वाचकहो, मराठी ब्लॉगींगला जगभर पसरलेल्या मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार्या नेटभेट ई-मासिकाचा फेब्रुवारी २०१० चा अंक प्रकाशित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेटभेट मासिकाला केवळ पाच महिन्यात जो प्रतीसाद मिळाला त्यामुळे आम्ही खुप समाधानी आहोत.
कालच म्हणजे १४ फेब्रुवारी २०१० मध्ये आम्ही मराठी ब्लॉगर्सना ब्लॉग निर्मीतीसाठी आणि वाचकांना सर्व मराठी ब्लॉग्जचे अपडेट्स एकत्रच वाचण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा "मराठी ब्लॉगकट्टा" या नविन संस्थळाची सुरुवात केली. नेटभेट ई-मासिकासाठी दर्जेदार साहित्य निवडण्यासाठी आम्हाला ब्लॉगकट्टाचा निश्चीतच फायदा होईल. वाचकांना http://blogkatta.netbhet.com येथे ब्लॉगकट्ट्यावर जाता येईल.
नेटभेट फोरमही आता नविन स्वरुपात वाचकांच्या मदतीसाठी तयार झाला आहे. कृपया नेटभेट फोरमला भेट देऊन तेथे आपले प्रश्न, चर्चा, प्रतीक्रीया जरुर मांडाव्यात.
ब्लॉग लेखकांनी आपापले उत्कृष्ट लेख या मासिकासाठी देऊ केले आणि वाचकांनी ई-मासिक ऑनलाईन वाचुन आणि डाउनलोड करुन प्रतीसाद दीला याबद्दल आम्ही आभारी आहोत.
नेटभेट मासिकाबद्दल आपल्या प्रतीक्रीया, सुचना आम्हाला नक्की कळवा.
नेटभेट ई-मासिक फेब्रुवारी २०१०
0 comments:
Post a Comment