबवर तुम्ही क्लिक करा सोबत Enable Hiberbnation वर देखील टिकमार्क करा आणि Apply या खालील बटणावर क्लिक करा.
त्यानंतर त्याच विंडोमध्ये (Power Options Properties ची विंडो) वर तुम्हाला Advanced नावाचा एक टॅब दिसेल त्यावर क्लिक करा..तुम्हाला खाली २ Options दिसतील. जिथे ' When I press the power Button on My Computer' असे लिहीलेले दिसेल आणि त्याच्या बरोबर खाली एक Drop down box दिसेल तिथे तुम्हाला हवा तो पर्याय (उदहरणार्थ Shut down) निवडा आणि जिथे ' When I press the sleep Button on My Computer' असे लिहीलेले असेल तिथे Hibernate चा पर्याय निवडा आणि OK या बटणावर क्लिक करा(तुम्ही हवे असल्यास sleep आणि power या दोन्ही बटणांचा वापर hibernate किंवा shut down साठी करू शकता).
Display Properties च्या विंडोमधील सुद्धा OK या बटणावर क्लिक करा.
आता तुमच्या कि-बोर्डवरील Sleep हे बटण दाबा आणि मला सांगा तुमचा कॉम्प्युटर किती वेळात बंद झाला ते....
तुमच्या काही प्रतिक्रिया आणि सूचना असल्यास मला जरूर कळवा.
0 comments:
Post a Comment