"लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
मित्रांनो, आपल्या अद्वीतीय प्रतीभाशक्तीने मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेणार्या कविश्रेष्ठ श्री. वि. वा. शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. असा प्रतीभाशाली कवी महाराष्ट्राला, मराठी भाषेला लाभला म्हणुनच आजचा दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणुन साजरा केला जातो.
मराठीचा उत्कर्ष या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या अनेक मराठी बांधवांनी यंदा "मराठी दिवस" आपापल्या परीने साजरा करायचे ठरवले आहे. "आपली भाषा आणि आपल्या भाषेतुन ज्ञानप्रसार" हे उद्दीष्ट समोर ठेवुन कार्यरत असणार्या नेटभेट.कॉम आणि नचिकेत प्रकाशन (नागपूर) यांनी मिळुन नेटभेटच्या वाचकांसोबत "मराठी भाषा दिवस" साजरा करण्याचे योजीले आहे.
जास्तीत जास्त मराठी वाचले, बोलले गेले पाहिजे आणि त्याचसाठी जास्तीत जास्त मराठी लिहिले गेले पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. इंग्रजाळलेल्या समाजात वावरताना मराठी मुलांमध्ये असणारा न्युनगंड दूर व्हावा आणि त्यांनी आत्मविश्वासाने जगाला सामोरे जावे यासाठी आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त ज्ञान प्रसार मराठीतुन करत असतो.
हेच उद्दीष्ट समोर ठेवुन आम्ही मराठी वाचकांसाठी आणि मराठी ब्लॉगर्ससाठी एक स्पर्धा आयोजीत करत आहोत.
वाचकांसाठीची स्पर्धा -
"मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व" असे या स्पर्धेचे नाव आहे. यामध्ये वाचकांनी "मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व" या विषयावर लेख लिहुन आम्हाला पाठवायचे आहेत. या लेखांचे परीक्षण नचिकेत प्रकाशनाचे श्री. अनिल सांबरे करतील. विजेत्यांना पारितोषिके देखील नचिकेत प्रकाशनातर्फेच वितरीत केली जातील.
स्पर्धेची रुपरेखा :
- 'मला भावलेले मराठी व्यक्तिमत्व' या विषयात तुम्ही कुठल्याही मराठी व्यक्तिबद्द्ल लेख लिहू शकता. अगदी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर सारख्या ख्यातनाम व्यक्तिंपासुन तुमच्या परिचयात असलेल्या मात्र प्रसिद्ध नसलेल्या एखाद्या व्यक्तिपर्यंत कोणाविषयीही लेख लिहु शकता.
- लेख जास्तीत जास्त १००० शब्दांपर्यंत मर्यादीत असावा.
- लेख स्विकारण्याची अंतीम मुदत १५ मार्च २०१० असेल. यानंतर मिळालेले लेख स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- 'मला भावलेले मराठी व्यक्तिमत्व' या विषयाबाहेरील लेख अपात्र ठरतील.
- लेख मराठी भाषेतच असावा. ईतर भाषेतील लेख अपात्र ठरतील.
- तुम्ही लिहिलेले लेख १५ मार्च पर्यंत admin@netbhet.com वर मेल करू शकता. या ईमेलचे शिर्षक ( 'Subject Line') 'मला भावलेले मराठी व्यक्तिमत्व' असे असावे. लेख १५ मार्चपर्यंत खालील पत्त्यावरही पाठवू शकता. पत्ता आहे:
प्रणव जोशी, ४९४, विनित अपार्टमेंट, साई सेक्शन,अंबरनाथ (पूर्व) - ४२१५०१.
- विजेत्यांना बक्षिसे घरपोच मिळण्यासाठी आपली पुर्ण माहिती (पत्ता, दुरध्वनी क्रमांक ई.) लेखासोबत कळवावे.
- विजेत्यांना मिळणार्या बक्षिसांचे स्वरूप :
प्रथम क्रमांक - नचिकेत प्रकाशन तर्फे ३ पुस्तकांचा संच ( नेत्रुत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व , स्वप्न संकेत , चाणक्य सुत्रे )
द्वितीय क्रमांक - नचिकेत प्रकाशन तर्फे २ पुस्तकांचा संच ( नेत्रुत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व , चाणक्य सुत्रे
तृतीय क्रमांक - नचिकेत प्रकाशन तर्फे १ पुस्तक ( नेत्रुत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्व )
- प्रथम तीन विजेत्यांचे लेख नेटभेटवर प्रकाशित केले जातील.
- लेखाची मांडणी, निवडलेले व्यक्तीमत्व, शुद्ध भाषा आणि व्याकरण, लेखाद्वारे साधला गेलेला एकुण परीणाम या निकषांवर लेखाचे परीक्षण करण्यात येईल.
ब्लॉगर्ससाठीची स्पर्धा -
- मराठी ब्लॉगर्स आधीपासुनच सकस मराठी लेखांद्वारे मायमराठीची सेवा करत आहेतच. त्यामुळे ब्लॉगर्ससाठी वेगळी कोणतीही स्पर्धा न घेता मराठी ब्लॉगकट्ट्यावरीलसभासदांपैकी दोन भाग्यवान विजेत्यांना पारीतोषिक देण्यात येणार आहे.
- मराठी ब्लॉगकट्याचे सभासदत्व घेण्यासाठी येथे क्लिक करुन आपल्या ब्लॉगची माहिती आम्हांस द्या.
- प्रथम पारितोषिक - निवडलेल्या भाग्यवान मराठी ब्लॉगला नेटभेट तर्फे स्वतःचे डोमेन नेम (domain name ) आणि स्वतःच्या डोमेनवरील ईमेल पत्ता मिळवुन देण्यात येईल. यासाठी ब्लॉगचे डोमेन नेम ब्लॉगरने स्वतः निवडायचे आहे. ( निवडलेले डोमेन नेम याआधी कोणीही विकत घेतलेले नसावे किंवा पुनर्विक्रीस (Resale) उपलब्ध नसावे. सदर डोमेन नेम फक्त पहिल्या वर्षासाठी नेटभेटतर्फे देण्यात येईल.)
- द्वीतीय पारितोषिक - मराठी सुलेखन असलेला टी-शर्ट (अर्थात तुमच्या मापातला !)
ही स्पर्धा केवळ संगणकावर मराठी लिहिता येणार्यांसाठीच आहे असे नव्हे. मराठी लिहिता येणारी प्रत्येक व्यक्ती (आबालवृद्ध) यामध्ये सहभाग घेऊ शकतात.
आपल्या कर्तुत्वाच्या बळावर यशाला गवसणी घालणार्या, इतरांना प्रेरणादायी ठरणार्या अनेक व्यक्ती आपण पाहत असतो. नकळतच आपण त्यांना आपले प्रेरणास्थान बनवतो आणि इतरांना त्यांची उदाहरणे देतो. काही व्यक्तींचा जीवनपथ आपल्याला मार्गदर्शक ठरत असतो तर काहींनी संकटकाळी मदत करुन आपल्याला कृतकृत्य केलेले असते. अशा आपल्या मनाच्या कोपर्यात बसलेल्या सर्व व्यक्तीमत्वांबद्दलचे विचार जगासमोर मांडण्यासाठी "मराठी दिवसाच्या" या स्पर्धेचा वाचक पुरेपुर फायदा घेतील याची आम्हांला खात्री आहे.
जय महाराष्ट्र !!!
0 comments:
Post a Comment