टेक्नोरॅटी या ब्लॉगींग या विषयाला वाहिलेल्या सर्वात मोठ्या वेबसाइटने डीसेंबर २००९ मध्ये एक अहवाल सादर केला होता. जगभरातील ब्लॉग्ज आणि ब्लॉगींगशी संबंधीत काही आकडेवारी टेक्नोरॅटीने या अहवालात सादर केला होता. 2009 State of the Blogosphere येथे हा अहवाल वाचता येईल.
नेटभेटचे वाचक आणि ब्लॉगर्ससाठी या विस्तृत अहवालातील काही मोजक्या परंतु महत्त्वाच्या आकडेवारीसंबंधी येथे थोडक्यात माहिती मी येथे देत आहे.
- टेक्नोरॅटी या जगातील सर्वात मोठ्या ब्लॉग डीरेक्टरीमध्ये 133,000,000 ब्लॉग्ज नोंदवलेले आहेत.
- इंटरनेट वापरणार्यांपैकी ७७ % लोक ब्लॉग वाचणे पसंत करतात.
- १५% ब्लॉगर्स दर आठवड्यात १० तासांपेक्षा अधिक वेळ ब्लॉगींगसाठी देतात.
- दर पाच ब्लॉगर्सपैकी एक ब्लॉगर दररोज पोस्ट लिहितो.
- जास्तीत जास्त ब्लॉगर्स आठवड्यातुन २-३ पोस्टस प्रकाशित करतात.
- एकुण ब्लॉगर्सपैकी १३ % ब्लॉगर्स स्वतःचा ब्लॉग स्वतः डीझाईन करणे पसंत करतात.
- ५९% ब्लॉगर्स मोफत ब्लॉग होस्टींग साईट्स वपरतात.
- ८२% ब्लॉगर्सना ब्लॉग पोस्ट मध्ये जास्तीत जास्त फोटो/ चित्रे वापरणे आवडते.
- २०% ब्लॉगर्स मोबाईलद्वारे ब्लॉगींग करतात.
- १० % ब्लॉगर्सना त्यांच्या ब्लॉगची ट्रॅफीक (वाचकसंख्या) माहित नाही.
- ब्लॉगवर येणार्या वाचकांपैकी सरासरी २७% वाचक हे गुगल आणि ईतर सर्च इंजिन्सद्वारे ब्लॉगपर्यंत येतात.
- ७४% ब्लॉगर्स ईतर ब्लॉग अॅनॅलीसीस सर्वीसेस वापरतात. गुगल अॅनॅलीटीक्स हे सेवा या सर्वांमध्ये सर्वाधिक प्रिय आहे.
- ५७% ब्लॉगर्सना भविष्यात ब्लॉगींग वाढवण्याची इच्छा आहे.
- ब्लॉगद्वारे ओळख होउन पुढे मैत्रीत रुपांतर झालेल्या ब्लॉगर्सची संख्या ४२% इतकी आहे.
- ६३% ब्लॉगर्सचे असे मानणे आहे की ब्लॉगींगमुळे त्यांचे आपापल्या आवडत्या विषयाबद्दलची ओढ आणि ज्ञान वाढले आहे.
- जवळपास सर्वच ब्लॉगर्सच्या मते ब्लॉगींगमुळे त्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल झाले आहेत. केवळ ६% ब्लॉगर्स असे मानतात की ब्लॉगींगमुळे त्यांच्या मित्र व कुटुंबीयांसोबत नातेसंबंधांवर विपरीत परीणाम झाला आहे.
- स्वतःचा व्यवसाय असणार्या ७२% ब्लॉगर्ससाठी ब्लॉगींग हा नविन गिर्हाईके (Customers) शोधण्याचा मार्ग आहे.
- ६१ % ब्लॉगर्स ब्लॉगींगकडे पुरक आवक स्त्रोत (Supplimentry income source) म्हणुन पाहतात.
- ७२% ब्लॉगर्स त्यांचे विशेष ज्ञान व नैपुण्य इतरांना उपयोगी व्हावे म्हणुन ब्लॉग लिहितात.
- ७१ % ब्लॉगर्स आपल्या मनातील विचार मांडण्यासाठी ब्लॉग लिहितात.
- ८६% ब्लॉगर्स एका वर्षापेक्षा अधिक काळ ब्लॉगींग सुरु ठेवतात.
- एकुण ब्लॉगर्सपैकी ६८% ब्लॉगर्सने दोन वर्षांहुन अधिक काळ यशस्वीपणे ब्लॉगींग सुरु ठेवली आहे.
- एकुण ब्लॉगर्सपैकी ७५% ब्लॉगर्स पदवीधर आहेत.
- एकुण ब्लॉगर्सपैकी ६०% ब्लॉगर्स १८ ते ४४ या वयोगटातील आहेत.
- एकुण ब्लॉगर्सपैकी २/३ पुरुष आहेत.
- ७२% ब्लॉगर्सना त्यांच्या ब्लॉगपासुन काहीही मिळकत नसते.
- २८ % ब्लॉगर्सना ब्लॉगींगपासुन उत्पन्न मिळते. त्यापैकी ५४% ब्लॉगर्स आपापल्या कंपनीसाठी ब्लॉगींग करतात आणि paid reviews लिहितात.
0 comments:
Post a Comment