Computer चालू किंवा बंद करताना आपल्याला Default windows sound ऐकू येतो. नेहमी तोच तोच आवाज ऐकून आपल्याला कंटाळा येत असेल आणि वाटत असेल कि ह्या नेहमीच्या आवाजाऐवजी आपल्या आवडीची Music File किंवा एखादे आवडीचे गाणे वाजले तर........अगदी सोपे आहे हे. फक्त तुमची ती फाईल .wav या फॉरमॅट मध्ये आणि शक्यतो १० ते १५ सेकंदंची असणे गरजेचे आहे आणि जर .wav फॉरमॅटमध्ये नसेल तरी घाबरायचे कारण नाही. या article च्या शेवटी मी कुठल्याही फॉरमॅटमधली audio फाईल .wav या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या चकटफू सॉफ्टवेअर्सची माहीती नक्कीच देणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा.
तत्पूर्वी आपण मूळ आवाज (Default Sound) कसा बदलयचा ते बघुया.
यासाठी तुम्ही Start → Control Panel मध्ये जा.
आपले काम अगदी सोपे व्हावे यासाठी Control Panel Window च्या डाव्या हाताला Switch to classic view असे लिहिले असेल तिकडे क्लिक करा. आता तुम्हाला Control Panel मधील सगळे Icons दिसतील. त्यातून Sounds and Audio Devices ह्या Icon वर डबल क्लिक करा.
तुमच्यासमोर आता Sounds and Audio Devices Properties नावाची एक विंडो ओपन होईल.
तिकडे Sounds हा पर्याय निवडा. आता तुम्हाला खाली विविध पर्याय दिसतील त्यातून Windows Logon किंवा Windows Logoff चा पर्यायावर क्लिक करा आता हाच पर्याय तुम्हाला खाली असलेल्या छोट्या Drop down window मध्ये दिसेल आणि बाजूला play बटण दिसेल त्या बटणावर क्लिक करून तुम्ही त्या पर्यायाचा मूळ (Default sound) आवाज ऐकू शकता. त्याच बटणाच्या बाजूला Browse नावाचे अजून एक बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुम्ही निवडलेल्या पर्यायासाठी Browse विंडो दिसेल. त्यातून तुम्हाला हवी ती Music File निवडा (फक्त ती वर नमूद केल्याप्रमाणे .wav या फॉरमॅट्मध्ये असावी) हवे असल्यास तुम्ही निवडलेली फईल त्या Browse विंडोमध्येच वाजवून बघुन शकता यासाठी त्या विंडोमध्ये Play आणि Stop ही दोन बटणं दिसतील. एकदा तुम्ही तुम्हाला हवी ती फाईल निवडली की OK या बटणावर क्लिक करा .
आता तुम्ही Browse या विंडोमधून बाहेर याल. आता फक्त Sounds and Audio Devices Properties या मूळ विंडोवरील OK या बटणावर क्लिक करा, की झाले तुमचे काम.
अशाच प्रकारे तुम्ही इतरही आवाज बदलण्याचा प्रयत्न करू शकता.
आता मी तुम्हाला अशा कही सॉफ्टवेअर्सची नावे सांगतो की ज्याद्वारे तुम्ही कुठल्याही audio फॉरमॅट मधली फाईल .wav या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करू शकता.
१. Maestro Music Station : click here to download
२. Switch Audio File Converter : click here to download
३. Any Audio Converter : click here to download
तुम्ही अजूनही काही सॉफ्टवेअर्स Internet वर शोधू शकता.
वरील article आपणास कसे वाटले हे मला जरूर कळवा शिवाय तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा कळवा.
प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.com
Saturday, 23 January 2010
Tagged under: संगणक
Play your favorite music file while logging on and logging off windows instead of default sounds.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment